Karuna Tripadi : करुणा त्रिपदी


करुणा त्रिपदी


१. शांत हो श्रीगुरुदत्ता

शांत हो श्रीगुरुदत्ता | मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता | सर्वथा तूं हितकर्ता ।
तूं आप्तस्वजन भ्राता | सर्वथा तूंचि त्राता ।
भयकर्ता तूं भयहर्ता | दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ शांत हो || १॥

अपराधास्तव गुरुनाथा | जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्हीं गाउनि गाथा | तव चरणीं नमवूं माथा ।
तूं तथापि दंडिसि देवा | कोणाचा मग करुं धावा ।
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता || शांत हो ॥ २॥

तूं नटसा होउनि कोपी | दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकतो तथापि | आम्हांवरि न च संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि | असें मानुनी नच हो कोपी।
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता || शांत हो ॥३॥

तव पदरीं असता ताता | आडमार्गीं पाउल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता | आणिता न दुजा त्राता ।
निज बिरुदा आणुनि चित्ता | तूं पतितपावन दत्ता ।
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा || शांत हो॥४॥

सहकुटुंब सहपरिवार | दास आम्ही हें घरदार।
तव पदी अर्पूं असार । संसारा हित हा भार ।
परिहरिसी करुणासिंधो | तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव -प्रार्थित दत्ता ।। शांत हो ॥ ५ ॥

२. श्रीगुरुदत्ता जय भगवंता 

श्रीगुरुदत्ता जय भगवंता |
तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥

चोरें द्विजासी मारितां मन जें | 
कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥

पोटशुळानें द्विज तडफडतां | 
कळवळले ते कळवळो आता ॥२॥

द्विजसुत मरतां वळलें तें मन | 
हो की उदासीन न वळे आतां ॥३॥

सतिपति मरता काकुळती येतां |
वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥

श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता | 
कोमल चित्ता वळवी आता ॥५॥

३. जय करुणाघन निजजनजीवन

जय करुणाघन | निजजनजीवन अनसूयानंदन  पाहि जनार्दन ॥ध्रु.॥

निजअपराधें उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥

तूं करुणाकर कधी आम्हांवर । 
रुससी न किंकर वरद कृपाघन ॥२॥ जय..

वारी अपराध तूं मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥३॥

बालकापराधा गणे जरि माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥

प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥

जय करुणाघन | निजजनजीवन अनसूयानंदन | पाहि जनार्दन 

तुम्हाला हे वाचायला नक्कीच आवडेल 









Comments