श्री विष्णूची आरती- Shree Vishnu Aarati

Shree Vishnu Bhagawan Aarati 


आवडी गंगाजळे देवा न्हाणीले | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले | अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे | 
जंव जंव धूप जळे | 
तंव तंव देवा आवडे | रमावल्लभदासे अहं धूप जाळिला| 
एकारतीचा मग प्रारंभ केला | सोहं हा दीप ओवाळू गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा | 
हरीख हरीख हा तो मुख पाहतां | चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था | 
सद्भवालागी बहु हा देव भुकेला |रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला | 
फल तांबूल दक्षिणा अर्पीली |
 तयाउपरी नीरांजने मांडिली ||
 आरती आरती करू गोपाळा | 
मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ || 
पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली | 
दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी |
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें |
सुरवर सकळीक तटस्थ ठेले | देवभक्तपण न दिसे कांही |
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||

Comments

Post a Comment