song

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥
हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२
असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरीं ॥४॥ 
listen the song

Comments