श्री संत गजानन महाराज शेगांव , महाराष्ट्र |
श्रीमत् सदगुरु स्वामी जय जय गणराया| आपण अवतरला जगि जड जीव ताराया ||ध्रु ||
ब्रम्ह सनातन जे का ते तू साक्षात् | स्थावर - जंगमि भरला तुम्ही ओतप्रोत ||
तव लीलेचा लागे कवणा नच अंत | तुझ वणाया उरले शब्दही भाषेत ||१||
वरिवरि वेडेपण ते धारण जरी केलें | परि सत्स्वरुपा आपुल्या भक्ता दाखविले ||
निर्जल गर्दाडासी जल ते आणविले | बिहग नभीच काननि आज्ञेत वागविले ||२||
दांभिक गोसव्याते प्रत्यय दाऊन | ज्ञानीपणाचा त्याचा हरिला अभिमान ||
ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन | नर्मदेचे भक्ता करविले आपण || ३ ||
अगाध शक्ती ऐशी तवं सद्गुरू नाथा | दुस्तरशा भवसागरी तरण्या दे हाता |
वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता | दासगणूच्या ठेवा वरद माथा || ४ ||
Comments
Post a Comment