चिंधी बांधिते द्रौपदी- Chindhi Bandhite Draupadi

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटालाभरजरी फाडुन शेला
चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला || ध्रु||

बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला ||१||

म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालिता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला
चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला ||२||

प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !




Chindhi bandhate mi harichya botala


Comments