Shivrayanche aathavave roop: शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचे आठवावे रूप


शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप |
भूमंडळी || १ ||

शिवरायांचे कैसें बोलणे |
शिवरायांचे कैसें चालणे |
शिवरायांची सलगी देणे |
कैसी असे || २ ||

सकल सुखांचा केला त्याग |
म्हणोनि साधिजें तो याग |
राज्यसाधनाची लगबग |
कैसीं केली || ३ ||

याहुनी करावें विशेष |
तरीच म्हणवावे पुरुष |
या उपरी आता विशेष |
काय लिहावे || ४ ||

शिवरायांसी आठवावें |
जिवित तृणवत् मानावें |
इहलोकी परलोकीं उरावे |
किर्ती रुपे || ५ ||

निश्चयाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु |
श्रीमंत योगी || ६ ||

 समर्थ रामदास स्वामी

Comments