कापुराची आरती करते प्रेमे सद्गुरुला भावे सद्गुरुला सच्चिदानंद रुप पाहूनी आनंद झाला देह कर्दळी उगाळुनी कापुर काढीला भक्ती वडी हाती घेऊन लाउ ज्योतीला ज्ञान ज्योती लाऊनिया ओवाळु गुरुला ... चिन्मय रुप पाहूनी तन्मय होते वारूला कापुराची आरती मी कोणा ओवाळु . जिकडे पाहावे तिकडे माझे सद्गुरु कृपाळु कापुराची आरती करते प्रेमे सद्गुरुला भावे सद्गुरुला सच्चिदानंद रुप पाहूनी आनंद झाला
Comments
Post a Comment