श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार ॥ ध्रु ॥
ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥१ ॥
नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।
ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥२ ॥
मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।
वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ३ ॥
जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।
तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ४ ॥
एका जनार्दनी देखियले रूप।
रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥
ओवाळू आरती मदनगोपाळा...॥ ५ ॥
https://youtu.be/Yotj17-KAGE
ReplyDelete