श्रावणमासी जिवंतिका हे घरोघरी पूजती
टाळी संगे झांज वाजवूनी करू तिची आरती ll धृ ll
सप्तकोष हे मानव देही ही जिवंतिका देवता
सात अवस्था पार करिता दीर्घायु मानता
सात मासांचाच बाळे चित्रातूनी दिसती ll1ll
टाळी संगे झांज वाजवूनी करू तिची आरती
पूजा करिती नाममंत्र ते पुष्पे अर्पूनी
आयुष्याचे प्रतीक म्हणूनी माळा बांधूनी
पंचप्राण हे रूपक म्हणूनी पुरण दिवे करिती ll2ll
टाळीसंगे झांज वाजवूनी करू तिची आरती
जिवंतिका हे व्रतच आहे संतानवर्धक
शीत वर्ण हा त्याज्य विकार प्रतिनिधिक
सायंकाळी दूध, फुटाणे सुवासिनी वाटती ll3ll
टाळी संगे झांज वाजवूनी करू तिची आरती
चित्ररूप ते जिवंतिका देवी देव्हाऱ्यामध्ये
पुरणदिव्यासह कापूर ठेवू या तबकामध्ये
औक्षण करिते माता शुक्रवारी तिच्या बाळा प्रती ll4ll
टाळी संगे झांज वाजवूनी करू तिची आरती
Comments
Post a Comment
तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा