Shree Ramachi Kapur Aarati

श्री रामाची कर्पुर आरती 

Shree Rama Karpur Aarati 


धूप दीप झाला आता कर्पूर आरती । रामा कर्पूर आरती ॥
छत्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ||
धूप दीप झाला आता कर्पूर आरती ॥ धृ ॥

कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे । रामा निर्मळ राहू दे ॥
कर्पूरवडीसम 
भावभक्तिचा सुगंध वाहू दे । रामा सुगंध वाहू दे ॥
कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति । रामा पाहीन तव मूर्ति ॥
धूप दीप झाला आता कर्पूर आरती ||१||

ध्यान कळेना, ज्ञान कळेना ना कळे काही । रामा ना कळे काही ॥
शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी । रामा वाहतो पायी ॥
मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति । रामा हृदयी तव मूर्ति ॥
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ २ ॥

Comments