Manache shlok 01 - 10: रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक :

मनाचे श्लोक म्हणजेच आपल्याच मनाशी संवाद कसे वागावे, कडे राहावे , कसे ल्यावे, काय करावे, यांचे मार्गदर्शन श्री समर्थांनी 205 ओव्यां मधून रचून ठेवले आहे. ..ते वाचताना मन लाऊन वाचावे. .

Manache shlok- 1-10

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ||
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |
गमू पंथ आनंत या राघवाचा ||१||

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||
जनि निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे |
जनीं वंद्य तें सर्व भावे करावे ||२||

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना धर्मथा नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी ।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी ॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥

|| जय जय रघुवीर समर्थ ||

To be continue....





Comments