आत्म्याची अमरता आणि अखंडता~The Immortality and Eternity of the Soul

*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*

*दिनांक 18 फेब्रुवारी 2025 उत्तरे 24 फेब्रुवारी पर्यंत पाठवावीत*

प्रश्न 3. A) आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा. 

B) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या

कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतांनी काय सांगितले आहे!  योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 

C) मनाच्या अध: पतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा आणि त्यांच्या काय परिणाम होतो ते लिहा.

Ans 1. पद्मा मदनकर लिहितात......

              भगवान श्रीकृष्ण म्हणतात ,हे अर्जुन तू ज्यांच्या साठी शोक व्यक्त करू नये अश्या लोकांसाठी शोक करीत आहे,मी कोणत्याही काळी नव्हतो ,तू नव्हतास, किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्व जण असणार नाही असेही नाही  ज्याप्रमाणे जिवात्म्याला या शरीरात बालपण, तरुणपण  आणि वार्धक्य येते त्याप्रमाणे दुसरे शरीर मिळते या नाशरहित  मोजता न येणार् अश्या जिवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत  .जो या आत्म्याला मारणारा किंवा मेळा आहे असे समजतो तो अज्ञानी आहे कारण हा आत्मा कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मालही जात नाही. हा आत्मा कधीही जन्माला येत नाही आणि मराठी नाही  हा आत्मा जन्म नसलेला ,नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी  वस्त्रे परिधान करतो त्याचप्रकारे आत्मा  जुनी शरीरे टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही आणि वर वळवू शकत नाही .कारण हा आत्मा कापता,जाळता न येणारा, भिजवता, वळवता न येणारा आहे  तसेच हा  आत्मा  नित्य, सर्वव्यापी ,अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे.हा आत्मा अव्यक्त, अचिंतय, आणि विकाररहीत आहे,.

 B) हे अर्जुना, आत्म्याची  स्थिती तुला समजली आहे, तरी तू आता शोक करू नको .जन्मला आलेल्या प्रत्येक व्यक्ती ला मरण निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म आहेच,अश्या स्थिती त शोक कशाला करायचा? हे अर्जुन ! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतर अप्रगत होणार असतात अशा स्थितीत शोक का करायचा? हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध असतो  क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य  नाही. हे पार्था, आपोआप समोर उघडलेले स्वर्गाचे द्वार  युद्ध हे क्षत्रियांना च लाभते . परंतु हे अर्जुना! जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापा ला जवळ करशील सर्व लोक तुझी चिरकाल अपकीर्ती सांगत राहतील . त्यामुळे लोक तुला तुच्छ समजतील  तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील  ,याहून अधिक दुःख दायक के असणार आहे?          . . तू युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील आणि युद्ध जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील .म्हणून हे अर्जुना! तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा,

C )         हे अर्जुना!कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतू अस्थिर विचार असणाऱ्या , अविचारी  कामनयुक्त  माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात . त्यांची परमात्म्याविषयी निश्चित बुद्धी असत नाही.म्हणून अर्जुना तू ते भोग आणि त्यांची साधने यांची आसक्ती बाळगू नकोस. तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस  . तू आसक्ती सोडून तसेच सिध्दी आणि असिद्धि मध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग्य म्हटले आहे. तू समबुद्धी तच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धी योगाचाच आश्रय घे.  तू समत्व रूप योगाला चिकटून राहा हा समत्व रूप योग्यच कर्मात दक्षता आहे  यालाच "योग्य : कर्मसु कौशलम "! असे म्हटले आहे.

Ans. 2. राजश्री कोंडावार लिहितात....

प्रश्न आमचा उत्तर तुमचे.

प्र क्र ३ अ आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पश्ट करा.

श्लोक क्र २३ चे उत्तर.

        या आत्म्याला शस्त्रे कपू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, आणि वारा वाळवू शकत नाही. 

श्लोक क्र २४ चे उत्तर.

    कारण हा आत्मा  कापता न येणारा, जाळता येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्व व्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.

श्लोक क्र २५ चे उत्तर.

हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकरारहित आहे, असे म्हंटले जाते. म्हणून हे अर्जुना! हा आत्मा वर सांगतल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही.


प्रश्न ३ ब चे उत्तर. 

हे अर्जुना! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य* असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.  तसेच स्वतः चा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कमा नये. कारण क्षत्रियाला,  धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ( श्लोक no ३०,३१.)

श्लोक क्र ४९ चे उत्तर.

 या समत्वरूप बुद्धियोगेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणुन हे धनंजया ! तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. 

श्लोक क्र ५० चे उत्तर.   योग: कर्मसु कौशलम् चा अर्थ - कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय. 

समबुध्दीचा पुरुष पुण्य व पाप या दोहींचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिटकुन राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय आहे. 

कारण सम बुद्धिने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदला प्राप्त होतात.( श्लोक no ५१.)

जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चीखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारखा इह- परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ( श्लोक no ५२.) 

तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुध्दी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजे तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. (श्लोक no ५३.)   

प्रश्न ३ क चे उत्तर. 

रागामुळे अत्यंत मुढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मुढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती  भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुध्दीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात होतो. परंतु अंत: करण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठवलेल्या राग- द्वेष - रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंत: कारणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंत:करण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दु:खे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुध्दी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्देच उत्तम प्रकारे स्थिर होते. ( श्लोक no ६३,६४,६५.)

Ans. 3. अजय कुमार महाजन दादा लिहितात ....

प्रश्न ३ (A)

आत्म्याची अमरता व अखंडता 

आत्म्याला शारिरी असेही म्हटले आहे. आत्मा कोणत्याही क्रियेचा कर्ता ही नाही व कर्मही नाही.

यात कोणताही विकार येत नाही. आत्मा अमर आहे. जी वस्तू उत्पन्न होते ती आपोआप नष्ट होते. पण आत्मा उत्पन्न ही होत नाही आणि नष्ट देखील होत नाही.

ज्या प्रमाणे मनुष्य जूने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो त्या प्रमाणे आत्मा जुने शरीर त्यागून नविन शरीर धारण करते.

आत्मा अविनाशी असून त्यात कधीच कोणतेही परिवर्तन होत नाही. तो कधीच बदलत नाही. म्हणुन भगवंत त्याला आपला अंश व सनातन मानतात. आत्म्यात कोणतीही उणीव येत नाही. म्हणुन शरिरी अविनाशी, नित्य, अज आणि अव्यय आहे.

भगवंत दुसऱ्या अध्यायाच्या २३ व्या श्लोकात सांगतात "(१)ह्या आत्म्याला कोणीच कापू शकत नाही (२) याला अग्नि जाळू शकत नाही (३) याला पाणी ओले करु शकत नाही (४) याला वायू सुकवू शकत नाही."

हा आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे. हा देही ' स्थाणू' आहे. यात हलण्याची क्रिया होत नाही. हा देही ' सनातन ' आहे. अनादी अनंत आहे हा आत्मा स्थूल रूपाने दिसत नाही.

प्रश्न ३ (B)

अर्जुनाचा युद्ध करण्याचा निर्णय विपरीत आहे या बद्दल भगवंतांनी काय सांगितले." योग कर्मसू कौशलम " म्हणजे काय?

उत्तरं:- भगवंतांनी, अर्जुनाचा युद्ध करण्याचा निर्णय विपरीत आहे असे अध्याय दोन मधील श्लोक ३३ ते ३८ मध्ये सांगितले आहे.

श्र्लोक ३३ ते ३६ मध्ये युद्ध न केल्यास काय नुकसान होते ते सांगितले आहे.

(१) "जर अर्जुना तू युद्ध केले नाहीस तुझ्या क्षत्रिय धर्माचा त्याग केल्या प्रमाणे होईल. ज्यामुळे तुला पाप लागेल व समाजात तुझी अपकिर्ती देखील होईल."

(२) " अर्जुना संसार व समाजाच्या दृष्टीने तुझा स्वर्ग, मृत्यू, पाताळ लोकात दरारा आहे. तुला सर्व श्रेष्ठ धनुर्धर व योद्धा मानतात. पण जर तूझी समाजात अपकिर्ती झाली तर ती तुला मरणापेक्षाही जास्त दुःख देणारी ठरेल."

(३) " अर्जुना तू क्षत्रिय आहे व युद्ध करणे हा तुझा धर्म आहे व जर तू युद्ध केले नाहीस तर भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य ह्या सारखे महारथी असे समजतील की युद्धात अर्जुनाने मृत्यूच्या भीतीने माघार घेतली. व ते महारथी देखिल तुला हिन समजतील "

(४) " तुझे शत्रू दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे तुझ्या सामर्थ्याची निंदा नालस्ती करतील व तुला नको ते शब्द बोलतील जे तुला दुःखी करतील. तसेच शत्रू कडून झालेला अपमान, तिरस्कार तुला सहन होणार नाही."

भगवंत श्र्लोक ३७ व ३८ मध्ये अर्जुनाला युद्ध करण्याचे लाभ सांगतात 

(१) " अर्जुना जर तू युद्धात मारला गेला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल व विजयी झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशिल"

(२) जय- पराजय, लाभ- हानी, सुख - दुःख हे प्रत्येक युद्धात होणारच आहेत. पण त्यांना समान व कर्तव्य कर्म समजून तू युद्ध कर. अशा प्रकारे जर तू युद्ध केलेस तर तुला पाप व पुण्य बंधनकारक राहणार नाही."

"योग कर्मसु कौशलम" म्हणजे कर्मात योगच कुशलता आहे. याचाच अर्थ म्हणजे कर्माच्या सिध्दी असिध्दीत आणि त्या कर्माच्या फल प्राप्ती व अप्राप्ती मध्ये सम समान राहणेच कर्माची कुशलता आहे. कारण कर्म करताना ज्याच्या अंत:करणात समता असते तो त्या कर्माला व त्या कर्माच्या फळाला बांधला जात नाही.

प्रश्न ३ (C)

मनाच्या अध:पतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा. व त्याचा काय परिणाम होतो?

*मनाच्या अध:पतनाच्या पायऱ्या खालील प्रमाणे आहेत *

(१) व्यक्ती संसाराचे व विषयांचे सतत *चिंतन*  करीत असतो.

(२) सतत संसाराचे व विषयांचे चिंतन केल्यामुळे व्यक्ती 

*आसक्त* होतो.

(३) आसक्ती मुळे  *कामना* निर्माण होते. कामना रजोगुणी वृत्तीची आहे.

(४) कामने नुसार यश मिळाले तर  *लोभ* निर्माण होतो.

(५) कामना पूर्तीची शक्यता असताना काही अडथळा निर्माण झाला तर *क्रोध* निर्माण होतो. क्रोध रजोगुण व तमोगुण यांच्या मधली वृत्ती आहे.

(६) क्रोधा पासुन *सम्मोह* निर्माण होतो. संमोह तमोगुणी वृत्ती आहे.

(७) संम्मोहा पासुन  *बुध्दी* चा नाश होतो.

(८) बुध्दी चा नाश झाला की व्यक्ती चे *अध्: पतन* होते.

वरील प्रमाणे सर्व वृत्ती तात्काळ उत्पन्न होतात आणि व्यक्तीचे पतन होते.

*अध्: पतनाचा परिणाम*

(१) मन व इंद्रिय संयमित नसल्याने निष्काम भाव नसतो म्हणुन त्याला *शांती*मिळत नाही.

(२) शांती न मिळाल्याने त्याला *सुख व  समाधान* मिळत नाही.

(३) इंद्रिय संयमित नसल्याने त्यांची *बुद्धी स्थिर* नसते.

(४) भोगांची कामना करणाऱ्या व्यक्तीला *परम शांती*कधीच मिळत नाही.

Ans 4. ज्योती साठे ताई . ...

उत्तर: आत्मा हा अविनाशी आहे ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही या नाश रहीत मोजता न येणार्या नित्य स्वरूप जीवात्म्याची शरीरे नाशवंत आहेत जो आत्म्याला मारणारा व आत्मा मेला असे जो समजतो तो अज्ञानी आहे कारण आत्मा कोणाला मारत नाही व कोणाकडून मारला जात नाही आत्मा हा कधीही जन्मत नाही व कधीही मरत नाही आत्मा हा नाश रहीत नित्य न जन्मला येणारा व न बदलणारा आहे

आत्म्याला शस्त्र कापु शकत नाही वीस्तव जाळु शकत नाही पाणी भीजवू शकत नाही वारा वाळवु शकत नाही आत्मा हा नित्य सर्व व्यापी अचल, स्थीर आणि  सनातनी, अव्यक्त आचीन्त्य विकार रहीत आहे

B:भगवंत सांगतात हे अर्जुना स्वताचा धर्म लक्षात घेऊन युध्दाला तयार रहा क्षत्रियांचा धर्म युध्द करणे आहे त्याहून दुसरे कल्याणकारी कर्तव्य नाही जर तु युध्द केले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील सर्व लोक तुझी अपकीर्ती सांगत राहतील तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निन्दा करतील तु युध्दात मारला गेलास तर स्वर्ग प्राप्ति होईल व जिंकला तर पृथ्वीचे राज्य भोगशील

C: कासव ज्याप्रमाणे आपले अवयव जसे आत ओढुन धरते त्याप्रमाणे पुरुष इंद्रियांना विषयापासून आवरुन घेतो तेव्हा त्याची बुध्, स्थिर असते

विषयांचे चिंतन करणार्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्ती मुळे कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाली नाही की राग येतो रागामुळे मूढता येते मुढते मुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धी चा ज्ञान शक्ति चा नाश होतो

Ans. 5. मेधा पोफळी ताई लिहितात ....

प्रश्न 3 रा (A) उत्तर भगवान आत्म्याची अमरता आणि अखंडता या विषयी सांगतात की, आत्मा हा अमर आहे ़मरते ते शरीर ज्या प्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन परिधान करतो त्याच प्रमाणे शरीर जुन्या शरीराचा त्याग करुन नवीन शरीर धारण करीत असते ़सुखदुःखामधे समान आणि निर्विकार राहणार्‍या धैर्यवान पुरुषास या इंद्रियाचे विषय ़सुखी किंवा दुःखी करीत नाही ़तो अमरतेचा उपभोग घेत असतो ़चेतन तत्व आणि जड तत्वाला ज्ञानी पुरुष जाणत असतो म्हणुन ज्ञानी पुरुष हे अमर होतात ज्या तत्वाने हे जगत व्यापले आहे त्याला तु अविनाशी समज ़जो मनुष्य या शरीराला अविनाशी, नित्य, जन्म रहित अशा प्रकारे जाणतो तो कसे कोणाला मारील? अशा प्रकारे भगवन अमरता आणि अखंडता समजाऊन सांगतात.
उत्तर (b)अर्जुनाने युध्द न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले.तु जर हे धर्ममय युध्द करणार नाही तर तुझ्या किर्ती चा आणि शास्त्र धर्माचा नाश होईल.आणी तुला कर्तव्य चयुतीचे पाप लागेल.आणी सर्व देवता मनुष्य तुझ्या अपकिर्तिचे कथन करतील अपकिर्ति सन्माननीय मनुष्या  करीता मृत्यू पेक्षाही दुःख कारक असते भीष्म, द्रोणाचार्य या महारथींचया दृष्टी मधे तु श्रेष्ठ मानला गेला आहेस.तु त्याच्या नजरेतुन तुच्छसमजला।           
 जाशील.आणी तु मरणाला भीतो आहेस असे ते समजतील.ते
तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील.
या पेक्षा मोठे दुःख कोणते 

योग कर्मसु कौशल्यम हा गीतेच्या दुसऱ्याअध्यायातील पन्नासावा श्लोक आहे तो पुर्ण श्लोक असा आहे.
बुध्दीयुक्ततो जहातीह उभे सुकृत दुषकृते तस्माद्योगाय युज्यस्व, योग: (ख़्) कर्मसु कौशलम्।। 
गीतेतील हा महत्वपूर्ण शलोक आहे या शलोकाचे तात्पर्य असे की योग फकत ध्यान आणी आसन करणे नाही तर आसकती न ठेवता कर्म करणे कर्माची कुशलता ही योग आहे योगमुळे आपल्या मधे व्यवहार कुशलता येते आणि आपण आतमनिरर्भर बनतो 
उत्तर (c) मनाचे अधःपतन झाल्यामुळे भोगांचे चिंतन होईल.मनुषया मधे आसक्ती निर्माण होईल आणि भोगांना प्राप्त करण्याची ईच्छा निर्माण होईल त्यामधे अडथळा आल्यास क्रोध येईल.आणी विवेक बुध्दी नष्ट होईल म्हणजे मुर्खता प्राप्त होईल आणि स्मृती नष्ट होईल.महणजे मनुष्याचे पतन होईल.पतन झाल्या मुळे शांती मिळत नाही आणि शांती नसल्या मुळे सुख मिळु शकत नाही इंद्रिया पैकी एक जरी मनाबरोबर असले तर साधकाची बुध्दी हरण होते आणि बुध्दी स्थिर होत नाही अशा प्रकारे अधःपतनाचा आपल्या मनावर परिणाम होत असतो.


Ans. 6. माणिक थोरात ताई लिहितात .....

प्रश्न 3  A  आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा 

उत्तर—आत्मा हा अजन्मा, सनातन,अविनाशी, अवैध,अमर नित्य अस्तित्वात असणारा पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. याआत्म्याला शस्र्त कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही,पाणी भिजवू शकत नाही,वारा वाळवू शकत नाही असा हा अविनाशी आत्मा ज्याप्रमाणे आपण जून्या वस्र्तांचा त्याग करुन नविन वस्र्त परिधान करतो त्याप्रमाणे हा आत्मा एका शरीराचा त्यग करुन (मृत्यू)नविन शरीर धारण करतो (जन्म)  

      हा देहधारी आत्मा प्रत्येक क्षणी आपले शरिर बदलत असतो या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे तर कधी म्हातार्‍याप्रमाणे दिसून येतो असे असले तरी बाल्य तारुण्य वृद्धत्व या सर्व अवस्थांमध्ये तोच जीवात्मा असतो पण शरीराबरोबर आत्म्यात बदल होत नाही मृत्यूनंतर तो दुसर्‍या शरीरात स्थानांतर होतो अशाप्रकारे जन्म  _मृत्यूचे हे चक्र अखंडित चालू राहते 

B   अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरित आहे याबद्दल भगवंतांनी काय सांगीतले ? योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 

उत्तर —युद्ध क्षेत्रावर आप्तस्वकिय, गुरु, आचार्य,पूत्र पौत्रत यांना पाहून युद्ध केले तर हार जित कुणाचीही झाली तर सर्व माझीच माणसे मारली जातील या विचाराने अर्जुन मोहग्रस्त होउन त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भगवंत म्हणाले तू एक क्षत्रीय असून महान योद्धा आहेस युद्ध करणे हा क्षत्रीयाचा स्वधर्म आहे नीतीने धर्माने लढलेले युद्ध हे योद्ध्यासाठी सर्वात मोठे कर्तव्य अहे परन्तू या कर्तव्याचे पालन न करणारी व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून दूर जाते धर्माच्या मार्गापासून विचलित होते रणांगणात लढणे ही क्षत्रीयासाठी सर्वात मोठी संधीआहे. अन्याय आणि अधर्माविरुद्ध लढणे वआपले कर्तव्य बजावणे हे क्षत्रीयाचे कर्तव्य आहे  पण जर अर्जुना तू हे क्षत्रीयाचे कर्तव्य पाळले नाही तर ते तूझ्पा प्रतीष्ठेसाठी हानीकारक असेल तुझी इतक्या वर्ष एक शूर योद्धा म्हणून मीळालेली प्रतीष्ठा नष्ठ होईल आपल्या कर्तव्यापासून मागे हटला म्हणून तुझा आदर कमी होईल.युद्धात माघार घेततली तर हे तुझेच आप्तस्वकिय तूझी पळपूटा भित्रा या शब्दात अवहेलना करतील.अन् ही अवहेलना क्षत्रीयासाठी मृत्यूपेक्षाही क्लेशदायक असते. तेव्हा अर्जुना हे युद्ध तू कर या युद्धात जरी तू हरलास तरी क्षात्रधर्माचे योग्य पालन केल्याने तुला स्वर्ग प्राप्ती होईल अन् जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील 

C   मनाच्या अःधपतनाच्या पायर्‍या स्पष्ट करा आणि त्याचा काय परिणाम होतो ते सांगा ?

उत्तरः  विषयाचे चिंतन करणार्‍या पुरुषामध्ये विषयासंबंधी आसक्ती निर्माण होते ते प्राप्त करण्याची इच्छा प्राप्त होते इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो क्रोधामुळे सद्सदविवेकबुद्धी धूसर होते परिणामी निर्णयक्षमता नष्ट होते स्मरणशक्ती कमजोर होते स्णरणशक्ती कमजोर झाली की बुद्धीचा नाश होतो त्या व्यक्तीचे जीवन विस्कळीत होते आत्म्याची शांती नष्ट होते व आपल्या ध्येयप्रद तो जाऊ शकत नाही

Ans. 7. माधुरी आपटे ताई चे उत्तर ...

अर्जुनाच्या युद्ध न करण्याचा निर्णय....
2र्या अध्यायात श्लोक क्र. 18पासून भगवंतानी शरीर आणि शरीरात चे विवेचन सुरु केले. त्यांनी अर्जुनाला प्रथम सांगितले कि तु युद्धात फक्त शरीराला मारू शकणार आहेस. शरीरात अवद्ध्य आहे तीला कोणीही मारू शकत नाही. शरीराला जनम मृत्यू जरा आणि व्याधी हे सर्व विकार होतात शरीराला नाही. व्यक्ती चा मृत्यू म्हणजे फक्त कपडे बदलण्या सारखे आहे. जसा मनुष्य वस्त्रे बदलतो तसेच आत्मा शरीर बदलते. 
आतल्या ला शस्त्र छेद करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवून शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. अर्थात आत्मा अवध्य आहे. आत्मा फक्त शरीर सोडून दूसरे शरीर धारण करते. अर्थात आत्मा अविनाशी आहे म्हणून तु आप्तेष्टांच्या मरणाचा शोक करु नकोस आणि युद्ध कर. 
उत्तर 2.भगवंतानी अर्जुनाला समजावून सांगितले कि तुझा युद्ध न करण्याचा निर्णय सर्वथा अनुचित आहे. तु क्षत्रिय आहेस युद्ध हा तुझा धर्म आहे तु जरी युद्धातून पळून जायचा प्रयत्न केला तरी ते तुला शक्य होणार नाही तु कसे ही करून युद्धात ओढला जाशील. युद्धातून पळून गेल्यास तु पळपुटा म्हणवला जाशील. 
तुझी बुद्धी एकात्म असावी. ज्यांची बुद्धी बहु शाखा असते ते निर्णय घेण्यास असमर्थ असतात.
[23/02, 5:08 pm] +91 90045 20606: भगवंताने अर्जुनाला सांगितले कि युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरित आहे. कर्तव्य बुद्धी सर्वतोपरी आहे तु कर्तव्य पार पाडली. नंतर सांगितले कि तु गुणातित हो. गुणतित झाल्यास तुला सुख _दुख, जय_पराजय, लाभ_हानी काही प्रभावित करू शकणार नाही. तुझा अधिकार फक्त कर्म करण्यात आहे त्याच्या फळात नाही. 
योग म्हणजे समग्र समभाव. आसक्ती चा त्याग करून सिद्धी असिद्धीत सम राहून कर्म कर. समत्वबुद्धी अर्थात कर्म योगा चे अनुसरण करणे. कर्मात योग म्हणजे कुशलता आहे.

मनाच्या अधःपतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा? 

उत्तर. मनाच्या अधःपतनाच्या विषयी बोलताना भगवंत सांगतात(येतो ह्यपि_________प्रसभं मनः) मना कितीही समजावले तरी इंद्रियांना त्याला रसग्रहण कडे ओढतात आणि मन अस्थिर होते. मन स्थिर होण्या साठी आपल्याला सतत अभ्यास करावा लागेल. निद्रा, आहार, राग, द्वेष यांचे संयमन करावे लागेल. 

इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करण्याने विषयांमध्ये आसक्ती उत्पन्न होते आसक्ती ने कामना उत्पन्न होते कामनेत बाधा आली तर क्रोध उत्पन्न होतो क्रोधा ने मनुष्य मूर्खा सारखे वागतो आणि त्याचा बुद्धी नाश होतो.

Ans. 8. अनुषा एरंडे ताई लिहितात....

प्रश्न 3. A) आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा. 

श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या अमरत्वाविषयी आणि अखंडत्वाविषयी उपदेश देतात. या अध्यायात ते स्पष्ट करतात की शरीर नश्वर असले तरी आत्मा अमर आहे. आत्मा कधीही जन्मत नाही आणि कधीही मरत नाही. आत्म्याचा नाश होत नाही, कारण तो पुरातन, अजन्मा, अविनाशी, शाश्वत आणि सनातन आहे. तो कधीच अस्तित्वात येत नाही आणि नाहीसा होत नाही. आत्म्यावर कोणत्याही बाह्य घटकांचा परिणाम होत नाही. आत्म्याला शस्त्राने कापता येत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. ही शिकवण आत्म्याच्या अखंडत्वावर भर देते. आत्मा हा सृष्टीच्या कोणत्याही भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाही. तो अविकारी, अव्यक्त आणि अचल आहे. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, जसे माणूस जुने कपडे सोडून नवीन कपडे परिधान करतो, तसेच आत्मा हे जीर्ण वा झिजलेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. म्हणूनच अर्जुनाने शोक करण्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ही शिकवण मानवाला जीवनातील दुःख आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करते आणि आत्म्याच्या शाश्वततेचा संदेश देते.

B) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतांनी काय सांगितले आहे!  योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 

श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देतात आणि सांगतात की युद्ध न करणे हे त्याच्या कर्तव्याच्या विरोधात आहे. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हे त्याचे धर्माने ठरवलेले कर्तव्य आहे. अर्जुनाने  आपल्या स्वधर्माचा विचार करूनही विचलित होऊ नये. क्षत्रियासाठी धर्मयुक्त युद्धापेक्षा दुसरे कोणतेही श्रेष्ठ कर्तव्य नाही. क्षत्रियाला धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे हेच योग्य आहे आणि ते त्याला स्वर्गात नेणारे आहे. जर त्याने युद्ध टाळले, तर त्याचा अपमान होईल आणि तो आपल्या क्षत्रिय धर्मापासून भ्रष्ट होईल. जर त्याने धर्मयुक्त युद्ध नाही केले ,तर तो आपला स्वधर्म आणि कीर्ती गमवेल आणि पापी होईल.

योगः कर्मसु कौशलम् हा श्रीकृष्णा ने कर्मयोगाचा संदेश अर्जुनाला दिला आहे. निष्काम भाव ठेवून पूर्ण समर्पणाने कर्म करणे हेच श्रेष्ठ आहे, पण त्याचे फळ मिळावे म्हणून आसक्त राहणे योग्य नाही. बुद्धीयुक्त (योगयुक्त) मनुष्य पुण्य आणि पाप या दोन्हीपासून मुक्त होतो. म्हणूनच अर्जुनाने योगसाधना करावी आणि कर्मात खरे कौशल्य प्राप्त करावे, कारण कर्मात कुशलता आहे. कर्म करताना त्याच्या फळाची चिंता करू नये. कर्म स्वतःचे कर्तव्य म्हणून निस्वार्थ भावनेने करावे. योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने कर्म करणे हीच कर्मयोगाची सर्वोत्तम व्याख्या आहे. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की युद्ध करणे हेच त्याचे कर्तव्य आहे आणि त्याने आपल्या क्षत्रिय धर्मानुसार लढावे. 


C) मनाच्या अध: पतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा आणि त्यांच्या काय परिणाम होतो ते लिहा.

श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्याच्या अधःपतनाची प्रक्रिया एकदम होत नाही, तर ती टप्प्याटप्प्याने घडते. इच्छा, आसक्ती आणि क्रोध यामुळे मनुष्य नाशाच्या मार्गावर जातो. मनुष्य इंद्रियविषयांचा विचार करू लागतो. त्या गोष्टींमध्ये त्याचे मन अडकते आणि तो त्यांना प्राप्त करण्याच्या इच्छेने भारावतो. ज्या गोष्टींचा सतत विचार केला जातो, त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते. मन त्या गोष्टींपासून दूर जाऊ शकत नाही.आसक्तीतून इच्छा निर्माण होते. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती वाढते, तेव्हा ती प्राप्त करण्याची तीव्र इच्छा (काम) निर्माण होते. ही इच्छा पूर्ण झाली नाही तर अस्वस्थता निर्माण होते. इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध निर्माण होतो. इच्छा अपूर्ण राहिल्यास मनात असंतोष निर्माण होतो, जो पुढे क्रोधामध्ये परिवर्तित होतो. हा क्रोध एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थितीवर केंद्रित होतो.क्रोधामुळे मोह उत्पन्न होतो. क्रोधामुळे व्यक्तीचा संयम नष्ट होतो. चांगले काय आणि वाईट काय याचा विचार करण्याची क्षमता हरवते. स्मृतीचा नाश होतो, बुद्धी भ्रष्ट होते आणि व्यक्ती विनाशाकडे जाते. मोहामुळे स्मृती भ्रमित होते.  व्यक्ती पूर्वीच्या अनुभवांतून शिकत नाही.

स्मृती भ्रष्ट झाल्याने बुद्धीचा नाश होतो. निर्णयक्षमता कमकुवत होते. बुद्धीचा नाश झाल्यावर व्यक्तीचा संपूर्ण विनाश होतो . तो चूक आणि बरोबर यातील फरक ओळखू शकत नाही आणि पूर्णपणे पतन पावतो.

अधःपतनाचे अनेक वाईट परिणाम होतात जसे की मनुष्य आपल्या नैतिक आणि धार्मिक मार्गापासून दूर जातो. त्याच्या मनात असंतोष आणि क्रोध निर्माण होतो, ज्यामुळे तो चुकीचे निर्णय घेतो. मोहामुळे त्याचे चित्त विचलित होते, स्मृती भ्रमित होते आणि तो आपल्या ध्येयापासून भरकटतो. त्याच्या विवेकबुद्धीचा नाश होतो आणि तो संपूर्ण विनाशाकडे जातो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, इंद्रियविषयांच्या आसक्तीतूनच अधःपतन सुरू होते. म्हणूनच मन शांत ठेवून, त्यावर संयम ठेवणे आणि निष्काम कर्मयोगाच्या मार्गावर चालणे हे खरे जीवनाचे रहस्य आहे.

Ans. 9. सौ स्वाती राजूरकर यांचे उत्तर.....

प्रश्न  तीन (a)चे उत्तर, 

अध्याय दोन मध्ये भगवंतांनी आत्म्याविषयी स्पष्टीकरण केले आहे, आत्मा कसा आहे हे अर्जुनाला सांगून त्याला युद्ध युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे,  भगवंतांनी आत्म्याचं पहिलं लक्षण सांगितलं आहे, आत्मा अज आहे, अमर आहे ,अद्वितीय आहे, एकमेव आहे, 

भगवंतांनी सतराव्या श्लोकात आत्मा अविनाशी आहे असे सांगितले आहे , 

तसेच विसाव्या श्लोकामध्ये भगवंत आत्मा अजय आहे तो कधीही जन्माला येत नाही आणि मरतही नाही, तो नित्य आणि शाश्वत आहे यामुळे त्याचा विचार करताना अर्जुन मारणारा नाही आणि विरुद्ध पक्षाचे यो द्धे मारले जातील असेही नाही असा जो अमर आत्मा आहे तो केव्हाही जन्मत नाही किंवा मरत सुद्धा नाही ,तर न जन्म नारा नित्य, शाश्वत पुरातन आहे, शरीराचा नाश झाला तरी आत्मा नाश पावत नाही, 

कठोपनिषदामध्ये आत्म्याचे वर्णन करताना सांगितले आहे ,की तो अज आहे `*अज *`याचा अर्थ *ज *म्हणजे जन्माला येणारा.* *अ* म्हणजे नाही .जो जन्माला येत नाही तो अज आहे .तो नित्य आहे तो कधी जन्मालाच येत नाही तो अजआहे, जो जन्माला येतो तो नक्की मरतो म्हणून आत्मा अजन्म ,अनादी, अमर आहे. 

त्यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतात, की तू ज्या देहाला मारू पाहत आहेस, ते देह तू मारले नाहीस तरी मारले जाणार आहेत ,केव्हातरी  ते देह पडणार आहेत, पण देह धारण करणारा जो आत्मा आहे ,तो मात्र अमर आहे .असे आत ् म ् याविषयीचे अमरत ् व अर ् अर्जुनाला पटवून देतात, आणि युद्ध करण्याचा संदेश देतात. 

यानंतर भगवंत आत्म्याच्या रूपाचे वर्णन करताना, आत्म्याविषयी विशिष्ट लक्षण सांगतात ते म्हणजे आत्मा अखंड आहे ,हा आत्मा नित्य आहे, सर्व गत आहे ,ठाणू आहे म्हणजेच स्थिर राहणारा आहे ,आणि हा आत्मा अव्यक्त अर्थात इंद्रियांना अगोचर, अचिंत्य मनाने न समजणारा, तसेच हा विकार रहित म्हणजे कधीही न बदलणारा आहे ,हा आत्मा कधीही तोडून त्याचे तुकडे करता येणार नाहीत, हा आत्मा कधीही जाळता येणार नाही ,पाण्याने भिजवता येणार नाही ,आणि सुखवता सुद्धा येणार नाही ,असा हा आत्मा नित्य, अनादी अंतरहीत आहे, अचल आहे, कोणत्याही अवस्थेमध्ये परिवर्तन न होणारा आहे, अखंड आहे.

प्रश्न क्रमांक तीन बी

अर्जुन युद्ध ला तयार नव्हता पण त्याला त्याचे अधिकार सांगण्यासाठी भगवंत कर्त्याचा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता आहे असे सांगतात आणि त्याबद्दल महत्त्वाची सूत्र अर्जुनाला सांगतात भगवंत म्हणतात कर्त्याच्या अधिकार कर्म करण्या पुरताच मर्यादित आहे म्हणजेच क्रियामान कर्म कर्त्याच्या स्वाधीन आहे दुसरं सूत्र कर्माच्या फलावर कर्त्याचा अधिकार नसतो. कर्माचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळतेच असे नाही ते योग्य असेल किंवा कमी जास्त असेल त्यानंतर तिसरा तिसरा सूत्र सांगतात तर त्याच्या मनात कर्मफलाची आसक्ती नसावी इच्छा नसावी एकट्याचा अधिकार कर्मफलावर एकट्याचा अधिकार कधीही नसतो अधिष्ठान करता कारण प्रयत्न दैव अशा पाच घटकांनी कर्माची सिद्धी होते चौथ सूत्र सांगताना भगवंत म्हणतात कर्मफलाची आसक्ती आणि कर्मफलावर अधिकार या दोन्ही गोष्टी कर्त्याच्या मनात नसाव्यात त्यामुळे मी कर्मच करणार नाही अशी कर्त्याची भावना नसावी कर्म करण्यातील कर्त्याची कर्तव्य तत्परता कधीही कमी होऊ नये कारण कर्माची उत्तम कामगिरी कर्त्याच्या स्वतःच्या तत्परतेवर असते. 

*बुद्धीयुक्त जहा तीह उभे सुकृत दुष्कृत| तस्मा दे गाय युजस्व योग : कर्मसू कौशलम ||*हा श्लोक भगवंतांनी पन्नासाव्या श्लोकामध्ये सांगितला आहे, याचा अर्थ भगवंत सांगतात कर्मामध्ये योगानेच कुशलता प्राप्त होते, 

यातले चांगले कर्म कोणते आणि वाईट कर्म कोणते, चोर असतो तो आपली बुद्धी चोरी करण्यासाठी वाईट दिशेकडे वापरतो आणि पोलीस असतो तो आपली बुद्धी चोर पकडण्यासाठी निश्चयात्मक रूपाने वापरतो सत्वगुणाने वापरतो म्हणूनच कर्मामध्ये योग आला की कुशलताप्राप्त होते हाच योग कर्म सु कौशलम चा योग्य अर्थ आहे, 

 योग योग म्हणजे काय याची व्याख्या श्रीकृष्ण सांगतात समत्व योग उच्चते म्हणजेच जिथे समत्व प्रस्थापित होते त्याला योग म्हणतात मन आणि बुद्धीचे ऐक्य होणे यालाच समत्व असे म्हटले आहे

समत्व म्हणजे अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारयोगात जाण सार योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी असे ज्ञानोबा रायांनी म्हटले आहे मन आणि बुद्धीचे ऐक्य झाले नाही तर मन बुद्धीला फरफट ओढत नेत असते असे महत्त्व भगवंतांनी या श्लोकाचे सांगितलेले आहे.

(C) चे उत्तर

मनाच्या अधःपतनाच्या पायऱ्या भगवंत सांगतात

इंद्रियांचे दमन करून मन स्वाधीन ठेवण्याचा अभ्यास केला नाही, तर खूप अनर्थ ओढवतात, बुद्धीचा नाश झाला सर्व जण पुरुषार्था पासून दूर होतात ,खरं म्हणजे पुरुषार्थहीन जो पुरुष असतो तो मृतवत समजला जातो असे ज्ञानी पुरुष म्हणतात

. असा पुरुष अभागी असतो लोक त्याची त्याची निंदा करतात जो इंद्रियांना वश करत नाही ,मत परायण होत नाही, त्याच्या मनात विषयांचे चिंतन चाललेले असते त्याचा परिणाम म्हणजे काम, क्रोध ,अविवेक, बुद्धीनाश, आपल्या लक्षात असून ढळणे असा भयंकर असतो. कामापासून संमोह होतो ,क्रोधाचा संमोह झाला की टाळतंत्र सुटून मानव निंद्य बोलतो आणि तसे वर्तन करतो, लोभामुळे मानवाचा विवेक ढळून त्याला सत्य- असत्य, धर्म- अधर्म कोणतेही विचार सुचत नाहीत तो कुठिलतेने वागू लागतो, ममतेमुळे मनुष्य पक्षपाती वर्तन करू लागतो, म्हणून इंद्रियांचा विषयाशी होणारा स धर्म कर्तव्य स्वरूप असावा.

Ans. 10.  भारती शेटे....

*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*

प्रश्न 3. A) आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा. 
आत्म्याची अमरता आणि अखंडता भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायांमधील श्लोक क्रमांक 22, 23 आणि 24 या तीन श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी समजावून सांगितलेली आहे, ती पुढील प्रकारे,
ज्याप्रमाणे हे शरीर बालपण तरुणपण आणि वृद्धवस्था या तीन अवस्था सहजपणे जीवनामध्ये उपभोगतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा हा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो म्हणून या आत्म्याच्या, मृत्यूचा शोक करू नये असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. मुळात येथे आत्म्याचा मृत्यू होतच नाही तर शरीराचा मृत्यू होतो आणि शरीरामध्ये वसत असलेला आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा असतो असे त्यांनी समजावून सांगितले आहे. येथे श्रीकृष्णाने आपण बदलत असलेल्या कपड्याचे उदाहरण शरीराला दिले आहे. जसे आपण वस्त्र बदलतो त्याप्रमाणे आपल्या शरीरात असलेला आत्मा हे शरीर बदलत असतो. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूचा शोक करू नये हा फार मोठा संदेश येथे भगवान श्रीकृष्ण देत आहेत. तसेच आत्म्याबद्दल भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत की आत्मा हा कधीही जळत नाही त्याचे तुकडे होऊ शकत नाही तो सुरीने कापल्या जाऊ शकत नाही,  वारा त्याला वाळवू शकत नाही थोडक्यात आत्मा अमर आहे आणि शरीर मात्र आत्म्याला सोडून जात असते. म्हणून आता तू शोक करणे सोडून दे आणि युद्धाला तयार हो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.
B) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या
कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतांनी काय सांगितले आहे!  योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 
सर्वसामान्य माणसाप्रमाणे अर्जुनाच्याही मनात भविष्याबद्दल चिंता होती काळजी होती किंवा एक प्रकारे अनिश्चितता होती कारण युद्धामध्ये पराजय झाला तर त्याला स्वर्ग मिळणार होता आणि जर युद्धामध्ये जय झाला तर पृथ्वीवरील राज्य मिळणार होते म्हणजेच युद्धाच्या मिळणाऱ्या फळाबद्दल त्याला काळजी वाटत होती आणि ती काळजीच भगवान श्रीकृष्णांना नष्ट करावयाची होती कारण येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासाठी योग्य काय आणि अयोग्य काय या गोष्टीवर सारासार विचार करून समजावून देत आहेत. युद्धभूमीवर आल्यानंतर त्याच्या परिणामांमध्ये आपल्या जवळचे आपलेच नातलग आपल्याच धनुष्यबाणाने मृत्यू पावतील ही भूमिका आणि यासाठी अर्जुन करत असलेला शोक हे खूप चुकीचे आहे असे समजावून सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या ठिकाणी परिणामांचा विचार न करता जे धर्मयुद्ध उभारलेले आहे ते युद्ध करणेच योग्य आहे संयुक्तिक आहे जर तो युद्ध सोडून भिक्षा मागण्याचा धर्म स्वीकारला तर तुझ्या क्षत्रिय धर्माची लोकं तुझी आयुष्यभर निंदाच करतील यालाच त्यांनी "योगकर्मसू कौशलम" असे म्हटले आहे. तर "योगकर्मसू कौशलम" याचा अर्थ आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार न करता सध्या काय योग्य आहे ते योग्य कर्म करणे, अमंलात आणणे यालाच "योगकर्मसू कौशलम" असे म्हटले आहे
C) मनाच्या अध: पतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा आणि त्यांच्या काय परिणाम होतो ते लिहा.
मनाच्या अधथपथनाच्या पायऱ्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 63 व्या श्लोकात समजावून दिले आहेत. व्यक्तीला होत असलेली इच्छा म्हणजेच त्याच्या मनात असलेली एखाद्या गोष्टीबद्दलची कामना त्या कामानेमुळे त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीला लोभ निर्माण होतो आणि तरीही ती कामना पूर्ण न झाल्यास त्याला क्रोध येतो तो क्रोध जास्त बळावला की त्याला समूह होतो समूह मोह प्राप्त होतो मोहाने त्याची विवेक शक्ती नष्ट होते मनुष्य कामाच्या वशीभूत होऊन करण्यालायक नसलेले कार्य करतो क्रोधने जो सम्मोह होतो, तो रागामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रमंडळींना काहीही बोलत  सुटतो. लोभात होणाऱ्या समूहामुळे मनुष्य  सत्य असत्य, धर्म आधर्म इत्यादीचा विचार न करता कपटाने लोकांना फसवतो.
सम्मोहामुळे व्यक्तीचे स्मृती नष्ट होते, स्मृति नष्ट झाली की बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्याने माणसाचे पतन व्हायला वेळ लागत नाही

Ans.11.  सौ.राजस बंगाळ

 प्रश्न  3=A    आत्म्याची  अमरता आणि अखंडता स्पष्ट करा.
 उत्तर =आत्मा हा अमर आहे.आत्म्याला कुठलेही शस्त्र मारु शकत नाही.अग्नि आत्म्याला जाळू शकत नाही.पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही.वारा आत्म्याला सुकवू शकत नाही.आत्मा अविनाशी आहे.आत्म्याला जन्म नाही, की मृत्यु नाही.ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो.नवीन शरीर धारण करतो.मनुष्य मरण पावतो म्हणजे त्याचे शरीर मृत होते,पण आत्मा नाही कारण आत्मा हा अविनाशी आहे.तो जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो.

प्रश्न B=अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे या बद्दल भगवंतांनी काय सांगितले आहे? योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 
उत्तर=भगवान अर्जुनाला सांगतात हे अर्जुना! तु जर युद्ध केले नाही तर खूप बदनामी होईल.तु क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे होईल.समाजात तुझी अपकिर्ती होईल.त्यामुळे तुला पाप लागेल. भगवंत म्हणतात,हे अर्जुना! स्वर्ग,मृत्यु आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुझा दरारा आहे.तु सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस,पण जर तुझी अपकिर्ती झाली तर तुला ते दुःख मरण्यापेक्षा ही जास्त वाटेल.अर्जुना,तु क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म युद्ध करणे आहे.तु जर युद्ध केले नाही तर पितामह  भिष्माचार्य, गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्व महारथी समजतील की अर्जुनाने मृत्यू भयाने युध्दात माघार घेतली. अर्जुना,तु युध्दात मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल, आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील.युध्दात जय,पराजय हे होणारच आहे,पण त्या भितीने जर तु युध्दाला नकार दिलास तर तु जननिंदेला प्राप्त होशील. योग कर्मसू कौशल्यम्  म्हणजे करण्यामध्ये योगच कुशलता आहे.कर्माच्या सिध्दि,असिध्दित आणि कर्माच्या सफल,असफलते मध्ये समान राहणे हिच कर्माची कुशलता आहे.कर्म करताना ज्याच्या अंतःकरणामध्दे समता असते तो त्या कर्मफलाला बांधला जात नाही.

प्रश्न C=मनाच्या अधःपतनाच्या पायर्या स्पष्ट करा व  त्याचा परिणाम काय होतो?
उत्तर = मनुष्य मनाच्या आसक्ती मुळे कामना निर्माण होते. कामनेमुळे लोभ निर्माण होतो. लोभामध्ये काही अडथळा आला की क्रोध निर्माण होतो.क्रोधामुळे सम्मोह निर्माण होतो, त्यामुळे बुध्दीचा नाश होतो.बुध्दी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचे अधःपतन होते.मन आणि इंद्रिये संयमीत नसल्याने शांती भंग पावते.सुख समाधान मिळत नाही.बुध्दी स्थिर नसल्यामुळे माणसाचे अधःपतन होते.

Ans. 12. सौ.जयश्री जोशी.....

दि.१८ फेब्रुवारी २५ च्या प्रश्र्नांची उत्तरे
प्रश्र्न १. आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा. 
समोर आपले सर्व गुरुजन, आप्तस्वकीय युद्धासाठी जमलेले पाहून अर्जुन मोहवश होऊन श्रीकृष्णांना सांगतो की ,हे सर्व माझेच आहेत. यांच्याशी लढून, युद्धात त्यांना मारून मी सुखी होणार नाही. उलट मी पापाचा धनी होईन .तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात की ,अर्जुना मी, तू, हे सर्व राजे पूर्वी नव्हतो असे नाही व मेल्यावर नसू असेही नाही. तर आत्मरूपाने आपण सर्व तिन्ही काळी नित्यच आहोत .व्यक्तीला एकाच देहात बाल्यावस्था, तारुण्य व वृद्धावस्था येतात. पण यातील एका अवस्थेचा नाश होतो तेव्हा आत्म्याचा नाश होतो आणि दुसऱ्या अवस्थेची सुरुवात होते तेव्हा आत्म्याचा जन्म होतो, असे होत नाही .अवस्था कोणतीही असली तरी आत्मा तोच असतो. त्याच्या अवस्थेत बदल होत नाही .तसेच पूर्व देह सोडून दुसरा देह घेताना त्याच्या स्वरूपात काही फरक पडत नाही .याप्रमाणे आत्मा नित्य व निर्विकार असतो. त्यामुळे शरीराबरोबर आत्मा मरतो असे तू समजू नकोस. देह जरी दिसत असला तरी तो बदलणारा आहे, विकारी आहे .त्यामुळे तो असत् आहे. या उलट कधीही न बदलणारा ,अविकारी आत्मा सत् आहे .असे जे सत् तत्त्व तेच ब्रह्म आहे. त्याने सर्व असत् वस्तूंना व्यापले आहे .म्हणून ते अविनाशी आहे. हे अविनाशी तत्त्वच सर्वांचा आत्मा असल्यामुळे त्याचा नाश होत नाही .एखादी व्यक्ती जुनी वस्त्रे टाकून नवीन धारण करते पण त्याच्यात काही बदल होत नाही. तसेच जुने जीर्ण शरीर टाकून दुसरे शरीर धारण केले तरी आत्म्यात काहीही बदल, विकार होत नाही. अशा या नित्य, निर्विकार आत्म्याचा शस्त्राने मृत्यू होत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही ,पाणी भिजवू शकत नाही किंवा वारा वाळवू शकत नाही .म्हणूनच तो नित्य, अचल, सनातन आहे.
 प्रश्र २. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल श्रीकृष्णांनी काय सांगितले आहे? योग कर्मसु कौशलम म्हणजे काय?
अर्जुन क्षत्रिय आहे .त्याचा स्वधर्म   क्षात्र धर्म आहे .युद्धात लढून जय मिळविणे हा त्याचा स्वाभाविक स्वधर्म आहे .पण अर्जुन हा स्वधर्म पालन करण्याचा विचार सोडून ते न करण्याविषयी श्रीकृष्णांना कारणे देत आहे. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की, स्वधर्म सोडणे उचित नाही .कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाहून अन्य काही श्रेयस्कर  नाही. अशा प्रकारचे युद्ध ज्या क्षत्रियांना प्राप्त होते ते खरोखर भाग्यवान होत. पण असे असतानाही जर तू हे धर्मयुद्ध लढला नाहीस तर तू स्वधर्माला मुकशील .धनुर्धर आणि शूर अशी तुझी जी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे ती नाहीशी होईल आणि उलट तुला पापच प्राप्त होईल .सर्वत्र तुझी अकीर्ती होईल आणि वीर पुरुषाला अकीर्ती ही मरणाहूनही दु:सह असते. तसेच तू हिंसा टाळण्यासाठी युद्ध केले नाहीस, तरी तुझे शत्रू म्हणतील की हा आम्हाला भ्यायला आणि युद्धा पासून परावृत्त झाला. पूर्वी शूर योद्धा ,क्षत्रिय असलेला तू सर्वांच्या तिरस्काराला प्राप्त होशील. तू जर युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. म्हणून अर्जुना स्वधर्म  पालन करून तू युद्ध करण्यास तयार हो. तेच तुझे कर्तव्य आहे.
 स्वधर्म पालनासाठी युद्ध करणे कसे योग्य आहे ,हे सांगून पुढे श्रीकृष्ण सांगतात की, सुखदुःख, लाभ -अलाभ, जय पराजय यांना समान मानून तू युद्ध कर. असे युद्ध केल्याने तुला पाप लागणार नाही. कर्मयोगाचे आचरण करण्याविषयी सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, कर्म करावे पण त्याच्या फळाची अपेक्षा , आसक्ती  ठेवू नये.. फलासाठी कर्म करू नये .तसेच केवळ ईश्वरासाठी किंवा ईश्वराने माझ्यावर प्रसन्न व्हावे अशीही आसक्ती ठेवू नये .सिद्धी आणि अ सिद्धी या दोन्ही बाबतीत समान बुद्धी ठेवून कर्तव्य कर्मे करणे , या समत्वालाच योग म्हटले आहे. या योगामध्ये स्थित होऊन, निष्ठा ठेवून कर्मे कर, असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे. हाच समत्वरूप बुद्धी योग होय. कर्त्याला पुण्य- पाप देणे ,हा कर्माचा स्वभावच असतो. पण समत्वबुद्धी योग असेल, तर कर्माचा हा स्वभावच बदलतो . हा स्वभाव बदलणे हेच कर्मातील कौशल्य होय.
 प्रश्र्न ३. मनाच्या अध:पतनाच्या पायऱ्या सांगून त्याचा काय परिणाम होतो ते लिहा.
भगवंतांनी स्थितप्रज्ञाच्या लक्षणात, मनातील सर्व इच्छांचा त्यांच्या वासनांसह त्याग करणे हे सांगितले आहे .परंतु आसक्तींचा नाश व इंद्रियांवर ताबा नसेल तर मनाचे अध:पतन होते. मनात विषय चिंतन करण्यामुळे त्या त्या विषयांच्या ठिकाणी प्रीती, आसक्ती निर्माण होते. त्यापासून क्रोध निर्माण होतो. क्रोधापासून कार्य-अकार्य, योग्य -अयोग्य याविषयी अविवेक उत्पन्न होतो. अविवेकामुळे स्मृतिभ्रंश होतो. शास्त्रादिकांविषयी ज्ञान राहत नाही. स्मृतिभ्रंशामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिभ्रंशामुळे तो पुरुषच नाश पावतो, पुरुषार्थाचा अधिकारी राहत नाही.  मन व इंद्रिये न जिंकल्यामुळे ज्याचे अध:पतन झाले आहे अशा माणसाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि त्यामुळे त्याला शांती मिळत नाही व सुखही प्राप्त होत नाही.

Ans 13. नाव मालती मधुकर जोशी राहणार बिबेवाडी पुणे ....

  प्रश्न आमचा उत्तर तुमचे ___आत्म्याची अमरता आणि अखंडता गीता अध्याय दोन श्लोक क्रमांक 17 ते 29 मध्ये विशद केली आहे अविनाशी आत्म्याला कोणीही नष्ट करू शकत नाही ज्याना असे वाटते की जीवात्मा मारला जातो त्याला काही समजत नाही ज्याला वास्तविक ज्ञान आहे त्याला हे समजते की आत्मा मारत नाही किंवा मारला जात नाही आत्म्याला जन्म नाही वा मृत्यू नाही तसेच तो एकदा होऊन पुन्हा कधीही होणार नाही असेही नाही तो अजन्म नित्य शाश्वत नेहमी अस्तित्वात असणारा कधीही मृत्यू न पावणारा आणि पुरातन आहे शरीराचा वध झाला तरीही तो मारला जात नाही ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा निरुपयोगी झालेले शरीर टाकून भौतिक शरीर धारण करतो या जीवात्म्याला शस्त्राने कापता येत नाही अग्नीने जाळता येत नाही पाण्याने भिजवता येत नाही वाऱ्याने सुकवता येत नाही हा न तुटणारा न भिजणारा न विरघळणारा न सुकणारा नेहमी टिकणारा सर्वव्यापी न बदलणारा निश्चल आणि शाश्वत असाच राहणारा आहे न दिसणारा अकल्पनीय न बदलणारा अविकारी आहे कोणी या आत्म्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात कोणी त्याला   आश्चर्यकारक म्हणून वर्णितात कोणी हा आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतो त्याच्याविषयी ऐकल्यावर ही त्याला मुळीच जाणत नाही अशा प्रकारे आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट केली आहे.                       प्रश्न दुसरा ___ अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे असे सांगताना भगवंत म्हणतात क्षत्रीय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तुला असे समजले पाहिजे की धर्म तत्वाच्या दृष्टीने  युद्ध पेक्षा तुला अधिक चांगला  व्यवसाय नाही म्हणून तुला डगमगन्याची जरूरी नाही प्रयत्न न करता ज्यांना युद्धाच्या  संधी मिळतात स्वर्गद्वारे त्याच्या करिता खुली होतात तू जर हे धर्म युद्ध  केली नाहीस तर तुझी कर्तव्ये करण्यात हायगय केल्याबदल तुला निश्चित पणे पाप लागेल तू  योद्धा म्हणून तुझी किर्ती गमावशील तुझी अपकिर्ती होईल सन्मानिय  माणसाला अपकिर्ती मरण्यापेक्षा अधिक वाईट आहे महारथींना  तू भीती ने रणांगणात सोडून गेलास असे वाटून ते तुला भित्रा समजतील तुझे शत्रू तुला तुच्छ लेखून उपहास करतील  तुला ह्या पेक्षा अधिक दुःख कोणते असेल रणांगणात  तू मरशील किंवा विजयी होशील तुला स्वर्ग लोक प्राप्त होईल किंवा पृथ्वी चे राज्य उपभोगशील म्हणून युद्ध कर सुख/दुःख लाभ  / हानी जय/पराजय याचा विचार न करता युद्ध कर म्हणजे तुला पाप लागणार नाही जेव्हा तू निष्काम काम करशील तेव्हा तू स्वतःला कर्माच्या बंधनातून मुक्त करू शकशील ह्यात कोणते ही नुकसान नाही उलट धोका दायक भया पासून संरक्षण होते, जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एक असते जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात हे अर्जुना तू त्रिगुणातीत हो योगक्षेम याच्या संबंधिच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो तुला फक्त नेमलेले कर्तव्य करण्याचा अधिकार आहे तुझ्या कर्माच्या फळांना तू कारण आहेस असे कधीही समजू नकोस तू आवडीने तुझे कर्तव्य करावेस तू योगात स्थिर होऊन तुझे कर्तव्य कर मनाच्या समतोल पणाला योग म्हणतात सकाम कर्मापासून तू स्वतःला मुक्त कर भक्ती योग रूप कृष्ण भावनेला पूर्णपणे शरण जा कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा असणारे अत्यंत दिन आणि कमी दर्जाचे आहेत योग कर्म सु कौशल्य म्हणजे तू योगा करिता प्रयत्न कर आणि योग हेच सर्व कर्मातीत कौशल्य होय असे भगवंतांनी अर्जुनाला युद्ध न करणे कसे विपरीत आहे हे पटवून दिले, गीता अध्याय दोन श्लोक क्रमांक 31 ते 50 
प्रश्न तिसरा____मनाचे  अधिपत्न विषयी सांगताना भगवान म्हणतात, गीता अध्याय दोन श्लोक क्रमांक 62 ते 72 
इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करताना मनुष्याची विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते त्यातून वासना व वासनेतून क्रोधाच्या उद्भव होतो क्रोधापासून अविवेक किंवा भ्रांतीपासून स्मृति गोंधळ त्यामुळे बुद्धीनाश होतो बुद्धीनाशामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा भौतिक डबक्यात पतीत होतो स्वातंत्र्याच्या नियमबद्ध तत्त्वाचे आचरण करून जो आपली इंद्रिये ताब्यात ठेवू शकतो त्याला भगवंताची कृपा प्राप्त होऊन तो. आसक्ती मुक्त होतो दैवी भावनेत स्थिर झालेल्या त्रिविध दुःख राहत नाहीत प्रसन्न अवस्थेत मनुष्याची वृद्धी लवकर स्थिर होते आध्यात्मिक भावना नसणाऱ्यांचे मन संयमित नसते बुद्धीही स्थिर नसते मन आणि बुद्धी स्थिर झाल्या वाचून शांती प्राप्त होत नाही शांती शिवाय सुख कसे मिळणार एखादा इंद्रियावर मन केंद्रित झाले तरी ते इंद्रिय मनुष्याच्या बुद्धीला इकडे तिकडे ओढून नेते ज्याची इंद्रिये विषयापासून आवरलेली  असतात त्याची बुद्धी स्थिर असते प्राणिमात्रांची रात्र आत्मसन यमी माणसाची जागृती असते प्राणिमात्रांची जागृतीची वेळ आत्म संयमी माणसाची रात्र असते इच्छांचा प्रवाह सतत वाहत असताना जो मनुष्य क्षुब्ध होत नाही त्याला शांती मिळते इच्छा तृप्त करण्याकरिता जगडणाऱ्याला शांती मिळत नाही ज्यांनी सर्व इच्छा मालकी ममता अहंकार या भावनांचा त्याग केला आहे तो खरी शांती प्राप्त करू शकतो. आध्यात्मिक आणि दैविक जीवनाचा हाच मार्ग आहे त्यामुळे मनुष्य मोहित होत नाही अशा अवस्थेत तो मरणाच्या वेळी सुद्धा परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतो हे परिणाम होतात

Ans.14. कमल देवरे ताई लिहितात .....


प्रश्न आत्म्याची अमरता अखंडता स्पष्ट करा 
उत्तर हो या आत्म्याला मरणार असं समजतो तसेच महात्मा मेला असे मानतो तो ते दोघी दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक कोणाला माहित नाही व कोणाकडून मारला जात नाही हा आत्मा कधीही जन्म त नाही आणि मरतही नाही तसेच एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होत नाही कारण हा जन्मसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा मरत नाही. हे जो तो कोणाला कसा ठार  मारील ज्याप्रमाणे माणूस जुने वस्त्र टाकून नव्हे वस्त्र परिधान करतो. ह्या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे हा आत्मा अव्यक्त अचिंत्य आणि विका र रोहित आहे असे असताना तू अशोक करू नको जो जन्माला येतो त्यास एक दिवस मृत्यू निश्चित आहे आणि जे मेले त्यांना जन्म निश्चित आहे म्हणून या गोष्टीचा शोक करू नकोस ते योग्य नाही हा आत्मा अखंड अखंड आहे या गोष्टीचा शोक करू नकोस प्रश्न दुसरा योग कर्म असू कौशलम म्हणजे काय उत्तर भगवान अर्जुन म्हणाले की आत्मा कोणाकडून मारला जात नाही असे असताना तू हे ऐनवेळी युद्ध न करण्या चा निर्णय चुकीचा आहे स्वतःचा धर्म लक्षात घेता तू नबीता कामा नये. कारण कारण क्षत्रियांना धर्माला अनुसरून युद्ध करणे कल्याण कारक हे पार्थ आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाची दार भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. असे असताना तू जर हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून बसशील पापाला जवळ करशील असे असताना सर्व लोक तुझी चिरकाल अपकीर्ती सांगतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःखद आहे शिवाय ज्यांच्या दृष्टीने आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने तुच्छ ठरशील तुला भित्रा म्हणतील ‌. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील तुला नको ते बोलतील याहून दुःखदायक काय असू शकते. योग कर्म सु कौशल्य म जर युद्धात शत्रू पक्षाकडून मारला गेलास तर स्वर्गात जाशील. शत्रु पक्षाकडून जिंकलास तर स्वर्गाचे राज्य उपभोगशील म्हणून तू युद्धाला.. उभा रहा जय पराजय फायदा तोटा सुखदुःख समान म्हणून युद्धाला तयार हो तुला पाप. कर्मयोगात बीजाचा नाश च नाही फळ रूप दो सही नाही उलट जन्म मृत्यूच्या भयापासून रक्षण होते. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे त्याचा फळा विषयी अधिकार नाही. म्हणून तू कर्म फळाचा आग्रह धरू नकोस आणि  त्याग करू नकोस. म्हणून तू कर्तव्य कर्म कर. फळाची चा बाळगणारे अत्यंत दिन होतं. सम बुद्धीचा मनुष्य पाप व पुण्य याचा त्याग करतो. ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्म रूप बंधनातून मुक्त होऊन परम पदाला प्राप्त होतात. मनाच्या पतनाच्या पायऱ्या उत्तर विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषांमध्ये विषयासंबंधी आसक्ती निर्माण होते ती प्राप्त करण्यासाठी इच्छा होते. इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. क्रोधामुळे विवेक बुद्धी धूसर होते. परिणामी निर्णय क्षमता नष्ट होते स्मरणशक्ती कमजोर होते. स्मरणशक्ती कमजोर झाली की बुद्धीचा नाश होतो त्या माणसाचे जीवन विस्कळीत होते आत्म्याची शांती नष्ट होते तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा रीतीने त्याचे पतन होते.

Ans 15.  सुभाष कुलकर्णी......

प्रश्न ३ (A) -- आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा?
उत्तर -- अर्जुनाने भगवंताला सांगुन रथ दोन्ही सैन्या मध्ये नेला. त्याने कौरव सैन्याचे निरिक्षण केले. त्याला आप्त, बंधु, स्वकीय, आजोबा गुरू व इतर नातेवाईक मित्र दिसले. त्याच्या मनात युद्धा विषयी घृणा आली. त्यांना मारुन पाप लागेल या विचाराने त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आपली शस्त्रे खाली टाकली.
भगवंत अर्जुनाला युद्ध करण्या बद्दल उपदेश करतात. त्याच्या दोलायमान मन: स्थितीला आवर घालुन युद्ध करणे कसे धर्म युक्त आहे व कां? करावे हे त्याच्या मनावर प्रभाव टाकीत पटवून देतात. त्याला आत्म्या बद्दलची अमरता स्पष्ट करतात. ते सांगतात कोणत्याही काळी मी व तू किंवा हे राजे नव्हते असे नाही, या पुढे ही आम्ही सर्व जण असणार आहोत. अविनाशी वस्तू चा नाश कुणी करू शकत नाही. तर जिवात्म्याची शरीरे नाशिवंत आहेत. जो आत्मा मेला असे मानतो तो अज्ञानी आहे. वास्तविक आत्म्या कुणाला मारीत नाही किंवा कुणा कडून मारला जात नाही. आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही. एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होत नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरीही हा मारला जात नाही. त्यात परिवर्तन होत नाही,नाश होत नाही, क्षती होत नाही, त्याच्या अभाव होता नाही तो अविनाशी आहे अमर आहे.
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृण्हाति नरोऽपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही
ज्या प्रमाणे माणूस जूनी वस्त्रे टाकुन देउन नवी वस्त्रे परिधान करतो त्याच प्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो. हा देही जुन्या शरीररांना टाकून कर्मानुसार अथवा अंत:कालीन चिंतनानुसार नव नवीन शरीरांना प्राप्त होतो. 
नैनं छिन्दन्ति शस्राणि नैनं दहति पालक:
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुती:
आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही कारण आत्मा न कापता येणारा,  जाळता न येणारा, भिजवता न येणारा नि: संशय वाढवता न येणारा आहे. तसेच तो नित्य सर्व व्यापी अचल आणि स्थिर आहे. आत्मा अव्यक्त आहे अचिन्त्य आहे आणि विकार रहित आहे. हे अर्जुना‌ आत्मा वर सांगितल्या प्रमाणे आहे हे लक्षात घे व शोक करणे सोड हे योग्य नाही. जरी तू आत्मा नेहमी जन्माला व मरणारा आहे असे तू माणत असशील तरी सुद्धा हे माहाबाहो! तू असा शोक करणे योग्य नाही. जन्माला आलेल्यांचा मृत्यू निश्चित आहे. प्राणी जन्मा पूर्वी अप्रगट असतात आणि मेल्या नंतर ही अप्रगट होणार. आशा शाश्वत सत्या बद्दल शोक करणे योग्य नाही.
B -- अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे या बद्दल भगवंतांनी काय सांगितले आहे? योग: कर्मसु कौशल् म्हणजे काय? 
उत्तर -- अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला त्याला युद्ध अधर्म वाटले. आप्त स्वकीय बंधु आजोबा गुरू व मित्र नातेवाईक यांची युद्धात हत्या पाप वाटले. भगवंतांनी त्याला उपदेश केला, त्याची निर्भत्सना केली. भगवंत म्हणाले हे अर्जुना! या भलत्याच वेळी तुला हा युध्द न करण्याचा मोह कशा मुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि किर्ती कारक नसलेला मार्ग कां पत्करतोस. हे पार्थ! हा षंढपणा पत्करू नकोस. हे तुझ्या क्षत्रिय धर्माला शोभत नाही. हे परंतपा! अंत:करण्याचा तुच्छ दुबळेपणा सोडून दे व युद्धाला सज्ज हो. हे अर्जुना! युद्ध प्रसंगी तुझ्यात शूर वीरता व उत्साह हवा. तुझ्यात ही नपुंसकता आणि कायरता कुठून आली. धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहुन दुसरे कोणतेही कल्याणकारी कर्तव्य नाही. हे पार्था! समोर आलेले स्वर्गाचे व्दार असे हे युद्ध भाग्यवान क्षेत्रियांनाच लाभते. जर तू हे धर्म युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि किर्ती गमावून बसशील व पापाला जवळ करशील. सर्व लोक तुझी चिरकाल अपकिर्ती सांगतील आणि सन्मानणिय पुरुषाला अपकिर्ती मरणाहून दु:सह्य वाटते. ज्यांच्या दृष्टीने तु अतिशय आदरणिय आहेस त्यांच्या दृष्टीने तु तुच्छ ठरशिल. ते तुला महारथी असुन युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. लोक तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. नको नको ते बोलतिल. ह्या पेक्षा दु:ख आणि क्लेश दायक काय असणार आहे. तू युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. हे अर्जुना! तू युद्धाचा निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो. जय पराजय फायदा तोटा सुख दु:ख समान मानुन युद्धाला तयार हो. युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. अर्जुनाला शंका आहे किं; युद्धात कुटुंबियांना मारले तर पाप लागेल परंतु भगवंत म्हणतात पापाचे कारण युद्ध नाही तर कामणा आहे म्हणून कामणेचा त्याग करुन युद्धासाठी तयार हो.
योग कर्मसु कौशलम् 
म्हणजे कर्मात योगच कुशलता आहे अर्थात कर्माच्या सिध्दी असिध्दीत कर्माच्या फल प्राप्ती अप्राप्ती मध्ये सम राहणेच कर्माची कुशलता आहे. उत्पती विनाश शील कर्मात योगा शिवाय दुसरी कोणतीही महत्वाची वस्तू नाही.
C -- प्रश्न-- मनाच्या अध:पतनाच्या पायऱ्या स्पष्ट करा आणि त्याचा काय परिणाम होतो ते लिहा ?
उत्तर -- मन हे चंचल असते मनावर ताबा मिळवणे अतिशय अवघड आहे त्या करिता इंद्रीये ताब्यात असायला हवीत. हे सहज शक्य नाही. मनावर ताबा नसल्यास ते विषयात गुतंते त्या मुळे विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्ती मुळे विषयाची कामणा वाढते कामणा पूर्ण न झाल्यास क्रोध (राग) येतो व तो वाढतच जातो. रागा मुळे मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. अविचार (मूढता) वाढल्याने स्मरण शक्ती भ्रष्ट होते स्मरण शक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्या मुळे माणसाचे अध:पतन होते.
       माणसाचे अध:पतन झाल्या वर त्याचा मनावरचा ताबा सुटतो तो कोणतेही निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकत नाही त्याची बुद्धी भ्रमिष्ट होते तो कुठल्याही निर्णयाप्रत येण्यास असमर्थ होतो त्याच्या निर्णयात संदेह व संभ्रम असतो त्याची निर्णय क्षमता नष्ट होते तो दु:खाने उद्विग्न आणि व्यथित असतो तो कुठलेही कल्याण कारी निर्णय घेऊ शकत नाही त्याच्या स्वतःचा आत्मविश्वास नाहीसा झालेला असतो  अध:पतनास तो स्वतःच जबाबदार असतो.

Ans.16. कल्पना बागडे ताई लिहितात ....

प्रश्न 3 रा A= आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा              2/19  जो या आत्म्याला मरणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो हे दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहाता तो कधीही कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही  2/ 20 आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही कारण आत्मा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी  आत्मा मारला जात नाही     2/ 22 ज्या प्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घालतो त्याप्रमाणे जीवात्मा जूनी शरीरे टाकून दुसर्या नव्या शरीरात जातो      2 / 23  या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही जाळता न येणारा भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल  स्थीर राहाणारा  आणि सनातन आहे         2 / 25  हा आत्मा अव्यक्त अचिंत्य विकाररहीत आहे  2/ 30 हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो म्हणून तु शोक करणे योग्य नाही  2/ 11 भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, पंडित ा प्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही त्या बद्यल  शोक करीत आहेस जे ज्ञानीजन आहेत  जीवितांबद्यल तसेच मृतांबद्यलही शोक करीत नाहीत    2 /13 ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरत पणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमखणे मृत्यु नंतर जीवात्मा दूसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा ह्या स्थित्यंतरा मुळे  जो मनुष्य धीराने पाहातो  तो या कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जात नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यु आहे पण आत्म्याला जन्म नसल्याने भूत वर्तमान आणि भविष्यही नाही  आत्मा नित्य सनातन अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही शरीरातील बाल्यावस्था कौमार्यावस्था  वृद्धावस्था  याचा काहीही परिणाम होत नाही आत्मा हा पूर्ण ज्ञानमय  आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो ह्रुदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकला नाही तरी त्याची उपस्थिती चेतने वरुनही जाणू शकतो  परमात्मा आणि जीवात्मा एकच वृक्षरुपी  शरीरातील ह्रदयात स्थित असतो  आत्त्म्याचे दोन प्रकार आहेत 1)सूक्ष्म अणूरुप आत्मा 2) परमात्मा   अणूरुप जीआत्मा  वृक्षाची फळे खात  असतो (भोग किंवा उपभोग) आणि परमात्मा फळे खाणाऱ्या कडे साक्षी भावाने बघत असतो               
B) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे या बद्यल भगवंतांनी काय सांगितले आहे "योग कर्मसु कौशल्यम" म्हणजे काय?                  
अर्जुन जेव्हा म्हणाला कि मला या युद्धापासुन कल्याणकारी असे काहीच दिसत नाही त्यामुळे मला शाश्वत नरकवासच भोगावा लागेल तेव्हा भगवंतांनी अर्जुनाची युद्ध नकरण्याच्या प्रव्रुत्ती बद्यल निंदा केली अशा प्रकारचे वाक्य भगवंतांनी अर्जुना ठिकाणी असलेल्या अज्ञानाचे प्रतीक होते  युद्ध भूमीवर अहिंसक बनने मुर्ख तत्वज्ञान आहे सर्व प्रकार च्या संकटापासून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रीयाचे प्रथम कर्तृव्य आहे आणि शत्रू सैन्याचा निःपात करावा आणि धर्म तत्त्वानुसार कर्तव्य आहे म्हणून अर्जुनाने युद्धात माघार न घेता  युद्ध केले पाहिजे असे सांगितले            2 /32 भगवंत सांगतात कि क्षत्रीयांना अशा प्रकारे युद्धाची संधी प्रयत्न न करता येते ते खरोखरच भाग्यवान असतात असे युद्ध धर्मतत्वानुसार केले जाते त्यांच्या साठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात  2 /33 परंतू तु जर हे कर्तव्य केले नाहीस तर  तुला  निश्चितच पाप लागेल  आणि  तु स्वतःला योद्धा म्हणून असलेली किर्ती गमावशील  2/ 34 लोक नेहमी तेंव्हा अपयशाचे वर्णन करतील आणि ही दुष्किर्ती म्रुत्यु पेक्षाही भयंकर असेल 2 /35 मोठमोठे महारथी सेनापती ना असे वाटेल कि तु भीती  मुळेच रणांगण सोडले   तुला ते तुच्छ  समजतील  2 /36 तुझे शत्रु तुला अनेक अपमानास्पद शब्दात तूझे वर्णन करतील आणि योग्य तेचा उपहास करतील  याहून अधिक दुःख काय असेल  तेव्हा भगवंत अर्जुनाला सल्ला देतात की या सर्वांचा विचार करून 2 /38 सुख दुःख  लाभ हानी जय पराजय याचा काहीही विचार न करता तु युद्धा साठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला काहीही  पाप लागणार नाही                    योग कर्मसु कौशल्यम म्हणजे काय?        भगवंत अर्जुनाला सांगतात की तु आसक्ती सोडून दे सिद्धी असिद्धी  यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होवून कर्तव्य  कर्म करणे यालाच योग म्हटले आहे निःष्काम कर्म करुन त्याच बरोबर सद्वविवेक बुद्धी चा उपयोग केल्याने कोणत्याही परिस्थितीत सम राहील आणि पाप पुण्याच्या कल्पनांचा तुझावर काहीही परिणाम होणार नाही या समत्व योगालाच तु आत्मसात कर आशा प्रकारे केले गेलेले कर्म त्या कर्माचे कौशल्य आहे त्यामुळे त्या पासून उत्पन्न  होणाऱ्या फळांचा त्याग करून तु जन्मबंधनाच्या पाशातून मुक्त होउन निर्वीकार अशा परमपदाला प्राप्त होशिल             
C)    आपल्या ठिकाणी असलेली व्यस्तता ,ताण तणाव आपल्य ठिकाणी असलेली आसक्ती ई ः कारणांनी व्यक्ती रोगी होतो  भगवंत अर्जुनाला सांगतात कि मनाला कितीही समजावले तरिही इंद्रियांना त्यांच्या विषयांमध्ये रसग्रहण करण्यातच ओढ असते त्या त्या विषयांची त्याला आसक्ती निर्माण होते अशी  विषयांची  चिंतनकरणाऱ्याला कामना उत्पन्न होते त्या पूर्ण न झाल्यास क्रोध (राग )येतो  राग आल्यावर त्याची स्मरणशक्ती भ्रष्ट  होते त्यामुळे त्यांच्या बुद्धी चा (ज्ञानशक्तीचा )नाश होतो त्यामुळे त्या व्यक्ती चे अधःपतन होते          जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏

Ans 18. नीलिमा चौधरी ताई .....

प्रश्न 3 चे उत्तर 
A ).  आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा 
    श्री भगवान अर्जुनाला म्हणाले तूं ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्याच्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानी आहेत ते जिवंत किंवा मेलेल्याबद्दल शोक करीत नाही.
   आत्मा नित्य आणि निर्विकार आहे.ज्याकाळी मी नव्हतो असा कोणताही काळ नव्हता तसेच तूं हे सारे राजे कधीही नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असे ही नाही .ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण , तारुण्य आणि वार्धक्य येते त्याप्रमाणे दुसरे शरीर मिळते 
असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो .ज्याने हे सर्व जग - दिसणार्या सर्व वस्तू व
यापल्या आहेत त्याचा नाश नाही त्या अविनाशींचा नाश कोणीही करु शकत नाही .या नाशरहित मोजता न येणाऱ्या ,नित्य स्वरुप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत.असे म्हटले गेले आहे म्हणून अर्जुना तूं युध्द कर .आत्मा अमर आहे 
 आत्मा कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही .आणि आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही.तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला ,नित्य, सनातन आणि प्राचीन आहे.ज्या प्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी वस्त्रे घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या शरीरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत,विस्तव जाळू शकत नाही,पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही .हा आत्मा नित्य ,सर्वव्यापी ,अचल, स्थिर आणि सनातन आहे .आत्मा अव्यक्त.आहे ,अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे .जन्मास आलेल्या मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे .
आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो .

B). अर्जुनाचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतानी काय सांगितले आहे? 
योग कर्मसू कौशल्यम म्हणजे काय ?
     अर्जुनाने युध्द भूमीवर समोर आप्तस्वकीयांना व गुरुजनांना पाहून युध्द न करण्याचा निर्णय घेतला . तेव्हा भगवंत त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन देतात .
 स्वधर्माची जाणीव करुन देतात कारण क्षत्रियाला,धर्माला अनुसरुन असलेल्या युध्दाहून दुसरे कोणतेही कल्याण कारक कर्तव्य नाही. आपसुकच समोर आलेले हे युध्द भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते .क्षत्रियाला उघडलेले स्वर्गाचे दारच आहे .भगवंत म्हणतात जर तूं हे  धर्मयुध्द केले नाहीस तर स्वधर्म आणि किर्ती गमावून पापाला जवळ करशील .तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती  मरणाहून दुःसह वाटते. भिऊन युध्दातून काढता पाय घेतला असे मानतील .तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील नको ते बोलतील याहून अधिक दुःख दायक काय असणार आहे .
       युध्दात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल अथवा  युध्दात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील.म्हणून हे अर्जुना ! तू युध्दात निश्चय करुन उभा रहा .जय -पराजय, फायदा- तोटा आणि सुख -दुःख समान मानून युध्दाला तयार हो . अशारितीने युध्द केलेस तर तुला पाप लागणार नाही .
  हे पार्था ! हा विचार तुला ज्ञान योगाच्यासंदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक ज्या बुध्दीने युक्त झाला असता तूं   कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या कर्मयोगात बीजाचा नाश नाही आणि फळरुप दोषही नाही जन्ममृत्यू मोठ्या भयापासून रक्षण करते .
   भगवंत म्हणतात हे अर्जुना ! या कर्मयोगात निश्चयात्मक बुध्दी एकच असते .परंतु अस्थिर विचार असणाऱ्या ,अविचारी ,कामनायुक्त माणसांच्या बुध्दीला असंख्य फाटे फुटलेले असतात. ते भोगात रमलेले असतात .असे अविवेकी लोक भोग व ऐश्वर्या त अत्यंत आसक्त असतात .तूं ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस.तसेच सुख -दुःखादी द्वंद्वांनी रहित,नित्यवस्तू असणार्या परमात्म्यात स्थित, योगक्षमाची इच्छा न बाळगणारा आणि अंन्तःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. फळाची अपेक्षा करु नकोस तसेच कर्म करण्याचा आग्रह धरु नकोस .

       योग कर्मसू कौशल्यम् म्हणजे काय? 

       हे धनंजया ! तूं आसक्ती सोडून तसेच सिध्दी आणि असिध्दी मध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. या समत्वालाच योग म्हटले आहे .या समत्वरुप बुध्दीयोगापेक्षा सकाम कर्मे अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजया ! तू समबुध्दीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुध्दी योगाचाच आश्रय घे.कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. समबुध्दीतच पुरुष पुण्य व पाप या दोहोंचा ही याच जगात त्याग करतो.अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरुप योगाला चिकटून राहा .हा समत्वरुप योगच कर्मातील दक्षता आहे म्हणजेच कर्म बंधनातून सुटण्याचा उपाय आहे . कारण समबुध्दीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करुन जन्मरुप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुध्दी मोहरुप चिखलाला पुर्णपणे पार करुन जाईल ,तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-परलोकांतील सर्व भोगापासून विरक्त होशील. तर्हेतर्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुध्दी जेव्हा परमात्म्यात अचलपणे  स्थिर  राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल.

C).  मनाच्या अधःपतनाच्या  पायर्या स्पष्ट करा आणि त्यांचा काय परिणाम होतो ते लिहा .
        
ध्यायतो विषयान्पुंस , सग्डस्तेषूपजायते।
सग्डात्सञ्जायते  कामःकामात्क्रोधो भिजायते ।।62।।

क्रोधाद्भवति सम्मोहः, सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद बुध्दिनाशो , बुध्दिनाशात्प्रणश्यति।।63।।
  
      विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्ती मुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते .कामना पुर्ण झाल्या नाहीत की राग येतो .
      रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो .मूढतेमूळे स्मरण शक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुध्दीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो आणि बुध्दीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

Ans. 19. अश्विनी पैठणकर...

१) आत्म्याची अमरता आणि अखंडता (भगवद्गीता अध्याय २)

भगवद्गीतेनुसार, आत्मा हा नित्य, अविनाशी आणि अखंड आहे. तो कधीही जन्मत नाही आणि मरत नाही. तो फक्त शरीर बदलतो.

श्लोक – भगवद्गीता (२.२०)

न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूयः |
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ||

अर्थ:
आत्मा कधीच जन्मत नाही किंवा मरत नाही. तो नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही.

✅ वेगळे स्पष्टीकरण:

आत्मा म्हणजे परम चैतन्यशक्ती आहे.

त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येत नाही, कोणत्याही अग्नीने जाळता येत नाही, कोणत्याही पाण्याने भिजवता येत नाही आणि कोणत्याही वाऱ्याने वाळवता येत नाही (गीता २.२३).

म्हणून, मृत्यू ही केवळ शरीराची समाप्ती आहे, आत्म्याचा प्रवास सतत चालू असतो.
२) अर्जुनाचे युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विरुद्ध का?

अर्जुन युद्ध न करण्याचा विचार करतो कारण त्याला वाटते की युद्ध म्हणजे नातेवाईकांचा संहार. पण श्रीकृष्ण स्पष्ट करतात की त्याचे कर्तव्य क्षत्रिय म्हणून धर्मयुद्ध करणे आहे.

श्लोक – भगवद्गीता (२.३३)

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि |
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ||

अर्थ:
जर तू या धर्मयुद्धात भाग घेतला नाहीस, तर तू आपले कर्तव्य आणि कीर्ती गमवशील आणि पापी ठरशील.

✅ वेगळे स्पष्टीकरण:

क्षत्रियाचे कर्तव्य (स्वधर्म) आहे अन्यायाविरुद्ध लढणे.

अर्जुन युद्ध टाळल्याने अधर्माचा विजय होईल आणि समाजात अराजकता पसरेल.

कर्तव्य टाळणे म्हणजे स्वतःच्या धर्माशी प्रतारणा करणे.

३) "योगः कर्मसु कौशलम्" म्हणजे काय? (भगवद्गीता २.५०)

श्लोक – भगवद्गीता (२.५०)

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते |
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ||

अर्थ:
समत्वबुद्धी असलेला मनुष्य चांगले आणि वाईट कर्मफळ त्यागतो. म्हणून तू योगयुक्त हो. कारण कर्म करण्यातील श्रेष्ठ कौशल्य म्हणजे योग होय.

✅ वेगळे स्पष्टीकरण:

कर्म करताना त्याच्या फळाची अपेक्षा करू नये.

निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करत असताना त्याचा अहंकार ठेवू नये.

योग्य वृत्तीने कर्म करणे हेच कौशल्य आहे.
➡ उदाहरण: शेतकरी पिक लावतो, पण तो हवा, पाऊस आणि नैसर्गिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो फळाच्या अपेक्षेने काम करत नाही, फक्त आपल्या कर्तव्याला प्रामाणिक राहतो.

४) मनाच्या अधःपतनाच्या पायऱ्या आणि त्याचे परिणाम (भगवद्गीता २.६२-६३)
श्लोक – भगवद्गीता (२.६२-६३)
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते |
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते || (२.६२)

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः |
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || (२.६३)

अर्थ:
जेव्हा माणूस विषयांच्या चिंतनात मग्न होतो, तेव्हा त्याच्याशी आसक्ती निर्माण होते.
आसक्तीतून इच्छा (काम) निर्माण होते, इच्छा पूर्ण न झाल्यास राग (क्रोध) उत्पन्न होतो.
क्रोधामुळे मोह निर्माण होतो, मोहामुळे स्मृतीचा नाश होतो, स्मृती गेल्यावर बुद्धी भ्रष्ट होते आणि शेवटी तो नाश पावतो.

✅ वेगळे स्पष्टीकरण:
अधःपतनाच्या ७ पायऱ्या:

1. विषयांचे चिंतन – सतत भौतिक सुखाच्या गोष्टींचा विचार करणे.

2. आसक्ती निर्माण होणे – त्या गोष्टी मिळवण्याची तीव्र इच्छा वाढणे.

3. इच्छा (काम) – ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.

4. क्रोध – इच्छा पूर्ण झाली नाही की संताप येणे.

5. मोह – क्रोधामुळे बुद्धीचा भ्रम होणे.

6. स्मृतीचा नाश – काय योग्य, काय अयोग्य याचा विसर पडणे.

7. बुद्धीचा नाश व संपूर्ण विनाश – मनुष्य अधर्माच्या मार्गावर जाऊन पतन पावतो.
➡ उदाहरण: जर कोणी धनप्राप्तीचे सतत विचार करत असेल आणि ते मिळाले नाही तर तो क्रोधित होतो. क्रोधामुळे त्याचा विवेकबुद्धीचा नाश होतो आणि तो चुकीचे मार्ग (भ्रष्टाचार, चोरी) वापरतो, ज्यामुळे त्याचे जीवन नष्ट होते
अध्यात्मिक संदेश आणि जीवनातील उपयुक्तता

1. आत्मा नित्य आहे – म्हणून मृत्यूची भीती ठेवू नये.

2. कर्तव्य करणे महत्त्वाचे आहे – क्षत्रिय असो वा सामान्य माणूस, प्रत्येकाने आपले कर्म प्रामाणिकपणे करावे.

3. योग आणि समत्वबुद्धी – निष्काम कर्मयोग आत्मसुख आणि शांती देते.

4. मनावर नियंत्रण आवश्यक आहे – अधःपतन टाळण्यासाठी विषयवासनेवर संयम ठेवा.

Ans.20. मीरा ओक.....

 प्रश्न: ३ a) आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा.  
उत्तर: जे अविनाशी तत्व आहे ते विश्वव्यापी तत्व अखंड आणि अमर आहे.  त्याचा नाश कधीच संभवत नाही.  जीवात्मा मूळ आत्माच आहे. तो जीवाभावाला येतो.  तो अप्रमेयी, अव्ययी, अविनाशी आहे.  जातो तो देह.  त्यामुळे देहाने घेतलेले नाम, रुप, आकार सर्व नाशिवंत आहे.   मिथ्या आहे.  परंतु,  देह ज्या जीवाच्या अस्तित्वावर म्हणजेच ज्या  अस्तित्वावर चाललेला आहे, तो जीवात्मा अमर आहे.  हा जीवात्मा पूर्णरूपाला किंवा आत्मरुपाला गेला नाही तर पुन्हा जन्म घेऊन दुसरा देह धारण करतो.

     आत्मा कसा आहे?  ' न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ! अजो नित्य: शाश्वतोsयं पुराणे! न हन्यते हन्य माने शरीरे!!  शरीर जाणार आहे.  परंतु त्यांच्यात राहून, ज्याचा नाश होत नाही असा जो आत्मा तो अमर आहे.  त्याला जन्म नाही, मृत्यु नाही.  तो पूर्वी होऊन गेला अस काही नाही.  तर तो शाश्वत, नित्य आणि सनातन आहे.  आत्म्याला कधीही भंग नाही.  उदा. छायेवर शस्त्र मारले असता तारेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तसा देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाहीं.  आत्म्यावर शस्त्र मारता येत नाही  कारण तो अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा आहे.  क्षर म्हणजे नाश न होणारा.  अव्यय म्हणजे ज्याला व्यय नाही जो कमी होत नाही, अविनाशी म्हणजे ज्याला नाश नाही असा
आहे.
  तो शस्त्राने चिरला जात नाही, अग्निने जळत नाही, पाण्याने विझत नाही, वाऱ्याने सुकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा अव्यक्त, अचिंत्य, स्थिर, अचल, सनातन आहे.
  • अव्यक्त म्हणजे तो दिसत नाही पण याचा अर्थ तो नाही असा नाही. खूप गोष्टी अशा असतात की दाखवता येत नाहीत, त्या इंद्रियगोचर नसतात. दृष्टीला दिसत नाहीत पण नाही म्हणता येत नाहीत. तो सदा असतचि असे. त्यामुळे त्याचं अस्तित्व अखंड आहे.
  • तो अचिंत्य आहे म्हणजे त्याचे चिंतन करता येत नाही कारण ज्या बुद्धीने त्याला जाणवे, स्मरणात आणावे असा तो नाही म्हणून तो अचिंत्य आहे.
  • तो चंचल नाही, स्थिर आहे जसा तो अनादिकालापासून आहे, तसाच तो आता आहे आणि राहणार आहे म्हणून त्याला अचल म्हटले आहे. मन हे अतिशय चंचल आहे म्हणून या चंचल मनात आत्म्याचे ग्रहण करता येत नाही त्यासाठी ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे ज्यायोगे मन अभ्यासाने, वैराग्याने आवरून स्थिर केले असता ते मन स्वरूपाच्या ठिकाणी लीन होते व त्या आत्म्याचा अनुभव घेता येतो म्हणून तो अचल आहे.
  • तो सनातन आहे, अनादिकालापासून आहे. त्याला कोणताही विकार नाही, जे विकार आहेत ते मानला आणि बुद्धीला आहेत. देहात, मनात, बुद्धीत बदल होत असतात पण जे आत्मरूप आहे त्याला कोणताच विकार नाही. 
  मनुष्य ज्याप्रमाणे वस्त्र जुनी झाली की टाकून देतो त्याप्रमाणे जीवात्मा देह जीर्ण झाला किंवा अन्य काही कारणांनी टाकावा लागला तर आत्मा तो देह टाकून नवीन देह धारण करतो. जो जन्माला येतो तो जातो आणि जाणारा कालांतराने पुन्हा जन्माला येतो, जसे एक लाट विरली की दुसरी लाट निर्माण होते त्याप्रमाणे जगाचे हे रहाटचक्र चालूच असते. याप्रमाणे मूळ अधिष्ठानावर, ब्रह्मावर जो अव्यक्त आहे त्या अव्यक्तावर काही गोष्टी व्यक्त झालेल्या दिसतात. काही काळच त्याचं अस्तित्व असतं. 
  मूळात तो अव्यक्त आहे. अव्यक्तापासून व्यक्त निर्माण होतं आणि हे व्यक्त पुन्हा अव्यक्तात लीन होतं. मूळ अव्यक्त दिसत नाही, भासत नाही पण व्यक्त होतात असं वाटतं जसं आभाळात ढग आलेले दिसतात, कुठून येतात हे समजत नाही पण पाहता पाहता अनेक ढग जमा होतात. काही ढग वर्षाव करणारे असतात ते वर्षाव करतात आणि जातात. ते कशावर येतात ? तर मूळ आकाश त्यावर ते येतात आणि जातात याप्रमाणे अव्यक्ताची अखंडता कायम आहे.
   


b) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतानी काय सांगितले आहे? 
उत्तर: भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना, तू क्षत्रिय आहेस तुझा स्वधर्म काय आहे हे तू लक्षात घे.  युद्ध करण हे क्षत्रियाचे विहीत कर्म आहे.  रणांगणात आल्यानंतर त्याला धैर्याने तोंड देणे हे त्याचे काम आहे.  तेव्हा हा स्वधर्म तारक आहे.  त्याज्य ठेवता येत नाही.  जेव्हा जेव्हा स्वधर्म पुढे येतो तेव्हा तो पार पाडण हे स्वकर्म असते. म्हणून जीवनातील ध्येय गाठण्यासाठी आपल्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे ते ते प्रामाणिकपणे केले पाहिजे.  पुढे सांगतात, हे कर्म तू योग्य रीतीने केलेस तर इहआणि पर अशा दोन्ही ठिकाणी तुझ्या हिताचेच आहे.  ते कस?  तर मनात कोणतेही कपट ठेवू नकोस. एकदा लढायचे म्हटल्यावर तिथं सौम्यपणा नको.  शौर्याने, धैर्याने, तेजाने लढले पाहिजे.  परंतु त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करु नकोस.
   या युद्धाच्या निमित्ताने तुला स्वर्ग द्वार उघडे झाले आहे.  कारण वीरवृत्तीने मरण येणे हाच क्षत्रियांचा धर्म आहे.  इथे तर धर्मयुद्ध आहे.  तसंही मृत्यु काही कोणाला चुकलेला नाही तो येणारच.  मग लढता लढता मरण आले तर क्षत्रियांच्या दृष्टीने हा लाभ आहे की तू युद्धासाठी रणांगणात उभा आहेस.  म्हणून हे धर्माने जणू निदान प्रगट झाले आहे.  तू माघार घेऊ नकोस. अचानकपणे तोंड उघडताच तोंडांत अमृत पडावेहे जितकं भाग्याचं तसं हे रणक्षेत्र तुझ्यासाठी भाग्य उघडून उभं आहे.

परंतु हे युद्ध तू केल नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल,

प्रश्न: ३ a) आत्म्याची अमरता आणि अखंडता स्पष्ट करा.  
उत्तर: जे अविनाशी तत्व आहे ते विश्वव्यापी तत्व अखंड आणि अमर आहे.  त्याचा नाश कधीच संभवत नाही.  जीवात्मा मूळ आत्माच आहे. तो जीवाभावाला येतो.  तो अप्रमेयी, अव्ययी, अविनाशी आहे.  जातो तो देह.  त्यामुळे देहाने घेतलेले नाम, रुप, आकार सर्व नाशिवंत आहे.   मिथ्या आहे.  परंतु,  देह ज्या जीवाच्या अस्तित्वावर म्हणजेच ज्या  अस्तित्वावर चाललेला आहे, तो जीवात्मा अमर आहे.  हा जीवात्मा पूर्णरूपाला किंवा आत्मरुपाला गेला नाही तर पुन्हा जन्म घेऊन दुसरा देह धारण करतो.

     आत्मा कसा आहे?  ' न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ! अजो नित्य: शाश्वतोsयं पुराणे! न हन्यते हन्य माने शरीरे!!  शरीर जाणार आहे.  परंतु त्यांच्यात राहून, ज्याचा नाश होत नाही असा जो आत्मा तो अमर आहे.  त्याला जन्म नाही, मृत्यु नाही.  तो पूर्वी होऊन गेला अस काही नाही.  तर तो शाश्वत, नित्य आणि सनातन आहे.  आत्म्याला कधीही भंग नाही.  उदा. छायेवर शस्त्र मारले असता तारेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तसा देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाहीं.  आत्म्यावर शस्त्र मारता येत नाही  कारण तो अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा आहे.  क्षर म्हणजे नाश न होणारा.  अव्यय म्हणजे ज्याला व्यय नाही जो कमी होत नाही, अविनाशी म्हणजे ज्याला नाश नाही असा
आहे.
  तो शस्त्राने चिरला जात नाही, अग्निने जळत नाही, पाण्याने विझत नाही, वाऱ्याने सुकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा अव्यक्त, अचिंत्य, स्थिर, अचल, सनातन आहे.
  • अव्यक्त म्हणजे तो दिसत नाही पण याचा अर्थ तो नाही असा नाही. खूप गोष्टी अशा असतात की दाखवता येत नाहीत, त्या इंद्रियगोचर नसतात. दृष्टीला दिसत नाहीत पण नाही म्हणता येत नाहीत. तो सदा असतचि असे. त्यामुळे त्याचं अस्तित्व अखंड आहे.
  • तो अचिंत्य आहे म्हणजे त्याचे चिंतन करता येत नाही कारण ज्या बुद्धीने त्याला जाणवे, स्मरणात आणावे असा तो नाही म्हणून तो अचिंत्य आहे.
  • तो चंचल नाही, स्थिर आहे जसा तो अनादिकालापासून आहे, तसाच तो आता आहे आणि राहणार आहे म्हणून त्याला अचल म्हटले आहे. मन हे अतिशय चंचल आहे म्हणून या चंचल मनात आत्म्याचे ग्रहण करता येत नाही त्यासाठी ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे ज्यायोगे मन अभ्यासाने, वैराग्याने आवरून स्थिर केले असता ते मन स्वरूपाच्या ठिकाणी लीन होते व त्या आत्म्याचा अनुभव घेता येतो म्हणून तो अचल आहे.
  • तो सनातन आहे, अनादिकालापासून आहे. त्याला कोणताही विकार नाही, जे विकार आहेत ते मानला आणि बुद्धीला आहेत. देहात, मनात, बुद्धीत बदल होत असतात पण जे आत्मरूप आहे त्याला कोणताच विकार नाही. 
  मनुष्य ज्याप्रमाणे वस्त्र जुनी झाली की टाकून देतो त्याप्रमाणे जीवात्मा देह जीर्ण झाला किंवा अन्य काही कारणांनी टाकावा लागला तर आत्मा तो देह टाकून नवीन देह धारण करतो. जो जन्माला येतो तो जातो आणि जाणारा कालांतराने पुन्हा जन्माला येतो, जसे एक लाट विरली की दुसरी लाट निर्माण होते त्याप्रमाणे जगाचे हे रहाटचक्र चालूच असते. याप्रमाणे मूळ अधिष्ठानावर, ब्रह्मावर जो अव्यक्त आहे त्या अव्यक्तावर काही गोष्टी व्यक्त झालेल्या दिसतात. काही काळच त्याचं अस्तित्व असतं. 
  मूळात तो अव्यक्त आहे. अव्यक्तापासून व्यक्त निर्माण होतं आणि हे व्यक्त पुन्हा अव्यक्तात लीन होतं. मूळ अव्यक्त दिसत नाही, भासत नाही पण व्यक्त होतात असं वाटतं जसं आभाळात ढग आलेले दिसतात, कुठून येतात हे समजत नाही पण पाहता पाहता अनेक ढग जमा होतात. काही ढग वर्षाव करणारे असतात ते वर्षाव करतात आणि जातात. ते कशावर येतात ? तर मूळ आकाश त्यावर ते येतात आणि जातात याप्रमाणे अव्यक्ताची अखंडता कायम आहे.
   


b) अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या कर्तव्याच्या विपरीत आहे याबद्दल भगवंतानी काय सांगितले आहे? 
उत्तर: भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना, तू क्षत्रिय आहेस तुझा स्वधर्म काय आहे हे तू लक्षात घे.  युद्ध करण हे क्षत्रियाचे विहीत कर्म आहे.  रणांगणात आल्यानंतर त्याला धैर्याने तोंड देणे हे त्याचे काम आहे.  तेव्हा हा स्वधर्म तारक आहे.  त्याज्य ठेवता येत नाही.  जेव्हा जेव्हा स्वधर्म पुढे येतो तेव्हा तो पार पाडण हे स्वकर्म असते. म्हणून जीवनातील ध्येय गाठण्यासाठी आपल्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे ते ते प्रामाणिकपणे केले पाहिजे.  पुढे सांगतात, हे कर्म तू योग्य रीतीने केलेस तर इहआणि पर अशा दोन्ही ठिकाणी तुझ्या हिताचेच आहे.  ते कस?  तर मनात कोणतेही कपट ठेवू नकोस. एकदा लढायचे म्हटल्यावर तिथं सौम्यपणा नको.  शौर्याने, धैर्याने, तेजाने लढले पाहिजे.  परंतु त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करु नकोस.
   या युद्धाच्या निमित्ताने तुला स्वर्ग द्वार उघडे झाले आहे.  कारण वीरवृत्तीने मरण येणे हाच क्षत्रियांचा धर्म आहे.  इथे तर धर्मयुद्ध आहे.  तसंही मृत्यु काही कोणाला चुकलेला नाही तो येणारच.  मग लढता लढता मरण आले तर क्षत्रियांच्या दृष्टीने हा लाभ आहे की तू युद्धासाठी रणांगणात उभा आहेस.  म्हणून हे धर्माने जणू निदान प्रगट झाले आहे.  तू माघार घेऊ नकोस. अचानकपणे तोंड उघडताच तोंडांत अमृत पडावेहे जितकं भाग्याचं तसं हे रणक्षेत्र तुझ्यासाठी भाग्य उघडून उभं आहे.

परंतु हे युद्ध तू केल नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल, स्वधरमाकडे तू पाठ फिरवलीस असे होईल ते पाप ठरेल पण ते स्वकर्म तू केलंस तर स्वधर्म निभावशील. तू रणांगणातून पाठ फिरवलीस तर तुझी दुष्कीर्ति गायली जाईल. आतापर्यंत मिळवलेली कीर्ती जाईलच शिवाय तू दया, करुणा दाखवून बाहेर पडतो आहेस हा तुझा विचार त्यांना मानवणार नाही. सज्जनांना मरण बरं पण अपकिर्ती नको असं जे वाटतं ते हे. तुझे मन कारुण्याने व्यापले आहे म्हणून तू शस्त्र खाली ठेवलस. तुझ्या वैऱ्यांना तुझा हा भाव लक्षात येणार नाही ते तुझा घात करतील, तुझ्यावर दुर्वचनांची लाखोली वाहतील, तुझ्या कृतीचा विपर्यास होईल, तू पळायचं जरी ठरवलंस तरी ते तुला घेरतील. तू जरी त्यांना मारणार नसलास तरी ते तुला मारतील. समजा त्यातूनही तू निसटलास तरी तुझ्या वाट्याला ईतकं लाजिरवाण जिणं येईल की तुला वाटेल मरण बरं म्हणुन सांभाळ.
  तुझे वैरी संधी साधून तुला अपशब्द बोलतील, तू घाबरलास, पळून गेलास, असं म्हणतील, अर्जुन भ्यायला म्हणतील आणि सभ्य मंडळी उच्चारित नाहीत असे शब्द उच्चार जे तुला सहन होणार नाही आणि सहन झाले नाही म्हणून नाईलाजाने तू शस्त्र हातात घेशील आणि त्यांच्याशी लढायला तयार होशील. असं करण्यापेक्षा तू आत्ताच इथे रणांगणात उभा आहेस तोवर शूरपणाने झुंजत का नाहीस? समजा जिंकलास तर राज्य मिळेल नाहीतर स्वर्गाचे दार उघडेल म्हणून तू युद्धाचा निश्चय कर आणि शस्त्र धारण कर. 
  स्वधर्मामध्ये दोष कोणता येतो? तर यामध्ये स्वार्थ असेल तर ते कर्म दूषित ठरतं म्हणून कोणता ही हेतू न धरता तू झुंजण्याच काम कर.  त्याचा परिणाम काय होतो इकडे पाहू नकोस.
   स्वधर्म करताना तुला पाप लागणार नाही.आणि तुला जी भिती वाटते आहे, तू माझ्यापासून दूर जाशील हे मन व बुद्धि च्या स्थितीमुळे.  ती कशी असायला हवी?  सुख प्राप्त झालं तर हर्ष मानू नको आणि दुःख झाल तर खेद मानून निराश होऊ नकोस.  जयपराजय, लाभअलाभ दोन्ही समान मान आणि हातात शस्त्र घे. रणांगणात जय अथवा मृत्यू काहीही होईल तो विचार न करता आता तुला काय करायचंय ते ठरव. स्वकर्म करताना जे स्वभावतः प्राप्त होईल ते तू सहन कर. या भूमिकेतून लढलास तर दोष लागणार नाही. लग्न आहे माझं काम आहे एवढेच दृष्टी ठेव. 
  पुढे पन्नासाव्या श्लोकात भगवान म्हणतात "बुद्धीयुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते| तसमाद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्||" योग: कर्मसु कौशलम् याचा अर्थ बऱ्याच वेळा असा घेतला जातो की आपल्या वाट्याला आलेलं कर्म चांगलं केलं की झालं इथे तसा अर्थ नाही तर कर्म चांगलं करायचंच आहे पण ते अशा हातोटीने केलं पाहिजे की कर्माच्या अंगाने भगवंताशी योग साधता येईल. उदाहरणार्थ एखादीचा स्वयंपाक उत्तम झाला की तो कर्माचा योगी नाही किंवा चित्रकाराने चित्र चांगले काढले म्हणजे तो कर्माचा योगी नाही तर पाककला किंवा चित्रकला चांगली असे म्हणू शकतो परंतु हे कर्म करत असताना ते भगवंतासाठी केलं जातं तेच प्राप्तव्य असतं केलेलं कर्म भगवंताला अर्पण करतो तेव्हा तो त्या कर्माचा योगी होतो असं म्हणता येईल. कर्म करून त्याचा बंध नाही हे कर्म कुशलता हीच योग साधण्याची खूण.

!!! श्री कृष्णार्पणमस्तू !!!


Comments