Renuka Devi Stotra : Ambe ek kari - अंबे एक करी उदास न करी

Ambe ek Kari - deviche Ashtak 


अंबे एक करी, उदास न करी, भक्तास हाती धरी ।
विघ्ने दुर करी, स्वधर्म उद्धरी , दारिद्य्र माझे हरी ।
चित्ती मुर्ती बरी, वराऽभय करी, ध्यातो तुला अंतरी ।
वाचा शुद्ध करी, विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ॥ १ ॥

माते एकवीरे, वराऽभयकरे, दे तू दया सागरे ।
माझा हेतु पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे ।
जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मैक्य-धी संचरे ।
देई पुर्ण करे भवाम्बुधी तरे ऐसे करावे त्वरे ॥ २ ॥

अनाथासी अंबे नको विसरु वो । भवत्सागरी सांग कैसा तरु वो ।
अन्यायी मी हे तुझे लेकरु वो । नको रेणुके दैन्य माझे करु वो ॥ ३ ॥

मुक्ताफलेः कुंकुम पाटलांगी । संदेह तारा निकरैविभाती ।
श्री मूळपिठां चलचूंडिकाया ।तामेकविरां शरणं प्रपद्ये ॥ ४ ॥

सखे दुःखिताला नको दुखवु वो | दिना बालकाला नको मोकलू वो ।
ब्रिदा रक्षी तु आपल्या श्री भवानी | हि प्रार्थना एकुनी कैवल्यदानी ॥ ५ ॥

॥ इति श्रीरेणुकामाता प्रार्थना संपूर्ण॥


For Audio clip click here .....







See More रेणुका माता stotras ...

लक्ष कोटि चण्ड किरण

Comments