Khandoba Aarati- खंडोबाची आरती

khandobachi Aarati



पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा
खंडामंडित दंडित दानव अवळीला
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळ।।१।।


जय देव जय देव जय देव जय देव
जय देव जय देव जय शिव मल्हारी
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी
जय देव जय देव जय देव जय देव ।।धृ ।।


सुरवरसंवर वर दे मजलागीं देवा
नाना नामे गाइन ही तुमची सेवा
अघटित गुण गावया वाटतसे हेवा
फणिवर शिणला किती नर पामर केवा ।।२।।


जय देव जय देव जय देव जय देव
जय देव जय देव जय शिव मल्हारी
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी
जय देव जय देव जय देव जय देव ।।

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागीं आवडे भाव वर्णीला
रामी रामदासा जिवलग भेटला ।।३।।

जय देव जय देव जय देव जय देव
जय देव जय देव जय शिव मल्हारी
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी
जय देव जय देव जय देव जय देव ।।

Comments