नाना परिमल दुर्वा शेंदूर शमीपत्रे | लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे | ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे | अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे || १ ||
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती || जय || धृ ||
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती | त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती | वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती | सर्वही पावुनी अंती भवसागर तरती || जयदेव || २ ||
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी | कीर्ती तयांची राहे जोवरी शशि - तरणी | त्रेलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी | गोसावीनंदन रत नामस्मरणी | जयदेव जय || ३ ||
...................................................
...................................................
Comments
Post a Comment