प्रसाद हा मज द्यावा देवा: Prasad ha maj dyava deva

हिंदू धर्मात पुजेच्या किंवा आरतीच्या वेळी आधी देवाला नैवैद्य अर्पण करण्याची प्रथा आहे, नैवैद्य म्हणजे आपला दृढ निश्चय जो आपण देवा समोर आणि फक्त देवा समोरच बोलून दाखवतो. आज काल अशी धारणा आहे की देवा समोर फळ, फुल मिठाई ठेवल्याने देव प्रसन्न होतो किंवा आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते , पण तसे नसून आपला दृढ निश्चय हाच देवाला अर्पण केलेला नैवैद्य असतो..
हाच नैवैद्य जेंव्हा देवाकडून किंवा गुरूकडून भक्तांमध्ये आशिर्वाद रूपाने वाटला जातो तेंव्हा त्याला प्रसाद असे संबोधले जाते ..त्याच प्रसादाचे हे गीत आहे ...तो प्रसाद कसा असावा ....या निमित्याने देवा मला तुझा सहवास कायम घडावा..  प्रत्येकाने हे गीत आत्मसात केलेच पाहिजे ...एवढे सुंदर गीत आहे हे ... धन्यवाद..तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा .
Prasad ha maj dyava deva
प्रसाद हा मज द्यावा देवा 

प्रसाद हा मज द्यावा देवा, 
प्रसाद हा मज द्यावा देवा |
सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||ध्रु||

निशिदिनी  तव मी नाम स्मरावे,
वियोग ना तव व्हावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||१||

हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी, 
जन्म मृत्यू चुकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||२||

हृदय मंदिरी तुवा बैसूनी,
ज्ञानयोग शिकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||३||

आत्म सुखास्तव प्रसाद द्यावा,
विसर तुझा न पडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा 
सहवास तुझाची घडवा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||४||


तुम्हाला प्रसाद मिळाल्यावर शेजारती  म्हणायला नक्कीच आवडेल 

Comments