Karito Preme Tuj Niranjan - करितो प्रेमे तुज निरांजन: दत्तात्रय गीत

Dattatray Geet 

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन। 

दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥ 

धरतीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व। 

कामक्रोधादिकरिपुवर्गे व्यापुनि सगर्व। 

योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व। 

सुलभपणे निजभजने त्यांसी उद्धरी जो सर्व॥१॥

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन। 

दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ||

अत्रिमुनीच्या सदनी तीनी देव भुकें येती। 

भिक्षुक होउनी अनुसूयेप्रति बोलति त्रयमूर्ती। 

नग्न होउनी आम्हांप्रति द्या अन्न असें वदति। 

परिसुनि होऊनी नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन। 

दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ||

दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रथमेंद्र !!

ब्रह्मदेव तो चंद्र जाहला तो उपेंद्र !!

दत्तात्रेय जो वीतनित्र तो तारक योगींद्र !!

वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र ॥३॥

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन।

दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून 

Comments