श्री कृष्णाची आरती - ओवाळू आरती मदनगोपाळा - Ovalu Aarati MadanGopala



ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार 
॥ ध्रु  ॥

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥१ 
॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।
ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥२ 
॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।
वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ३ 
॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।
तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ४ 
॥

एका जनार्दनी देखियले रूप।
रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ५ ॥



Comments

Post a Comment

तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा