मिठा पीठाचा जोगवा, चला सयांनो लवकरी जायचं मला माहूरगडच्या बाजारी हो जायचं मला माहूरगडच्या बाजारी
माहूरगडला जाईन हिरवा चुडा घेईन, आईला चुडा भरीन लवकर परत येईन, लवकर परत येईन ॥१॥
मला जायचंय दूरवरी बाई, माहूरगडच्या बाजारी
माहूर गडाला जाईन वरण पुरण करीन देवीला नैवेद्य दाविन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥२॥
चला सयांनो लवकरी जायचं मला माहूरगडच्या बाजारी हो जायचं मला माहूरगडच्या बाजारी
एका जनार्दनी माहूरगडला जाईन हार बुक्का वाहीन, माय माऊली भेटेन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥३॥
Comments
Post a Comment
तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा