शिवाजी महाराजांचा पाळणा - Shivaji Maharaj Cradle Song - तुज जोजविते माय जिजाई बाळा


तुज जोजविते माय जिजाई बाळा। निज रे निज लडिवाळा।। 
मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला। झोप का येईना तुजला।।

झोके देते गीते गाते अंगाई। तरी डोळा लागत नाहीं।।
बाळा असला थांबिव चाळा आतां। थकले मी झोके देतां।।
तूं महाराष्ट्राचा त्राता मनी धरली कसली चिंता
पाठीशी भवानी माता माउलिया जिवीचा जिव्हाळा।
निज रे निज लडिवाळा।।१।।

चल ठेव दुरी हातामधली ढाल। निद्रा करी तान्ह्या खुशाल।।
झोपली कशी बारा मावळी थेट। शिवनेर जुन्नर पेठ।।
निःशब्द कशी पसरली रे शांती। या मराठी भूमिवरती।।
बागुलबुवा आला काळा। झडकरी झोप रे बाळा॥
कोकणच्या चौदा ताली झोपल्या की घाटाखाली
आणि रान बहुतचि झाली किती सांग तुला समजावू वेल्हाळा। 
निज रे निज लडिवाळा।।२।।

Chatrapati Shivaji Maharaj Cradle Song 


Comments