Laksh Koti Chand Kiran - लक्ष कोटी चंड किरण- Renuka Ashtak:

नमस्कार, तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे या अष्टकाचा अर्थ मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला तो कसा वाटतो आवर्जून मला कळवा .... धन्यवाद!!!

Renuka Mata
Renuka Mata Mahor, Nanded, Maharashtra

धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका 

महाराष्ट्र ही संतांची भूमी. अनेक संतांनी इथे जन्म घेऊन मानव कल्याणाचे महत्त्वाचे कार्य केले आहे, तोच वारसा या आधुनिक काळातही सांभाळत आपल्या बहुआयामी काव्य लिखाणातून देवी भक्तीचा प्रसार व प्रचार करण्याचे मह्त्वपूर्ण कार्य श्री संत विष्णुदास महाराज ज्यांना आपण विष्णुकवी म्हणूनही ओळखतो, यांनी केले आहे. 
आपल्या काव्यातून नेहमीच आई - लेकराचे नाते निर्माण करणाऱ्या विष्णुदासांचे एक अष्टक आणि त्याचा अर्थ आपण इथे बघणार आहोत. अष्टक हे संस्कृत शब्द अष्टकम वरून आलेला आहे, त्यात अष्टकं म्हणजे आठ , यात आठ कडवे आहेत , प्रत्येक कडवे हे ४-४ ओळींचे असून प्रत्येक ओळ ही एका विशिष्ट पद्धतीने ओवीबद्ध केलेली आहे. 
या अष्टकात कवी विष्णुदास काय म्हणतात ते आपण बघुयात.

लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती | 
अंब चंद्र वदन बिंब दीप्तीमाजि  लोपती |
सिंह शिखर अचल वासी मूळपीठ नायिका |  
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका   ll 1 

कवी विष्णुदास आपल्या पहिल्या चरणात असे म्हणतात की लक्ष कोटी असे अगणित चंद्राचे किरण आणि परावर्तित प्रतिबिंबे सर्वदूर पसरलेले आहेत आणि त्या चंद्राच्या प्रकाशात अंबेचे मुख उजळून निघाले आहे, ते खूप प्रसन्न, मोहक आणि तेजस्वी दिसत आहे. जी की सिंह शिखरावर अशा ठिकाणी बसली आहे की जेथून तिला कोणीही उठ म्हणू शकत नाही अशा मूळपीठ नायिकेचे वदन खूप दैदिप्यमान दिसत आहे. जी धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची  (कल्पवृक्ष अशी माता आहे. हे पुरुषार्थ मिळण्यासाठी सर्व ऋषींनी खूप प्रयत्न केले आहेत पण चारही पुरुषार्थ असलेला ऋषी अजून पर्यंत होणे नाही) 

आता विष्णुदास पुढच्या कडव्या मध्ये देवीचे वर्णन करतात कि जिच्या सूर्याचे तेज असलेल्या शरिरावर दिव्य कुंडले  कानात तर गळ्यामध्ये वेगवेल्या फुलांचे पुष्पहार फार गर्दी करून आहेत, हातांच्या दंडात बाजूबंद, हातात वेगवेगळ्या गोठ, पाटल्या अश्या आठ प्रकारच्या बांगड्या तर बोटात सोन्याच्या वेगवेगळ्या मुद्रिका म्हणजेच अंगठ्या आहेत.
तसेच रत्न, माणिक, हिरे यांचा गळ्यात थाट काही वेगळाच आहे.  चंद्रहार बोरमाळ अश्या अनेक हारांनी रेणुका अगदी पायापर्यंत नटलेली आहे. तसेच पायातील आभूषणांची काही वेगळीच तऱ्हा की ज्यामुळे रेणुकेचे पाय पूर्णपणे लपल्या गेले आहेत. 

आकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले | 
डोलताति पुष्पहार भार फार दाटले | 
अष्टदांडि बाजूबंदी कांकणादि मुद्रिका | 
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका ll 2 ll

इंद्रनीळ पद्मराग पाचहीर  वेगळा | 
पायघोळ बोरमाळ चंद्हार वेगळा | 
पैंजणादि  भूषणेचि लोपल्याति  पादुका | 
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका  ll 3 ll

अश्या या रेणुकेला इंद्र, चंद्र, विष्णू, ब्रम्ह, नारद आणि सगळेच वंदन करतात, जी आदि पासून अंतापर्यंत सर्वांचीच पूजनीय अशी शक्ती माता भगवती आहे, जिने प्रचंड अश्या चंड मुंड राक्षसांचा वध केलेला आहे.

इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि  वंदिती |  
आदि अंत ठावहीन आदि शक्ती भगवती | 
प्रचंड चंडमुंड खंड विखंडकारि अंबिका | 
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका  ll 4 ll

पुढे विष्णुदास म्हणतात, पर्वतावरील पक्षी सुद्धा अंबे अंबे म्हणून संबोधतात आणि विशाल शाल नावाचे खूप उंच, टणक आणि अतिशय उपयुक्त असा भारताच्या जंगलात आढळणारे वृक्ष, ते ही मनातल्या मनात भवानीचे नाव घेऊन डोलत असतात.

पर्वताग्रवासी पक्षि अंब  अंब बोलती | 
विशाल शालवृक्ष रानि ध्यानी मनि डोलती | 
अवतारकृत्यसार जडमुढादि  तारका |  
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका  ll 5 ll

जी अनंत अश्या ब्रम्हाडाच्या पोटी पूर्वेकडे तोंड करून बसली आहे, जिच्यात अनंत असे गुण आणि अनंत अशी शक्ती आहे, तीं विश्वाची माऊलीच आहे, जिच्या उजव्या बाजूस दत्त  मुलगा आणि डाव्या बाजूस अत्री ऋषी जे की त्यांचे पती आहेत ते बसलेले आहेत.

अनंत ब्रम्हांड कोटि पूर्वमुखा बैसली | 
अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननि भासली | 
सव्यभागि दत्त अत्री वाम भागि कालिका | 
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका ll 6 ll

असे हे पवित्र मातेचे क्षेत्र म्हणजेच माहूर गड (महाराष्ट्र नांदेड जिल्हा) इथे आल्यावर त्यांना खूप धन्य वाटते आणि स्वतः च्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. 

पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी | 
अंब दर्शनासि भक्त - अभक्त येति आश्रमी | 
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका | 
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका  ll 7 ll


Comments

  1. Ashe sanskar phar kami baghayla miltat aajkal
    Great matrutva

    ReplyDelete
  2. May i know the detailed word to word meaning of this vishudasa krita renuka ashtakam meaning🙏🙏

    ReplyDelete
  3. Possible send me a mail of meaning @ goudmyasa@gmail.com thanq

    ReplyDelete

Post a Comment