Shri Navratri Devi Aarati Sangrah : श्री नवरात्री देवीची - आरती संग्रह मराठी




नमस्कार, तुमचे अभिप्राय नक्की मला कळवा. तुमच्या कडील संकलन माझ्यापर्यंत कमेंट बॉक्स मधुन नक्की पाठवा. 
नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा 

१. आरती अंबाबाईची : अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसे सिंहासनी हो ।


अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसे सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून घटस्थापना  करुनी हो।
मूलमंत्र - जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो ।
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो ।
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो ।
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ || उदो बोला उदो ।

तृतीयेचे दिवशी अंबे ने शृंगार मांडीला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे कळा हो || ३ || उदो बोला उदो ।

चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो ।
पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहनी हो ।
भक्तांची माउली भक्त येती लोटांगणी हो || ४ || उदो बोला उदो ।

पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो ।
अर्ध्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडतां हो || ५ ||उदो बोला उदो ।

षष्ठीचे दिवशी भक्त आनंदे वर्तला हो ।
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो || ६ || उदो बोला उदो ।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो ।
तेथे तु नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटी पडता झेलुन घेसी वरचेवरी हो || ७ || उदो बोला उदो ।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो ।
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ || उदो बोला उदो ।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो ।
सप्तशती जप होम हवने करुनी हो ।
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले जगदंबेने हो || ९ || उदो बोला उदो ।

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो ।
सिंहारूढ बैसूनि अंबे शस्त्रे त्वां घेउनी हो ।
शुंभ-निशुंभादिक राक्षस किती मारुनी रणी हो ।
विप्र रामदास आश्रय दिधला तव चरणी हो || १० || उदो बोला उदो ।

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो ।
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
---------------------------------------------------------------------------

२. आरती जगदंबेची: जय जय रेणुके आई जगदंबे ।


जय जय रेणुके आई जगदंबे । ओवाळू आरती मंगळारंभे ।। धृ ।।

शुभ मंगलोत्सव मंगळवारी । मंगल वाजंत्री वाजती द्वारी ।।
मंगलकृत जागर समारंभे । जय जय रेणुके आई जगदंबे ।। १ ।।

मंगल मंडपी तू राजबाळा । शोभती मौतिक नक्षत्र माळा ।।
भरजरी झालर नारळ अंबे । जय जय रेणुके आई जगदंबे ।। २ ।।

भडक पितांबर कंचुकी पिवळी । 
 नवरत्न माणिक मणी मोती पवळी ।।
तळपती रवी-शशींची प्रतिबिंबे । जय जय रेणुके आई जगदंबे ।। ३ ।।

कुंकुम कंकणालंकार वायन । चंदन चर्चन अर्चन गायन ।।
उतरती नरनारी तुझं लोणलिंबे । जय जय रेणुके आई जगदंबे ।।४ ।।

आदिमूळ माये तू विश्वाची राणी । लावण्यरूप सौभाग्याची खाणी ।
पाहता तुज देहभान विसंबे । जय जय रेणुके आई जगदंबे ।। ५ ।।

जाहली दुर्लभ भेट आनंदे । पाहिली विमल ही  चरणारविंदे ।।
मन विष्णुदासांचे विरो अविलंबे । जय जय रेणुके आई जगदंबे ।। ६ ।।
-------------------------------------------------------------------------------

३. उदो उदो उदो उदो ग जगदंबे माते


उदो उदो उदो उदो ग जगदंबे माते ।
महालक्ष्मी आई घेई देते माना ते ।। ध्रू ।।

थोर त्रिलोकी भाग्य लाभले आश्विन मासाते ।
नवरात्रीतील अष्टमीचे दिनी येणे तव घडते ।। १ ।।

तांदूळपिठीचा करिती मुखवटा भक्तीभावाने ।
पूजा करिती सुवासिनी मग मोदा ये भरते ।। २ ।।

धूप सुवासिक कोणी आणिती घेती कलशाते ।
कलश फुंकिता खेळ खेळिती झिम्मा फुगडी ते ।।३ ।।

निवास तुमचा झाला भूवरी पवित्र क्षेत्राते ।
तुळजापूर कोल्हापूर तैसे माहूर पवित्र ते ।। ४ ।।
__________________________________________________

४. जय जय जगदंबे । श्री अंबे  


जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुका कल्पकदंबे । जय जय जगदंबे ।। धृ ।।

अनुपम स्वरूपाची तुझी धाटी । अन्य नसे या सृष्टी ।।
तुजसम रूप दुसरे । परमेष्ठी, करीता झाला कष्ठी ।।
शशिरस रसरसला , वदनपुटी । दिव्य सुलोचन द्रुष्टि ।।
सुवर्ण रत्नांच्या शिरी मुकुटीं । लोपती रवी शशी कोटी ।।
गजमुखी तुज स्तविलें , हेरंबे । मंगल सकळारंभे ।। जय जय जगदंबे ।। १ ।।
Ji
कुंकुम चिरी शोभे मळवटी । कस्तुरी टिळा लल्लाटी ।।
नासिक अति सरळ हनुवटी । रुचिरामृत रस ओठी ।।
समान जणु लवल्या धनुकोटी । आकर्ण लोचन भृकुटी ।।
शिरी नीट भांग वळी उफराटी । कर्नाटकची धाटी ।।
भुजंग निळंरंगापरि शोभे । वेणी पाठीवर लोम्बे ।। जय जय ।। २ ।।

कंकणे कणकाची मनगटी । दिव्य मुधा दश बोटी ।।
बाजूबंद नगे बाहुवटी । चर्वूनि केशर उटी ।।
सुगंध पुष्पांचे हार कंठी । बगु मोत्याची दाटी ।।
अंगी नवी चोळी जरीकाठी । पिट पितांबर तगटी ।
पैंजण पदकमळी अति शोभे । भ्रमर धावती लोभे ।। जय जय ।।३ ।।

साक्षप तू क्षितीच्या तळवटी । तूंचि स्वये जगजेठी ।।
ओवाळीन आरती दीपताटी । घेऊनि कर संपुष्ठी ।।
करुणामृत ह्रदये संकष्ठी । धावसी भक्ता साठी ।
विष्णुदास सदा बहुकष्टी । देशील निज जरी भेटी ।।
तरी मज काय उणे या लाभे । धाव पाव अतिलंबे ।। जय जय ।। ४ ।।
---------------------------------------------------------------------------

५. लोलो लागला अंबेचा भेद भेद कैचा ।


लोलो लागला, अंबेचा भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा , धंदा मूळ मायेचा । लोलो लागला ।। धृ ।।

प्रपंच हा खोटा मृगपणी घोरे फिरतो प्राणी  ।
कन्या- सुत- दारा - धन माझे मिथ्या वदतो वाणी ।
अंती नेतील, यमदूत, नये सांगे कोणी ।
निर्गुण रेणुका भवानी जपतो मी निर्वाणी । लोलो लागला ।। १ ।।

पंचभूताचा अधिकार, केलासे सत्वर ।
नयनी देखीला आकार अवघा तो ईश्वर ।
नाही सुख दु:ख देहाला, कैसा अहंकार ।
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार । लोलो लागला ।। २ ।।

ध्याता मुद्रा ही उन्मनी, लागे अणुसंधानी ।
निद्रा लागली अभिधानी, जे का निरंजनी ।
लीला वर्णिता स्वरूपाची, शिणली शेषवाणी ।
देखिली भवानी, जननी, त्रैलोक्यपावनी । लोलो लागला ।। ३ ।।

गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा ।
दिवट्या उजळीनं सदोदित पोत चैतन्याचा ।
आहं सोहं सो उदो उदो बोलती चारी वाचा । लोलो लागला ।। ४ ।।. 

पाहता मूळपीठ पर्वत सकळा मध्ये श्रेष्ठ ।
जेथे जगदंबा अवधूत वाघे भोपी भट ।
जेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट ।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ । लोलो लागला ।। ५ ।।
----------------------------------------------------------------------------

6. जय जय नदिपतिप्रियतनये । 


जय जय नदिपतिप्रियतनये । भवानी महालक्ष्मी माये ।।धृ ।।
आदि क्षीरसागर रहिवासी । जय जय कोल्हापूरवासी ।
आंबे भुवनत्रयी भ्रमसी । सदा निजवैकुंठी वससी ।
दुर्लभ दर्शन अमरासी । पावशी कशी मग इतरांसी ।
करुणालये मोक्षदानी , भक्त जे परम, जाणती वर्म सदा पदी नर्म ,
कृपेने त्यासि सदा पाहे । संकटी रक्षिसी लवलाही ।। जय जय ।। १ ।।

अमरेश्वर, विधी हरि-हर ।। मिळाले असुरांचे भार ।।
मंदाचल नाग रवी थोर, केला वासुकीचा दोर ।।
ढवळीला सागर गरगर । रगडीले  जलचर मीन मगर ।।
लाजती कोटी काम पोटी, तुझे सौंदर्य, गळाले धैर्य, म्हणती सुर आर्य , 
जाळितो रतिपती सोसू नये । होता जन्म तुझा सुनये । जय जय ।। २ ।।

त्रिभुवनी स्वरूपे तू आगळी । वरिलासी त्वा वनमाळी ।
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी ।।
न मिळे स्पर्श हि पदकमळी । पदराज लागो तरी भाळी ।।
पितांबर शोभतसे पिवळा, बहर जरतार, हरी भरतार, तरी मज तार,
स्तविता तुज जरि गुणग्राहे दशशतवदनाही भ्रम ये । जय जय ।। ३ ।।

सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानी ।
दृढासन घालुनी निर्वाणी । बैसले महामुनी तापी ध्यानी ।
जरी मी मंदबुद्धी जननी । तुझे गन वर्णू कसे वदनी ।।
जरी हा विष्णुदास तुझा, बहू अपात्र, करी सुपात्र कृपा तिळमात्र, 
करोनि मोक्षपदी वाहे । आंबे लवकर वर दे ये । जय जय ।। ४ ।।   
-----------------------------------------------------------------------------

७. ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ धृ ।।

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ जय देवी जय देवी...॥ १ ।।


मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥ जय देवी जय देवी...॥ २ ।।

तारा सुगतागमीं, शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥ जय देवी जय देवी...॥ ३ ।।

अमृतभरिते सरिते, अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी॥ जय देवी जय देवी...॥ ४ ।।

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते, माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥ जय देवी जय देवी...॥ ५ ।।
---------------------------------------------------------------------------

८. आरती त्रिपुरसुंदरीची । अंबामाय रेणुकेची ।


आरती त्रिपुरसुंदरीची । अंबामाय रेणुकेची । । धृ ।।

मस्तकी कुंकुमाची शोभा । लल्लाटी शोभे मृगनाभा ।
नाकी मौक्तिकाची प्रभा । नृत्य करी पुढे रंभा ।
(चाल ) मेले आले योगिनीचे । चरण वंदिती अंबिकेचे ।
गाणे सुरस तुंबाराचे । कात्यायनि गति । येउणी गणपती ।
चकित सरस्वती । वाणी मग खुंटली शेषाची ।
वार्ता काय मानवाची ।।१।।

ऐसा तिचा गन महिमा । या काळे योजना जनसीमा ।
हरी-हर चरण वंदी ब्रम्हा । अंकी बैसवी परशुराम ।
(चाल) पाहे रहाट सृष्टीची । भक्ती जी जैसी असे ज्याची ।
वासना पुरवी मनोरथाची । लागली आस । तरी भक्तास । दिसे आभास ।
गांठ मग पडली सद्गुरूची । वाट दाखवी नीजचरणाची ।। २ ।।

कैलासपुरी वास तिचा । अवतार धरिला रेणुकेचा । 
नाश शुंभ-निशुंभाचा । महिषासुरादि कपटांचा ।
(चाल ) करुनि बैसली मुळपीठी । येति सूर तहतीस कोटी ।
करिती सुमनांची वृष्टी । ब्राह्मणादि । गावं आनंदी ।
राहे स्वच्छंदी । सीमा झाली वर्णनाची । उपमा देऊ कोणाची ।। ३ ।।

पिवळा पितांबर नसे पिवळी चोळी अंगी विलसे ।
लगबग लगबग धावतसे । आपल्या भक्ता पाहतसे ।
(चाल ) यात्रा आली कार्तिकाची । अंकित झाली प्रेमळाची ।
गर्जना होत संबळाची । वाद्ये वाजती । 
भक्त नाचती । किर्ती  वर्णिती ।   
करिती स्तुती अपर्णेची । अपरंपार लीला तिची ।। ४ ।।

सत्व- रज तमोगुना । प्रसवे सावयव निगमागमा ।
माहेश्वरांची हि उमा । विष्णूची झाली रमा ।
(चाल ) सावित्री हि विरंचीची । कांता  झाली  कश्यपाचि ।
नट नाटकी शक्ती साचि । हिच रेणुका । त्रिभुवन नायिका ।
विसरू नका । वासना पुरवील दासाची ।
चला रे भक्ती करू तिची ।। आरती त्रिपुरसुंदरीची ..... ।। ५ ।।
-------------------------------------------------------------------------

९. जय जय भवानी - रेणुका माता आरती 


जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवदा भुवनांची 
स्वामींनी महिषासुरमर्दिनी ।। जय जय भवानी ।। धृ ।।

पायी घागरिया, घुळघुळ , नाकी मुक्ताफळं । माथा केश हे, 
कुरळ नयनी या काजळ ।। १ ।।

नेसूनि पाटाऊ पिवळा, हार शोभती गळा । हाती घेऊनिया 
त्रिशूळा, भाळी कुंकुम टिळा ।। २ ।।

अंगी लेउनीया काचोळी । वर मोत्याची जाळी । हृदयि शोभतसे , 
पदकमळी  कंठी हि गरसोळी ।। ३ ।।

सिंहावरी तू बैसूनि , मारिसी दानव  गण । तुजला विनवीतसे ,
निशिदिनी, गोसावी नंदन ।। ४ ।।
__________________________________________________

१०. विपुल दयाघन गर्जे तव ह्रुदयाम्बरी श्री रेणुके हो


विपुल दयाघन गर्जे तव ह्रुदयाम्बरी श्री रेणुके हो ।
पळभर नरमोराची करुणावाणी  हि आयके हो  ।। धृ ।।

श्रमलीस खेळुनि नाचुनि गोंधळ घालुनी ब्रह्मंगणी हो ।
निजलिस कशी दिनाची चिंता सोडूनि अंत:करणी हो ।
उठ लवकर जगदंबे  अंबे त्रैलोक्याची तू स्वामींनी हो ।
विधी-हरी-हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी हो ।
समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके हो ।। १ ।।

शरणागत मी आलो परी बहू चुकलो बोलावया हो ।
तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया हो ।
परी तू जणनी दिनांची  अनाथांची तुज दया हो ।
हि श्रुती सत्य असत्या कि अनुभव आलो मी पहावया हो ।
कळेल तैसे करी परी निज ब्रीद रक्षी मा पालिके हो ।। २ ।।

भगवंदे पिडलो भारी मजला दु:ख हे सोसेना हो ।
अजुनी अंबे तुजला माझी करून का येईना हो ।
तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना हो ।
कृपा केल्या वाचूनि विन्मुख परतुनी मी जाईना हो ।
तुजविण जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबिके हो ।। ३ ।।

ऐकुनी करुणावानी हृदयी सप्रेम द्रवली  हो ।
प्रसन्नमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो ।
अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो ।
भक्तांकित अभिमानी विष्णूदासाची माउली हो ।
जी निजइच्छा माते सूत्रे हालवी कवतुकें हो ।। ४  ।।
----------------------------------------------------------------------------

११. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥ जय देवी

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥ जय देवी

--------------------------------------------------------------------------


१२. सुहास्य वदन कमल नयनी



सुहास्य वदन कमल नयनी । भाळी कुंकुम कुंडल कानी ।
कंकण मुगट प्रभा रमणी । अशी सौंदर्य मूर्ती चिमणी ।।
।। चाल ।। आयुधे खड़ग करी झळके । तेज लखलखीत ।
अलंकार शोभित, रूप घवघवीत । वाक्या रुणझुणीत ।
झळकती जाळी मोतियांची । जगत्रय जननी भाविकाची ।। १ ।।


आरती जय जगदंबेची आंबा माय आनंदाची ।। धृ ।।


प्रगटली अष्ट दश हस्ता । महिषासुराशी वधी माता ।
दैत्य बळें बहू नावरता । ताटकी त्रिशुल शीघ्र त्वरिता ।
।। चाल ।। समयी त्या पुष्पवृष्ठी वहिले । मारिला काळ ।
माय कणवाळ। सगुण दयाळ । करी सांभाळ । 
बालके भावे नम्रसाची । अनादी सिद्ध साधकाची ।। २ ।।

आरती जय जगदंबेची आंबा माय आनंदाची ।। 

ब्रम्हा हरिहर नरध्याती । योगिजन निमग्न ते राहती ।
चार सहा अठरा वर्णिती । नारद तुंबर गूण गाती ।
।। चाल ।। संगीत नौबत घनगर्जे । टाळ खणखणीत ।
वीणा किणकिणीत । मृदंग धुमधुमीत । 
लागली ध्वनी वाद्यांची । देवादिक तन्मय होती ।। ३।।

आरती जय जगदंबेची आंबा माय आनंदाची ।। 

रेणुके नमन भावे पायी । पंढरीनाथ दृष्टी पाही ।
मागे माणिक धन कांही ।भक्ता वरदान त्वरे देई ।
।। चाल ।। आजपी निमग्न मन रमले । कीर्तनी दंग ।
भजन अभंग । दास आपंग । विघ्न करी भंग ।
काळ हो दंग पाहताची । आवडी दे गुरु पायाची ।। ४ ।। 

आरती जय जगदंबेची आंबा माय आनंदाची ।। 
-----------------------------------------------------------------------

१३. 

---_-------------_----------

१४. श्री जगदंबेची कापूर आरती 

कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला |
भवानी ओवाळु तुजला |
देहंभावे अहंकार (२) चरणी वाहीला तुजला|| ध्रु||


सप्तशतीच्या पाठे अंबे कृपा मज केली |
रेणुके कृपा मज केली |

भक्ता वर द्याया (२) अंबा प्रसन्न झाली || १ ||

दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती ।
रेणुके उजळल्या ज्योती |

स्वंय प्रकाशीत (२) पाहिली अंबेची मुर्ती ||२||


आनंदाने भावे कापुर आरती केली|
रेणुके कपूरआरती केली|

भक्ती भावे सेवा 
प्रेमभावे सेवा आईच्या चरणी वाहिली || ३||
-------------------------------------


1. जय अम्बे गोरी


जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी ।
तुमको निशि दिन ध्यावत, हरि ब्रह्मा शिवरी ।। धृ ।।

मांग सिंदूर विराजत, टीको मृगमद को ।
उज्ज्वल से दोउ नैना, चन्द्रवदन नीको ।।

कनक समान कलेवर, रक्ताम्बर राजै ।
रक्तपुष्प गल माला, कंठन पार साजै ।।

केहरि वाहन राजत, खडूग खप्पर धारी ।
सुर – नर मुनिजन सेवत, तिनके दुखहारी ।।

कानन कुण्डल शोभित, नासाग्रे मोती ।
कोटिक चन्द्र दिवाकर, राजत सम ज्योति ।।

शुम्भ निशुम्भ विदारे, महिषासुर घाती ।
धूम्र विलोचन नैना, निशदिन मतमाती ।।

चण्ड – मुण्ड संहारे, शौणित बीज हरे ।
मधु – कैटभ दोउ मारे, सुर भयहीन करे ।।

ब्रह्माणी, रुद्राणी, तुम कमला रानी ।
आगम निगम बखानी, तुम शिव पटरानी ।।

चौंसठ योगिनी गावत, नृत्य करत भैरु ।
बाजत ताल मृदंगा, अरु बाजत डमरू ।।

तुम ही जग की माता, तुम ही हो भरता ।
भक्तन की दुःख हरता, सुख सम्पत्ति करता ।।

भुजा चार अति शोभित, वरमुद्रा धारी ।
मनवांछित फल पावत, सेवत नर नारी ।।

कंचन थाल विराजत, अगर कपूर बाती ।
श्रीमालकेतु में राजत, कोटि रतन ज्योति ।।

अम्बे जी की आरती, जो कोई नर गावे ।
कहत शिवानन्द स्वामी, सुख – सम्पत्ति पावे ।।

------------------------------------------------------------------------------

2. अम्बे तू है जगदम्बे काली


अम्बे तू है जगदम्बे काली,
जय दुर्गे खप्पर वाली,
तेर ही गुण गायें भारती,
ओ मैया हम सब उतारे तेरी आरती ।।

तेर भक्त जानो पर मैया भीड़ पड़ी है भारी,
दानव दल पर टूट पड़ो माँ कर के सिंह सवारी
सो सो सिंघो से है बलशाली,
है दस भुजाओं वाली,
दुखिओं के दुखड़े निवारती ।।

माँ बेटे की है इस जग में बड़ा ही निर्मल नाता,
पूत कपूत सुने है पर ना माता सुनी कुमाता
सबपे करुना बरसाने वाली,
अमृत बरसाने वाली,
दुखिओं के दुखड़े निवारती ।।

नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना,
हम तो मांगे माँ तेरे मन में एक छोटा सा कोना
सब की बिगड़ी बनाने वाली,
लाज बचाने वाली,
सतिओं के सत को सवारती ।।
--------------------------------------------------------

3. जय वैष्णवी माता,
मैया जय वैष्णवी माता ।


जय वैष्णवी माता,
मैया जय वैष्णवी माता ।
हाथ जोड़ तेरे आगे,
आरती मैं गाता ॥
॥ जय वैष्णवी माता..॥
शीश पे छत्र विराजे,
मूरतिया प्यारी ।
गंगा बहती चरनन,
ज्योति जगे न्यारी ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

ब्रह्मा वेद पढ़े नित द्वारे,
शंकर ध्यान धरे ।
सेवक चंवर डुलावत,
नारद नृत्य करे ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

सुन्दर गुफा तुम्हारी,
मन को अति भावे ।
बार-बार देखन को,
ऐ माँ मन चावे ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

भवन पे झण्डे झूलें,
घंटा ध्वनि बाजे ।
ऊँचा पर्वत तेरा,
माता प्रिय लागे ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

पान सुपारी ध्वजा नारियल,
भेंट पुष्प मेवा ।
दास खड़े चरणों में,
दर्शन दो देवा ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

जो जन निश्चय करके,
द्वार तेरे आवे ।
उसकी इच्छा पूरण,
माता हो जावे ॥
॥ जय वैष्णवी माता..॥

इतनी स्तुति निश-दिन,
जो नर भी गावे ।
कहते सेवक ध्यानू,
सुख सम्पत्ति पावे ॥

जय वैष्णवी माता,
मैया जय वैष्णवी माता ।
हाथ जोड़ तेरे आगे,
आरती मैं गाता ॥

तुम्हाला देवीचे वेगवेगळे स्तोत्रे पण नक्कीच आवडतील. 














Comments

Post a Comment