वाहू सुमने तव पद कमली - मंत्रपुष्पांजली: waahu sumane tav pad kamali - mantrapushpanjali


वाहु सुमने ताव पद कमळी 
 

मंत्रपुष्पांजली: 

खर तर आरती झाल्यावर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो, पण ती का म्हणावी? हे समजले तर ती म्हणायला आपल्याला खूप छान वाटणार यात शंकाच नाही ! 
आपण जी आरती देवाला ओवळत असतो त्याच आहुतीत आपण आपल्या सर्व वासना समर्पित करून एक नवीन तेज, ऊर्जा आपल्या सोबत घ्यायची असते जेणे करून त्यानिमित्ताने आपल्याला परमेश्वराचा सहवास, त्यांच्या लीलांचा अर्थ हळू हळू कळू लागेल आणि शेवटी जगात परमेश्वरा जवळ पोहोचण्यासाठी स्वता: ला त्या परमेश्वराच्या पायावर समर्पित करण्यासाठी हा छोटा प्रयास असतो ...

वाहू सुमने तव पद कमली 
प्रणाम करू या हो....|
आत्मसुखाची हीच पाऊले 
हृदयी धरू या हो....|
मानुनी घ्यावी सेवा आमुची 
अल्पत ही सारी....|
सद्गुरू राया प्रसन्न व्हावे 
भक्ताला तारी ....|
भक्त वत्सला तुझ्या कृपेची 
छाया दे राया....| 
त्रिभुवनी नाही तुजविन आम्हा  
कोणी रक्षाया....|
बेल फुले ही हाती घेऊन 
मंजुळ तुळशीची 
जाई जुई ची वाहू सुमने 
पुष्प गुलाबाची ...|
बहुविध सुमने चरणी वाहू 
सुवास दरवळला ....|
नित्य सुखाची द्यावी गोडी 
अजाण भक्ताला ....|
शक्ती बुद्धी दे मन: शांती दे
तुजसी वंदाया ....|
कृपा प्रसादे तू जगदिशा 
उद्धरशी काया....|
वाहू सुमने तव पद कमली 
प्रणाम करू या हो....|
आत्मसुखाची हीच पाऊले 
हृदयी धरू या हो....|


अजून एक मंत्र पुष्पांजली तुम्हाला नक्कीच आवडेल 



Comments