बाळ कृष्णाचा पाळणा- यशोदेच्या तू नंदना - Yashodechya tu Nandana: Cradle Song

यशोदेच्या तू नंडणा Cradle Song 


यशोदेच्या तू नंदना किती विनवू तुला

झोके देतो तुला… बाळा जो जो रे जो जो रे

रत्नजडीत पाळण्याला नाना परी मी सजविला

मखमली गालीच्यात बाळा तुला मी निजविला

हाती घेऊनी रेशम दोरी झोका देते रे

बाळा जो जो रे जो जो रे, झोका देते तुला…

ऐकूण रडण्याचा सुर आला गौळणीचा मेळ

कुणी घ्यावे कडेवरती दृष्ट काढा हो लवकर

श्यामल खाना गोजरीवाणा रुसला खरा रे

बाळा जो जो रे जो जो रे, झोका देते तुला…

बाई यशोदेचा कान्हा काही केल्याने ऐकेना

नामा परी मी विनविले परी हट्ट तो सोडना

दास शंकर म्हणे गड्या रे सगुन तुझ्या न्यारे

बाळा जो जो रो जो जो रे, झोका देते तुला…

बाळा जो जो रे जो जो रे

यशोदेच्या तू नंदना किती विनवू तुला

– झोका देते तुला….

Comments