शुभंकरोती म्हणा मुलांनो - ShubhamKaroti Mhana Mulano



दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना 
शभंकरोती म्हणा मुलांनो शुभंकरोती म्हणा! 
शुभंकरोति कल्याणम् , शुभंकरोति कल्याणम् ||ध्रु ||

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी 
उभी जगाच्या सेवाधर्मी 
दिशा दिषातूनी या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा || शुभं करोति म्हणा मुलांनो ||१||

या ज्योतीने सरे आपदा 
आरोग्यासह मिळे  संपदा 
शत्रुबुधीचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना|| शुभं करोति म्हणा मुलांनो ||२||

दिव्या दिव्या रे दिपत्कार  
कानी कुंडल मोतीहार 
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज  आहे जुणा||शुभं करोति म्हणा मुलांनो ||३||







Comments