Manache Shlok 21-30 |
मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥२१॥
मना सज्जना हीत माझें करावें ।
रघुनायका दृढ चित्ती धरावें ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥
न बोलें मना राघवेवीण कांहीं ।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं ॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥२३॥
रघुनायकावीण वांया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥
मना वीट मानू नको
बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणाकारणे यत्न
केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय
भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम
कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा
ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
समर्थाचिया सेवका
वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
|| जय जय रघुवीर समर्थ ||
पुढे वाचा...
मनाचे श्लोक 1 - 10
मनाचे श्लोक 11 - 20
मनाचे श्लोक 31 - 40
Comments
Post a Comment