खंडोबाची आरती - Khandobachi Aarati

 *खडोबाची आरती*

पंचांग हयवाहन सुरभूषण लिळा |
खंडा मंडित दंडित दानव अवलीळा |
मणिमल्ल मर्दुनी धूसर जो पिवळा |
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा ||१||

जयदेव जयदेव जय जय मल्हारी |
वारी दुर्जन हारी निंदक अपहारी ||ध्रु||

सुरवैरी संहारा मजलागी देवा |
नाना नामे गाईन घडो तुझी सेवा |
अगणित गुण गावया वाटतसे हेवा |
फणिवर शिणला जेथे नर पामर केवा ||२||
रघुविरस्मरणे शंकर हृदयी निवाला |
तो हा मदनांतक अवतार जाला
यालागी आवडी भावे वर्णिला |
रामी रामदासा जिवलग भेटला ||३||
श्री समर्थ रामदास स्वामी

Comments