Kapur Aarati -Dhup Deep Zala Aata Kapur Aarati - धूप दीप झाला आता कापुर आरती

कर्पुर आरती 

कापुर आरती - धूप दीप झाला आता कापुर आरती


धूप दीप झाला आता कापूर आरती ।
देवा कापूर आरती ।।
रत्नजडित सिंहासनी भगवंता मूर्ती । ।धृ ।।

कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे । । 
देवा मानस राहू दे ।।
कर्पूरासम भावभक्तीचा सुगंध वाहू दे ।
धूप दीप झाला आता कापूर आरती ।।१।।

कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती ।। देवा पाहीन तव मूर्ती ।।
नयनी साठवू ही भगवंत मूर्ती ।
धूप दीप झाला आता कापूर आरती ।। 2 ।।

ज्ञान कळेना ध्यान कळेना । कळेना काही ।। मजला ना कळे काही ।।
शब्दरूपी गुंफूनी माळा  वाहतसे पायी ।
धूप दीप झाला आता कापूर आरती ।।3।।

नेत्री ध्यान मुखी नाम हृदयी तव मूर्ती ।। 
देवा हृदयी तव मूर्ती ।।
भावभक्तीने केली देवा  कापूर आरती
धूप दीप झाला आता कापूर आरती ।। 4 ।।

Comments