*प्रश्न आमचा उत्तर तुमचे*
दिनांक: 10 फेब्रुवारी 2025
उत्तर पाठवायची तारीख 17 फेब्रुवारी
अध्याय 2
Q.2.भगवंतानी निर्भत्सना केल्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली?
Answer 1.: राजश्री कोंडावार...
श्री भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायातील २,३ या श्लोकातून अर्जुनाची निर्भर्त्सना करतात_ ह्या युद्धाच्या विषम प्रसंगी तुला युद्ध न करावे असे कसे वाटू शकते? असे करणे म्हणजे पराक्रमी पुरुषाला अकीर्ति करणारे आहे.हा निव्वळ षंढपणा आहे.
भगवानांकडून अशी निर्भर्त्सना ऐकल्यावर अर्जुन स्वतःची बाजू मांडतोय.
युद्धात भीष्म_द्रोणांसारख्या गुरूजनांवर मी बाण सोडावे की त्यांना पूजनीय समजून युद्ध त्यजावे? गुरू जनांना मारून मी भोग घेण्यापेक्षा भिक्षा मागणं पसंत करेन.या to धार्तराष्ट्र....दुर्योधनादी बंधूंना मारून जय मिळवणं मला मान्य नाही.
मला तू योग्य ते मार्गदर्शन कर .मी तुझं शिष्यत्व पत्करतोय. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ans. 2. अश्विनी पैठणकर
प्रश्न:- *भगवंतांनी निर्भात्सना केल्यावर अर्जुनाने आपली मन : स्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली?*
*उत्तर* :- भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात, अर्जुनाने श्रीकृष्णाला आपली मनःस्थिती स्पष्ट करताना अनेक भावनिक आणि वैचारिक गोंधळ दर्शवaला आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला क्षत्रिय धर्म आणि युद्धाचे महत्त्व सांगितले, तेव्हा अर्जुनाने आपल्या मनःस्थितीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले:
**अर्जुनाची मनःस्थिती**
1. **शोक आणि मोह** - अर्जुन युद्धभूमीवर उभा असताना आपले बंधू, गुरुजन आणि नातेवाईक यांना समोर पाहून शोकग्रस्त होतो. तो म्हणतो की, "मी या युद्धात सहभागी झालो, तर मला आपल्या लोकांना मारावे लागेल, आणि त्यामुळे माझ्या हातून मोठे पाप होईल."
2. **कर्तव्यावरील गोंधळ** - अर्जुन युद्ध करावा का टाळावा, या संभ्रमात पडतो. त्याला वाटते की क्षत्रिय म्हणून युद्ध करणे आपले कर्तव्य असले तरी कुटुंबाचा नाश होणे योग्य नाही.
3. **अहिंसेचे तत्व** - अर्जुन म्हणतो की, "माझ्या प्रियजनांना मारण्यापेक्षा भिक्षुकी करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते." तो युद्धाच्या हिंसेला टाळण्याचा विचार करतो.
4. **पराभवाची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव** - अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की, "माझ्या हातून धनुष्य गळून पडत आहे, आणि माझा संपूर्ण देह कापत आहे." यावरून त्याची मानसिक स्थिती कमकुवत झालेली दिसते.
5. **शरणागती आणि मार्गदर्शनाची मागणी** - शेवटी, अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की, "मी आता तुझा शिष्य आहे, मला योग्य मार्ग दाखव." येथे अर्जुनाचा अहंकार गळून पडतो आणि तो भगवंताला शरण जातो.
**संबंधित श्लोक (गीता २.७)**
*"कर्पण्यदोषोपहतस्वभावः प्रच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्॥"*
**अर्थ:**
"मी कर्तव्याच्या संभ्रमाने ग्रस्त झालो आहे. माझी वृत्ती दीन झाली आहे. मी काय करावे ते मला समजत नाही. मी तुझा शिष्य आहे, मला योग्य मार्ग दाखव, मी तुझ्या शरण आलो आहे."
**निष्कर्ष**
अर्जुन सुरुवातीला युद्ध करण्यास तयार नव्हता. त्याच्या मनात दया, मोह, पराभवाची भीती आणि कर्तव्याचा संभ्रम होता. मात्र, शेवटी तो श्रीकृष्णाला शरण जातो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मागतो. यानंतर, श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचे उपदेश देतात आणि त्याला कर्मयोग, भक्ती, आणि ज्ञान यांचा खरा अर्थ समजावून सांगतात.
Ans. 3 स्वाती पाटील....
गीतेंच्या पहिल्या अध्यायात अर्जुन विषादामुळे हातातील धनुष्य टाकुन रथात मागे जाऊन बसतो.पहिल्या अध्यायात भगवंत कांहीच बोलत नाही.पण दुसर्या अध्यायात मात्र अर्जुनाच्या लक्षात येते की मी भगवंताला संन्यास घेतो म्हणालो तरी भगवान कांहीच बोलले नाही याचा अर्थ म्हणजे माझे कुठेतरी चुकत आहे.अर्जूनाच्या युक्तिवादाला भगवंताने २,३ श्लोकात खोडून काढले व त्याची निर्भत्सना केली.जेव्हा भगवंताने. अर्जुनाला फटकारले तेव्हा आपले कुठे तरी चुकत आहे याची जाणीव झाली जोपर्यंत अशी जाणीव होत नाही तो पर्यंत समोरच्याचे विचार तो ऐकत नाही.पण अर्जुना पुढे दोन कर्तव्य उभा राहीले आहेत एक म्हणजे क्षत्रियधर्मा प्रमाणे युध्द करणे व आप्तांना युध्दात मारणे .सरळ मनाचा कोणताही माणूस अशा वेळी गडबडून जातो.तो म्हणतो भीष्मांना व गुरूद्रोणंना मी कसा मारू ते मला पुजनीय आहेत व मी जो आज आहे हे त्या दोघांमुळेच आहे.त्यांनी जरी मला मारले तरी चालेल पण त्यांच्या रक्ताने मी हात बरबटणार नाही.त्यांना मारण्या पेक्षा भिक्षा मागावी असे त्याला वाटू लागले.
खरंच मला काय करावे कळत नाही त्यांना मारून आम्हाला जगावे वाटेल का ?मग अर्जुनाने पळवाट शोधली त्यांनाही मारणे नको कींवा आपणाला पण मरण नको त्यांच्या पेक्षा संन्यास घ्यावा.पण यावर सुध्दा भगवान कांहीच बोलले नाही.
मग मात्र अर्जुनाने सपशेल भगवंता पुढे शरणागती पत्करली व तो म्हणतो करूणा हा दोष माझ्यात निर्माण झाला आहे त्यामुळे माझा स्व भाव नष्ट झाला आहे या अशा परिस्थितीत कोणता धर्म पत्करावा हे मला कळेनासे झाले आहे माझ्या साठी काय श्रेयस्कर आहे हे मला सांगा मी तुझा शिष्य आहे.
अर्जुन म्हणतो जरी मला पृथ्वीचे राज्य मिळाले अथवा देवांचे राज्य जरी मिळाले तरी यांना मारून माझे इंद्रिय शुष्क पडतील तरी मला कल्याणाचा मार्ग दाखव मी तुला शरण आलो आहे.
Ans. 4. मालती जोशी ताई लिहितात....
अध्याय दोन भगवंतांनी निर्भस्तना केल्यावर अर्जुनाने आपली मनस्थिती श्लोक चार ते नऊ मध्ये व्यक्त केली आहे अर्जुन म्हणाला मधु दैत्याचा वध करणाऱ्या हे श्रीकृष्ण मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणा सारख्यावर युद्धात मी उलट प्रहार कसा करू शकतो जे माझे परमपूज्य श्रेष्ठ गुरु आहेत त्यांच्या जीविताला हानी करून जगण्यापेक्षा भिक्षा मागून या जगात राहणे अधिक चांगले आहे जरी ते लोभी आहेत तरी ते श्रेष्ठ आहेत जर त्यांना ठार मारले तर आपले भोग त्यांच्या रक्ताने माखलेले होतील दोघांपैकी कोण जिंकले तर चांगले हे मला कळत नाही धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठार मारून जगण्याची आमची इच्छा नाही तेच रणांगणात समोर उभे आहेत कर्तव्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे दुर्बलतेमुळे माझ्या मनाची शांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत सर्वात कल्याणकारी काय ते तुम्ही मला सांगा आता मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हास शरण आलेला असा मी जीव आहे कृपायुक्त होऊन मला उपदेश करा माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा माझा शोक ज्याच्या योगाने नाहीसा होईल असे साधन मला दिसत नाही स्वर्गातल्या देवासारखे स्वामित्व असणारे असे पृथ्वीवरील निष्कंठक व वैभव संपन्न राज्य जरी मला मिळाले तरीसुद्धा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुनाने याप्रमाणे बोलून श्रीकृष्णाला सांगितले की हे गोविंद मी युद्ध करणार नाही मग तो स्तब्ध राहिला
Ans. 5. कल्पना बागडे....
प्रश्न आमचा उत्तर तुमचे अध्याय २ रा ः- भगवंतानी निर्भत्सना केल्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली ? जेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात जर एखाद्या क्षत्रीयाचा पुत्र युद्ध करायचे नाकारतो तेव्हा तो फक्त नावापुरता क्षत्रीय राहतो तु जर युद्धाचाआआ त्याग। केलास तर तु अपकीर्तीकारक असे तुला न शोभणारे कार्य घडेल तुझे ते मनोर्दोबल्य लक्षात येईल अशा प्रकार े तु अशी हीन नपुंसकतेची कास धरु नकोस आणि तुझे। कर्तव्य जाण आणि युध्दाला तयार हो तेव्हा अर्जुनाच्या मनाची स्थिती श्लोक क्रमांक ४ आणि 5 मध्ये सांगितली आहे मला पूजनीय असलेल्या पितामह भीष्म द्रोणाचार्या व्यक्तींवर मी बाणांनी कसा हल्ला करु शकेन अशा महात्मा सम असणऱ्या गुरुजनांना मारुन जगण्यापेक्षा मला भिक्षा मागूनजगणे मलला अधिक श्रेयस्कर आहे असे। मला वाटते मला जरी भौतिक लाभा ची इच्छा असली तरी ते जेष्ठ आहेत माझ्या कडून जर त्यांची हत्या केलीतर माझे सर्व भोग रक्त रंजित होतील
Ans. 6. पूजिता ताई लिहितात...
नमस्कार
अर्जुन अजूनही संभ्रमात आहे आणि भगवंतांना मी भीतीमुळे युद्ध करायचे टाळत नाही आहे तर धर्माचे आचरण म्हणून युद्ध करत नाही आहे , आपण आतापर्यंत शत्रूंना, दुष्टांना मारले आहे परंतु आचरणात सर्वश्रेष्ठ आणि मला विद्या शिकवून निपुण धनुर्धारी बनविणाऱ्या भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य ह्यांना कसे मारू ? हळूहळू अर्जुनाचा भगवंतांवर असणाऱ्या विश्वासामुळे एक विचार असा ही करतो की धर्म तर भगवंतही जाणतात तरीही मला युद्धाची आज्ञा का करीत आहेत , म्हणून मग अर्जुन असे म्हणतो की, मी माझ्या गुरुजनांची हत्या करून केवळ सुख प्राप्त न करता दुःख आणि भोगच भोगेन , शांति आणि मुक्ती मिळणार नाही कुटुंबीयांच्या मृत्यूच्या कल्पनेने मला खूप शोक होत आहे मग त्यांच्या प्रत्यक्ष मृत्यूने , मला मिळालेल्या राज्याने मी कसा बर सुखी आणि शांत राहू शकेन....सारखें सारखें हेच सांगून मग एका क्षणी अर्जुनाला जाणवते की,भगवंतांनी मला भित्रा आणि हृदयदौर्बल्यम असे म्हटले आहे म्हणजे युद्ध न करणे माझ्यासाठी योग्य नाही , ही एक प्रकारची भीती आहे जी माझ्या स्वभावच्या अगदी विरुद्ध आहे , भगवंतांनी दाखविलेला भितीरूप दोष स्वीकारून आता स्वतःची दुर्बलता ओळखून की नाही मी माझ्या बुद्धीने धर्माविषयी काही निर्णय घेऊ शकत नाही आहे , मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्हीच मला ह्या मानसिक द्वंन्दतून मुक्त करा….
अशी विनंती अर्जुन भगवंतांना आपली मनस्थिती सांगून करीत आहे
Ans. 7. भारती ताई शेटे....
प्रश्न आमचा उत्तर तुमचे
अध्याय दोन
उत्तर:- दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाची निर्भतसना केली आहे.भगवंत अर्जुनाला म्हणतात, " हे रणांगण आहे, युद्धाच्या मधोमध उभा राहून अशा प्रकारची भीती किंवा भित्रेपणा तसेच पळपुटेपणा तुझ्यासारख्या शूरवीर योद्धयाला चांगले दिसत नाही"
तेव्हा अर्जुनाने आपली मनस्थिती वर्णन करताना सांगितले की मी माझ्या स्वतःच्या मृत्यूला भीत नाही मृत्यूला भीत नाही, पण माझ्या हातून मारल्या जाणाऱ्या, समोर उभ्या असलेल्या शूरवीर योद्धांच्या मृत्यूची मला भीती वाटत आहे. हे समोर असलेले शूरवीर युद्ध माझ्यासाठी कोणी परकीय शत्रू सैन्य नाहीत तर ते मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो ज्यांच्यामुळे मी लहानाचा मोठा झालो असे माझे आजोबा म्हणजे पितामह भीष्म यांच्या वरती मी बाण कसा चालवू तसेच गुरु द्रोणाचार्य जे माझे विद्या गुरु आहेत त्यांनी मला त्यांच्या पुत्रापेक्षाही काकणभर जास्तच विद्या दिली, जसे की ब्रह्मआस्त्रआचा उपसंहार हा मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे. तो त्यांनी आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या पुत्राला म्हणजे अश्वत्थाम्यालाही शिकविलेला नाही अशा परिस्थितीत मी त्यांच्यावरती बाण कसा चालवू. हे दोघेही माझ्यासाठी नेहमीच पूज्यनीय आणि वंदनीय आहेत. त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुद्धा माझ्यासाठी पाप आहे तर त्यांच्यावर शस्त्र चालविण्याचे पाप मी कसे करावे बरे?
अशा ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभावांचे युद्ध करून त्यांच्या रक्ताने माखलेल्या राज्याचा उपभोग घेण्यापेक्षा मी भिक्षा वृत्ती स्वीकारून तिच्यावर उदरनिर्वाह केला तर कोणता फरक पडतो क्षत्रियांसाठी भिक्षा मागणे हा धर्म नाही पण तसाच आपल्याच घरातील गेस्ट श्रेष्ठ गुरुजनांना ठार मारणे हा सुद्धा तर एक प्रकारचा अधर्माचा आहे पुढील श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहेत की युद्ध करणे किंवा न करणे आमच्यासाठी काय योग्य आहे? हे मला अगदी न कळेनासे झाले आहे युद्धाचा निर्णय काय लागेल किंवा भविष्यात काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही जय पराजय कोणाचा होईल हेही सांगता येत नाही एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय हा ठरलेला असतो आमचा विजय झाला तरीही मला माझ्या सर्व कुटुंबीयांना मारण्याचे पाप लागेल माझ्या कुटुंबीयांच्या मृत्युने माझा शोक आवडल्या जाणार नाही मी शोक सागरात बुडून जाईल मला मिळालेल्या राज्याचा उपभोग मला घेता येणार नाही एक तर येथे मला पृथ्वीवरचे राज्य मिळेल किंवा स्वर्गादीचे साम्राज्य मिळेल पण माझे सुखाची इच्छाच नष्ट झाली आहे येथे अर्जुनाने आपल्या कर्तव्याचा निश्चय निर्णय करण्यासाठी आपण असहमत असून भगवान श्रीकृष्णांनीच आपल्याला मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना करत आहेत ते सातव्या श्लोकामध्ये "कार्पणय दोषो पाहत स्वभाव: प्रयूच्छा मि त्वान धर्म समूढचेताः"अर्जुनाने येथे श्रीकृष्णाला माझ्यासाठी धर्मसंगत काय आहे आणि मी काय केले किंवा काय करू नये असे विचारले आहे. येथे अर्जुनाच्या मनाची चलबिचल दिसून येते, तसेच अर्जुनाने श्रीकृष्ण विषयी गुरूंची भावना मनात ठेवून त्यांना नमस्कार करून त्यांनीच आपले कल्याण करावे आणि त्यांनीच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवावा असे सुचविले आहे. कुटुंबीयांच्या नुसत्या मृत्यूच्या कल्पनेने ही मला जर इतके दुःख होत आहे तर ते कुटुंबीय खरोखरीच मेल्यावर तर मला किती दुःख होईल त्यापेक्षा मला पृथ्वीचे राज्य किंवा स्वर्गाचे अधिपत्य ही मिळाले नाही तरीही चालेल पण माझे प्रियजन मला हवे आहेत मी त्यांच्या मृत्यूचा शोक, दुःख सहन करू शकत नाही अशा प्रकारची झालेली मनस्थिती अर्जुनाने व्यक्त केली आहे.
Ans. 8. शरयु क्षीरसागर.....
ऊत्तर,,,,,,अध्याय 2मध्ये,करुणेने व्याप्त ज्याचे डोळे असवांनी भरलेले आहेत व्याकुळ दिसत आहेत अशा शोकाकुल अर्जुनाला त्याची कातरता मोह पाहुन भगवान श्रीकृष्ण, निंदा करतात, हे,अर्जुना या भलतेच वेळी हा मोह तुला का बरे झाला कशामुळे ऊत्पण झाला हाषंढपणा (कलैब्यम्) पत्करू नकोस हे तुला शोभत नाही अंतःकरणाचा दुबळेपणा सोडून दे आणि युद्धाला ऊभा राहा ,ह्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती व्यक्त केली, हे मधुसूदन, युद्धात मी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य याच्याविरुद्ध कसा लढू कारणे ते दोघे पूजनीय आदरणीय, वंदनीय आहेत युध्द करणे अथवा नकरणे या दोन्हींपैकी आम्हाला कायश्रेष्ठ आहे हे कळत नाही ,आम्ही जिंकू ते जिंकतील हे ही माहीत नाही,आणी त्याना मारून आम्हाला
जिंकण्याची ईच्छा नाही ,तेच आमचे बांधव धृतराष्ट्र पुत्र आमच्या विरूद्ध ऊभे आहेत ,करूणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्मा धर्मा चा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे ,आसा मीतुम्हाला विचारीत आहेही,जे साधन खात्रीने कल्याण कारक आहे,ते मला सांगा,कारण मी तुमचाशिष्य आहे तुम्हालाच शरण आलो आहे मला उपदेश करा (2/7)
आशा प्रकारे अर्जुनानेआपली मनस्थिती शरणागती होऊन स्पष्ट केली आहे ,भगवंताला शरण गेला आहे
Ans. 9. पुष्पा सहस्त्रबुद्धे
उत्तर=अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्मपितामहांचा आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरीसूदना ते दोघेही मला पूजा आहेत. म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच भोगावे लागतील. म्हणून मला हे युद्ध नको आहे. अर्जुनाने त्रिलोक्याचे निष्कंटक राज्य हे सुद्धा शोक निवारण्याचे कारण न मानता वैराग्याचा भाव प्रगट केला.
Ans. 10. ज्योती साठे.......
प्रश्न 2
भगवंताने निर्भत्सना केल्यावर अर्जुन म्हणत आहे
ज्यांना मी उच्च मान देतो त्यांच्याशी युध्द करणे म्हणजे
नैतिक व भावनीक संघर्ष करणे आहे भीष्म पितामह व गुरु द्रोणाचार्य हे महाभारताचे महान योध्दे व शिक्षक म्हणून ओळखले जातात त्यांच्याशी युध्द करणे व जे अर्जुनाचे गुरू आहेत त्यांना मारणे अर्जुनाला कठीण वाटते
गुरु जनांना मारुन मी ह्या जगात भिक्षा मागुन खाणे ही कल्याणकारी वाटते गुरु जनांना मारुन रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोग च भोगायचे ना युध्दात आम्ही जिंकू का ते जिंकतील हे ही आम्हाला माहीत नाही तेच धृतराष्ट्र पुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत
करुणा व्याप्तदैन्या मुळे ज्याचा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्मा धर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुध्दी असमर्थ आहे असा मी तुम्हांला विचारत आहे जे साधन खात्री ने कल्याणकारी आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे मी तुम्हांला शरण आलो आहे मला उपदेश करा कारण पृथ्वी चे शत्रू रहीत व धनधान्य समृध्द राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व मिळाले तरी माझ्या ईद्रीयांना शोषुन टाकणारा शोक जो दुर करेल असा उपाय मला सांगा
Ans. 11. मेधा पोफळी......
प्रश्न 2 रा उत्तर अर्जुन म्हणाला की मी मरणाला नाही भीत आहे ़मी मारण्यास घाबरतो आहे भीष्म आणि द्रोण हे तर पुजनीय आहे वंदनीय आहे अशा अशांना कटु शब्द पण बोलु नये मग मी त्याच्या बरोबर युध्द कसे करु मी या गुरुजनांना मारुन भोगच तर भोगील मला शांती थोडी मिळणार आहे युध्द करणे योग्य की अयोग्य हे मी समजु शकत नाही युद्धा मधे आम्ही जिंकु की नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाही यांना मारुन आम्ही जगु इच्छीत नाही़़माझी बुध्दी धर्माविषयक निर्णय घेण्यात काम करत नाही ़मी आपला शिष्य आहे ज्याने माझे कल्याण होईन असा उपदेश मला करा युध्द केल्याने मला संपन्न आणी निषकंटक असे राज्य मिळेल आणि देवतांचे अधिपत्य मिळेल असे मला वाटत नाही ़या महासार्मथयवान लोकांना मारण्या पेक्षा या जगात भिक्षा मागून खाल्लेले बरे ़असे इतके सगळे बोलुन अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला ़की मी युध्द करणार नाही अस बोलुन गप्प झाला ़
Ans. 12. माधुरी आपटे.....
भगवंतानी निर्भत्सना केल्यावर अर्जुनाने असे म्हणले कि मी कायर नाही आहे पण मी अधर्म होऊ नये म्हणून युद्ध करायला नाही म्हणत आहे. माझ्या समोर पितामह भीष्म आणि गुरू द्रोणाचार्य आहेत. भीष्मांचा आणि माझा जन्म संबध आहे त्यामुळे ते मला पूजनीय आहेत, आणि द्रोणाचार्य माझे विद्या गुरू आहेत त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले आणि अश्र्वत्थामा पेक्षाही वरचढ शिक्षण दिले. आम्हा दोघांना ब्रह्मास्त्र शिकवले पण त्याचा उपसंहार फक्त मला शिकवला.
असे हे दोघेही जन्म संबध आणि विद्या संबधाने मला पूजनीय आहेत. त्यांचा माझ्या वर पूर्ण अधिकार आहे. ते माझ्या वर प्रहार करू शकतात पण मी ते पाप करू शकत नाही
पुढिल श्लोकात अर्जुन म्हणतो जर मी युद्ध केले नाही तर दुर्योधन ही युद्ध करणार नाही. आम्हाला राज्य मिळणार नाही पण मी युद्धा पेक्षा भीक्षा मागून जीवन निर्वाह करायला तैयार आहे.
गुरू आणि आप्तेष्टांना मारण्यांपेक्षा तरी मला हेच उपयुक्त वाटते आहे.
जर मी युद्ध केले तर मला राज्य मिळेल ही पण मी रक्तरंजित हातांनी हे भोग भाग शकणार नाही.
ह्यानंतर च्या श्र्लोकात तो म्हणतो मी निर्णय घेण्यास असमर्थ आहे कि युद्ध करु कि नको करु. जर मी तुमच्या म्हणण्यानुसार युद्ध केले तरी हे नक्की नाही कि आपण जिंकु कि ते जिंकतील. तसेही कुटुंबियांना मारून राज्य उपयोगी शकत नाही. कुटुंबियांना मारून जिवंत राहणे म्हणजे धिक्कार आहे.
त्याच्या मनात द्वंद्व चालू आहे कि युद्ध केले तर पाप लागेल नाही केले तर मारले जाऊ केव्हां अपमान सहन करावा लागेल.
हा सर्व विचार करून पुढील श्र्लोकात तो भगवंताला शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकार करतो आणि तुम्ही सांगाल तसे मी करायला तैयार आहे असे सांगतो.
Ans. 13. सौ. स्वाती राजुरकर......
प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर,
अर्जुन युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला असता आपले स्वजन, आप्त यांना बघून त्याला खूप दुःख झाले , त्यामुळे तो व्याकुळ दिसू लागला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले, हे बघून भगवंतांनी अर्जुनाची चांगलीच कान उघडण केली, भगवंत अर्जुनाला म्हणाले हा मोह तुला भलत्याच वेळी कसा काय उत्पन्न झाला? हा मोह थोर, श्रेष्ठ यांनी स्वीकारलेला नाही, तुला स्वर्ग मिळवून देणारा नाही, यामुळे तुझी अपकीर्ती होईल ,हे तुला शोभत नाही तू असा षंढपणा करू नकोस, दुबळेपणा सोडून देऊन मन घट्ट करून युद्धाला उभा राहा ,अशी अर्जुन युद्धासाठी तयार व्हावा म्हणून भगवंतांनी त्याची निर्भस्सना केली,
हे ऐकून अर्जुन भगवंतांना सांगतोय, मी भीष्म पितामहा आणि द्रोणाचार्य यांच्याविरुद्ध कसा लढू? ते माझ्यासाठी खूप पूजनीय आहेत, गुरुजन आहेत ,या गुरुजनांना मारून या पृथ्वीवर त्यांच्या रक्तांनी माखलेले अर्थरूप आणि कामरूप भोगच भोगायचे आहेत ना, मला हे पटत नाही त्यापेक्षा या जगात मी भिक्षा मागून खाणे कल्याण कारक समजतो , मी त्यांच्याबरोबर युद्ध करणार नाही असा ठाम निश्चय अर्जुनाने भगवंतांना सांगितला .
Ans. 14. मेधा वेलणकर...
उत्तर :-- कथं भीष्ममहंम सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदनI इषुभि:प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदनII
अर्जूनभगवंतांना म्हणाला, हॆ मधुसूदना तू मला लढायला सांगतोस, ते म्हणजे भीष्मपितामह , आणि द्रोणाचार्य यांच्याशी विरुध्द बाणांनी कसा लढू? कारण हॆ अरिसूदना ते मला दोघेही पूज्य आहेत
गुरुन्हत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तु़ंं भैक्ष्यमपीह लोके I
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्
रुधीरप्रदिग्धान्II
त्यामुळे या महानुभाव गुरुजनांना न मारता मला या जगात भिक्षा मागून खाणे कल्याणकारक वाटते. या गुरुजनांना मारून, या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगायचे!
न चैतद्विद्म: कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयु:I
यानेव हत्वा न जिजीविषाम-
स्ते sवस्थिता: प्रमुखे धार्तराष्ट्रा: I
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हॆ कळत नाही. आम्ही त्यांना जिंकू कीं ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे ध्रुतराष्ट्र पुत्र बांधव आमच्या विरुध्द उभे आहेत.
कार्पण्यदोषोपहतस्वभाव:
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: | यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् || 2.7 ||
करुणाव्याप्त दैन्यामुळे माझा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे धर्म अधर्म याचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असर्थ आहे असा मी, खात्रीने जे साधन कल्याणकारक आहे ते विचारतो आहे, ते मला सांगा. मीं तुमचा शिष्य आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा.
न हि प्रपश्यामि ममापनुद्दाद्
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्
I अवाप्य भूमावसपत्नमृध्द़ं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्II
कारण, पृथ्वीचे शत्रूरहित व धन -धान्यसमृद्ध राज्य मिळाले किंव्हा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही.
भगवंतानी निर्भत्सना केल्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती या शब्दात व्यक्त केली.
Ans. 15. अरुषा एरंडे...
* उत्तर- भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाची निर्भत्सना (निंदा) केल्यानंतर अर्जुनाने आपली मनःस्थिती पुढील शब्दांत व्यक्त केली—
अर्जुन म्हणतो की, "मी काय करू? लढावे की न लढावे? युद्ध करण्यास मी असमर्थ आहे. माझ्या समोर माझे गुरुजन आणि नातेवाईक उभे आहेत. मी त्यांचा नाश कसा करू?"
अर्जुन कबूल करतो की तो मोह आणि कर्तव्याच्या संभ्रमामुळे व्याकूळ झाला आहे. तो श्रीकृष्णाला आपला गुरु मानून त्यांना विनंती करतो की, "मी तुमचा शिष्य आहे, कृपया मला योग्य मार्ग दाखवा."
यातून अर्जुनाची दुविधा, मानसिक क्लेश, आणि आत्मसमर्पणाची भावना स्पष्ट होते.
Ans. 16. आरती ढोबळे.....
अर्जुनाच्या मनाची संशयात्मक अवस्था झाली आहे आणि ज्ञानी असून ही मोहवश त्याला खूप प्रश्न पडले आहे. तो भगवान श्री कृष्ण यांनां प्रश्न विचारत आहे.
करुणेने भारावलेल्या, अश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्रीमधुसूदन म्हणाले- हे अर्जुन ! युद्धाच्या या विकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कोठून आले ? हे आर्यांना न शोभणारे, असलेली कीर्ती धुळीस मिळविणारे आणि स्वर्गलोक गमविणारे आहे. हे अर्जुन ! अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. तुला हे शोभत नाही. हे परंतप ! हृदयाची तुच्छ दुर्बळता त्यागून युद्धासाठी सज्ज हो.
अर्जुन म्हणाला - हे मधुसूदन ! मला पूजनीय असलेल्या भीष्मपितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू?
या थोर, पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही मला अधिक कल्याणप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना ? युद्ध करणे अथवा न करणे, या दोन्ही पैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हे देखील आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही, ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्या समोर युद्धाला उभे ठाकले आहेत.स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्यावा. पृथ्वीचे निष्कंटक, धनधान्यसंपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही.
Ans. 17. कमल देवरे.....
उत्तर: मला ज्यांच्याशी युद्ध करायचे ते सर्व माझे नातेवाईक पाहून त्याच्या मनात स्वकीयांना मारून विरोध राज्य उपभोग घेण्यापेक्षा मी वनात जाईन भिक्षा मागून पोट भरेल यूद्धभूमीवर दोन्ही पक्षातील लोक मरतील प्राणहानी होईल असे राज्य काय कामाचे या लोकांना मारून रक्ताने माखलेले अर्थ व भोगच भोगायचे. युद्धात ते आम्हाला जिंकतील किंवा आम्ही त्यांना जिंकू हे आम्हाला माहीत नाही. त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते जरी आमच्या विरुद्ध युद्धाला तयार झाले तरी आमची युद्ध करण्याची इच्छा नाही अर्जुनाची करुणा व्याप्त दैन्यामुळे त्याचा मूळ स्वभाव नाहीसा धर्म अधर्म याविषयीचा निर्णय घेण्यास तो असमर्थ झाला त्यामुळे अर्जुन कृष्णा विचारू लागला असं काही कल्याण कारक साधन तुम्ही सांगा मी तुमचा शिष्य आहे मी तुम्हाला शरण आलो आहे मला काही हिताचा उपदेश करा जेणेकरून माझे कल्याण होईल कारण शत्रु रहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझा शोक दूर करणारा उपाय मला सांगा जेणेकरून माझे हित होईल अर्जुनाची अशी स्थिती झाली.
श्री भगवान दुसऱ्या अध्यायातील दोन व तीन श्लोकात अर्जुनाची निर्बत्सना करतात या युद्धा च्या प्रसंगी तुला न करावे असे कसे वाटू शकते असे करणे म्हण जे पराक्रमी पुरुषाला अ कीर्ती करणारे आ हे. हा निव्वळ षंढपणा आहे. भगवंताकडून अशी निर्बचना ऐकल्यावर अर्जुन स्वतःची बाजू मांडतो. युद्धात भीष्म द्रोणाचार्य गुरुजना वर बाण सोडावे की त्यांना पूजनीय समजून युद्धन करावे. धृतराष्ट्र दुर्योधन आधी बंधूंना मारून जय मिळवणे मला मान्य नाही
Ans. 18. कुंदा तुपकर लीहीतात
प्रश्न २) उत्तर _ भगवंताने नीरभतसना केल्यावर अर्जुन म्हणाला हे अरीसुदना युद्धात मी भीष्म पितामह, द्रोणाचार्यां विरूद्ध बानांनी कसा लढू ते दोघेही मला पुज्य आहेत आणि या गुरूजनांना मारून या लोकांत रक्ताने माखलेले अर्थ, काम, रूप भोग भोगण्या पेक्षा यांना न मारता मी जगात भिक मागून खाणे मला कल्याणकारक वाटते.मी मी युद्ध करू का नको हेही कळत नसून, युद्ध केले तरी ते जिंकतील की मी जींकेन याचा भरवसा नसतांना करुणा व्याप्त दैन्यावस्थे मुळे ज्या माझा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे आणि धर्माअधरमा चार निश्चय करण्या विषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारतो की जे साधन खात्रीने कल्याण कारक आहे तेच मला सांगा मी तुम्हाला शरण आलो मला उपदेश करा कारण पृथ्वीचे शत्रुरहीत व धन धान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामी त्व जरी मीळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दुर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही या शब्दात आपली मन: स्थिती व्यक्त केली.
Ans. 19 माणिक थोरात. ....
प्रश्न २ भगवंतानी निर्भत्सना केल्यावर अर्जुनाने आपली मनस्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केलीआहे
उत्तर —जेव्हा भगवंतांनी ऐन युद्धाच्या वेळेस मला हे युद्धच नको असे म्हणणार्या अर्जुनाला हा षंढपणा सोड तुझ्यासारख्या यो द्ध्याला हृदयाचे हे दुबळेपण शोभत नाही असे म्हणून त्याची निर्भत्सना केली तेव्हा अर्जुन म्हणाला कृष्णा तूच सांगजे मला नित्य वंदनीय आहेत असे पितामह भीष्म व ज्यांच्यामुळे हा अर्जुन धनूर्धर म्हणून प्रसीद्धीस आला
असे माझे प्रेमळ माझ्यावर मातृवत प्रेम करणारे गुरु द्रोणाचार्ययांच्यावर मी कसे बाण सोडू ? त्याना मारुनत्यांच्या रक्ताने माखलेले राज्य वसुख भोगण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे मला अधिक कल्याणकारक वाटते
हे कृष्णा युद्ध करावे की न करावे या दोहोंपैकी आमच्यासाठी काय श्रेष्ठ आहे हे खरोखरच मला कळेनासे झाले आहे या युद्धात आम्ही जिंकलो अथवा कौरव युद्धात तर सारे आमचेच मारले जातील तेव्हा हे कृष्णा मी जरी योद्धा असलो तरी या युद्धभूमीवर मी करुणेने ग्रासलो आहे आप्त स्वकीयाच्या मायापाशात अडकलो आहे माझी बुद्धी या क्षणी तरी योग्य नीर्णय घेण्यास असमर्थ आहे तरी आमच्यासाठी कल्याणकारी काय आहे हे तूच सांग हा तूझा शीष्य तूला शरण आलो आहे
Ans. 20.
प्रश्न १ -- भगवंतांनी निर्भत्सना केल्या वर आपली मन: स्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली?
उत्तर -- रणांगणावर व्यथित अर्जुन धनुष्यबाण टाकून देउन रथाच्या मागील भागात जाऊन बसतो तेव्हा भगवंत त्याची कठोर शब्दांत कान उघडणी करतात ते संजय धृतराष्ट्रास सांगतो. हे राजन करुणेने व्याप्त आसवांनी डोळे भरलेले व्याकुळ शोकाकुल अर्जुनाला भगवान मधुसूदन म्हणाले हे अर्जुना ह्या वेळी तुला हा युध्द न करण्याचा मोह कशामुळे उत्पन्न झाला? कुणी ही थोरांनी न आचरलेला स्वर्ग आणि किर्ती मिळवून न देणारा मार्ग कां? अवलंबतोस. हा दु:ख आलाप कशा करता? हे पार्था! षंढपणा पत्करू नकोस. तो तुला शोभत नाही अंत:करण्याचा तुच्छ दुबळेपणा सोडून देउन युद्धाला तयार रहा. अर्जुना सारख्याच्या अंत:करण्यात सुध्दा कौटुंबिक मोहाने घर केले. अर्जुन युद्ध करणे अधर्म आणि युध्द न करणे धर्म समजतो. अर्जुनाच्या अंत:करणात क्षत्रियोचित
विरतेचा भाव लोपला होता, तो भगवंतांनी जागृत करून व त्याची भितीची भावना मोडुन काढली.
अर्जुन म्हणाला हे मधुसूदन युद्धात मी भिष्मपितामहाच्या आणि द्रोणाचार्याच्या विरुद्ध कसा लढु कारण अरिसूदना हे दोघेही पूज्य आहेत. माझ्यासमोर पीतामहभिष्म आणि द्रोणाचार्य उभे आहेत जे आचरणात सर्व श्रेष्ठ आहेत, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आहेत, स्नेह पूर्वक मला विद्या शिकवणारे आहेत. असे माझे परम हितचिंतक आजोबा आणि विद्या गुरू यांना मी कसे मारू? या भिती मुळे युद्धा पासून दुर होत नाही तर धर्माची दृष्टी ठेवून दुर होत आहे. मी पीतामहभिष्म आणि द्रोणाचार्याशी बाणाने युद्ध कसे करु. मी भित्रा नाही मी मरणाला भिंत नाही तर मारण्याला ही भिंत नाही.
गुरूनहत्वा हि महानुभावान
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान्रधिरप्रदिग्धान
या महानुभाव गुरूजनांना न मारता मी या जगात भीक मागून खाणे ही कल्याणकारक समजतो कारण गुरूजनांना मारुन या लोकांत रक्तरंजित अर्थ कामरूप भोगच भोगायचे ना?
अर्जुनाच्या मनावर भगवंत प्रभाव टाकीत चाललें होते. भगवंतांच्या वचनात विलक्षणता आहे. अर्जुनाला युद्ध न करण्याच्या निर्णयात संदेह होत चालला आहे. युद्ध करावे अथवा करु नये हे अर्जुनाला कळेनासे झाले. युद्ध करणे श्रेष्ठ आहे पण अर्जुनाच्या दृष्टीने आप्त जेष्ठ गुरू जनांना मारणे पाप आहे. जर भगवंताच्या आज्ञेनुसार युद्ध ही केले तर आम्ही जिंकु किंवा कौरव जिंकतील हे ही माहित नाही. आम्ही कुटुंबियांना मारुन जगण्याची इच्छा ठेवत नाही कुटुंब मारले गेले तर आम्ही जिवंत राहून काय करणार? आपल्या हातांनी कुटुंब नष्ट करुन चिंता शोक आणि वियोगाचे दु:ख भोगण्याची इच्छा नाही. आम्ही कौरवांना मारुन जिवंत राहू इच्छित नाही. पण तेच बांधव धृतराष्ट्र पुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. करुणा व्याप्त दैन्या मुळे माझा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे. धर्म अधर्मा चा निर्णय करण्या विषयी बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारत आहे किं, जे साधन खात्रीने कल्याण कारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे शरण आलेल्या मला उपदेश करा. असे श्री कृष्णाला म्हणतो. अर्जुनाच्या मनात नुसते विचारांचे काहूर माजले होते. अर्जुनाला असे वाटते की भगवंत समजत असतिल मी युद्ध करेल तर माझा विजय होइल विजय झाल्याने राज्य मिळेल जेणे करुन चिंता शोक नाहीसे होतील आणि संतोष होईल. विजय झाला तरी माझा शोक दूर होणार नाही. मला धन धान्याने संपन्न आणि निष्कंटक राज्य प्राप्त झाले अर्थात प्रजे जवळ भरपूर धन धान्य सुबत्ता कशाची ही प्रजेला उणीव नाही राज्याला कुणी शत्रू नाही असे राज्य मिळाले तरी माझा शोक दूर होऊ शकत नाही. पृथ्वी वरील तुच्छ राज्य सोडा इंद्राचे दिव्य भोग असणारे राज्य जरी मिळाले तरी ही माझा शोक दाह चिंता दूर होऊ शकत नाही
Ans. 20. सुभाष कुलकर्णी...,.
प्रश्न १ -- भगवंतांनी निर्भत्सना केल्या वर आपली मन: स्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली?
उत्तर -- रणांगणावर व्यथित अर्जुन धनुष्यबाण टाकून देउन रथाच्या मागील भागात जाऊन बसतो तेव्हा भगवंत त्याची कठोर शब्दांत कान उघडणी करतात ते संजय धृतराष्ट्रास सांगतो. हे राजन करुणेने व्याप्त आसवांनी डोळे भरलेले व्याकुळ शोकाकुल अर्जुनाला भगवान मधुसूदन म्हणाले हे अर्जुना ह्या वेळी तुला हा युध्द न करण्याचा मोह कशामुळे उत्पन्न झाला? कुणी ही थोरांनी न आचरलेला स्वर्ग आणि किर्ती मिळवून न देणारा मार्ग कां? अवलंबतोस. हा दु:ख आलाप कशा करता? हे पार्था! षंढपणा पत्करू नकोस. तो तुला शोभत नाही अंत:करण्याचा तुच्छ दुबळेपणा सोडून देउन युद्धाला तयार रहा. अर्जुना सारख्याच्या अंत:करण्यात सुध्दा कौटुंबिक मोहाने घर केले. अर्जुन युद्ध करणे अधर्म आणि युध्द न करणे धर्म समजतो. अर्जुनाच्या अंत:करणात क्षत्रियोचित
विरतेचा भाव लोपला होता, तो भगवंतांनी जागृत करून व त्याची भितीची भावना मोडुन काढली.
अर्जुन म्हणाला हे मधुसूदन युद्धात मी भिष्मपितामहाच्या आणि द्रोणाचार्याच्या विरुद्ध कसा लढु कारण अरिसूदना हे दोघेही पूज्य आहेत. माझ्यासमोर पीतामहभिष्म आणि द्रोणाचार्य उभे आहेत जे आचरणात सर्व श्रेष्ठ आहेत, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आहेत, स्नेह पूर्वक मला विद्या शिकवणारे आहेत. असे माझे परम हितचिंतक आजोबा आणि विद्या गुरू यांना मी कसे मारू? या भिती मुळे युद्धा पासून दुर होत नाही तर धर्माची दृष्टी ठेवून दुर होत आहे. मी पीतामहभिष्म आणि द्रोणाचार्याशी बाणाने युद्ध कसे करु. मी भित्रा नाही मी मरणाला भिंत नाही तर मारण्याला ही भिंत नाही.
गुरूनहत्वा हि महानुभावान
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान्रधिरप्रदिग्धान
या महानुभाव गुरूजनांना न मारता मी या जगात भीक मागून खाणे ही कल्याणकारक समजतो कारण गुरूजनांना मारुन या लोकांत रक्तरंजित अर्थ कामरूप भोगच भोगायचे ना?
अर्जुनाच्या मनावर भगवंत प्रभाव टाकीत चाललें होते. भगवंतांच्या वचनात विलक्षणता आहे. अर्जुनाला युद्ध न करण्याच्या निर्णयात संदेह होत चालला आहे. युद्ध करावे अथवा करु नये हे अर्जुनाला कळेनासे झाले. युद्ध करणे श्रेष्ठ आहे पण अर्जुनाच्या दृष्टीने आप्त जेष्ठ गुरू जनांना मारणे पाप आहे. जर भगवंताच्या आज्ञेनुसार युद्ध ही केले तर आम्ही जिंकु किंवा कौरव जिंकतील हे ही माहित नाही. आम्ही कुटुंबियांना मारुन जगण्याची इच्छा ठेवत नाही कुटुंब मारले गेले तर आम्ही जिवंत राहून काय करणार? आपल्या हातांनी कुटुंब नष्ट करुन चिंता शोक आणि वियोगाचे दु:ख भोगण्याची इच्छा नाही. आम्ही कौरवांना मारुन जिवंत राहू इच्छित नाही. पण तेच बांधव धृतराष्ट्र पुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. करुणा व्याप्त दैन्या मुळे माझा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे. धर्म अधर्मा चा निर्णय करण्या विषयी बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारत आहे किं, जे साधन खात्रीने कल्याण कारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे शरण आलेल्या मला उपदेश करा. असे श्री कृष्णाला म्हणतो. अर्जुनाच्या मनात नुसते विचारांचे काहूर माजले होते. अर्जुनाला असे वाटते की भगवंत समजत असतिल मी युद्ध करेल तर माझा विजय होइल विजय झाल्याने राज्य मिळेल जेणे करुन चिंता शोक नाहीसे होतील आणि संतोष होईल. विजय झाला तरी माझा शोक दूर होणार नाही. मला धन धान्याने संपन्न आणि निष्कंटक राज्य प्राप्त झाले अर्थात प्रजे जवळ भरपूर धन धान्य सुबत्ता कशाची ही प्रजेला उणीव नाही राज्याला कुणी शत्रू नाही असे राज्य मिळाले तरी माझा शोक दूर होऊ शकत नाही. पृथ्वी वरील तुच्छ राज्य सोडा इंद्राचे दिव्य भोग असणारे राज्य जरी मिळाले तरी ही माझा शोक दाह चिंता दूर होऊ शकत नाही
Ans. राजस बंगाळे...
उत्तर भगवंताने निर्भर्त्सना केल्यानंतर अर्जुन म्हणतो समोर युद्ध भुमिवर तर सर्व माझेच लोक आहेत.आजोबा , काका, मामा, भाचे,पुतणे,नातु,बंधु माझे गुरुवर्य.यांना मी कसा मारू.मी ज्यांच्या अंगाखांद्यावर खळलो, ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे अशा वंदनीय आणि आदरणीय गुरुजनांचा, स्वकीयांना मी कसा वध करु? त्यांना मारुन, त्यांच्या रक्ताने माझे हात बरबटून मला कोणते सुख मिळणार आहे? त्या पेक्षा मी भिक्षा मागणे पसंत करीन.धृतराष्ट्र पुत्रांनी मला ठार मारले तरी मला वाईट वाटणार नाही. मला पृथ्वीचे राज्य दिले तरी मी माझ्या स्वकीयांना आणि गुरुजनांना मारणार नाही.धृतराष्ट्र पुत्रांना मारुन मला जगण्याची इच्छा नाही.असे म्हणून अर्जुनाने भगवंतापुढे शरणागती पत्करली, आणि सांगितले हे कृष्णा, आता तुच मला योग्य मार्गदर्शन कर.
Ans. 22. अजय महाजन.....
प्रश्मंजुषा
प्रश्न दुसरा उत्तर
भगवंत तिसऱ्या श्लोकात अर्जुन यांना नपुंसक म्हणुन त्यांची निर्भत्सना करतात. हे ऐकल्यावर अर्जुन एकदम उत्तेजीत होवून म्हणतात
" हे मधुसूदना, व अरीसुदना रणभुमित मला पूजनीय व वंदनीय असलेल्या भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्याशी बाणांनी कसे युद्ध करू ?"
भगवंतांनी दुष्ट व अधर्माने वागणाऱ्या मधु-कैटभ हया असुरांचा वध केला होता.
अर्जुन पाचव्या श्लोकात म्हणतात "द्रोणाचार्य व भीष्माचार्य यांच्या सारख्या महानुभवाना मारण्या पेक्षा मी भिक्षा मागून उदर निर्वाह करेल. पण त्यांची हत्या करून त्यांच्या हत्येचं पाप घेणार नाही."
सहाव्या श्लोकात अर्जुन म्हणतात "मला युद्ध करावे की करू नये हेच समजत नाही पण गुरू जनाना मारून पापी होण्या पेक्षा युद्ध न करणेच श्रेष्ठ आहे.
सातव्या श्लोकात अर्जूनानी चार गोष्टी सांगितल्या
१) पहिल्या गोष्टीत अर्जुन धर्माविषयी विचारतात. ह्यात ज्याला विचारले तो सांगण्यासाठी स्वतंत्र असतो.
२) दुसऱ्या गोष्टीत आपल्या कल्याणा विषयी प्रार्थना करतात. ह्यात ज्याला प्रार्थना केली त्यांना विचरणाऱ्याला सांगणे हे कर्तव्य ठरते.
३) तिसऱ्या गोष्टीत अर्जुन भगवंतांचे शिष्य बनतात. गुरूला आपल्या शिष्याला त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवण्याची जवाबदारी येते.
४) चौथ्या गोष्टीत अर्जुन भगवंतांना शरण जातात. ज्याला भक्त शरण जातो त्या भगवंताला शरणागताचा उद्धार करावाच लागतो .
आठव्या श्लोकात अर्जुन म्हणतात "जरी कोणत्याही वस्तूची उणीव नसलेले राज्य मिळाले, इंद्राचे दिव्य भोग मिळाले तरी माझा शोक, चिंता, दाह दूर होणार नाही."
वरील प्रमाणे अर्जुन भगवंतांना " मी युद्ध करणार नाही " असे स्पष्टपणे सांगून शांत बसले व दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करीत बसले.
Ans. 23. लता साळुंखे.....
🙏 जय श्री कृष्ण ,श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 युद्धभूमीवरील अर्जुनाची मानसिक स्थिती त्यांनी श्रीकृष्णाला बोलून दाखवली आहे सुरुवातीला श्रीकृष्णाने अर्जुनाला टोकले आहे, तरीही अर्जुन ची मानसिक अवस्था बिघडली आहे त्याला समजत नाही आहे म्हणून तो श्रीकृष्णाला मधुसूदन म्हणून हाक मारत आहे अहंकाराने दमन करणाऱ्या हे मधुसूदना जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भिष्मांवर आणि गुरुद्रोणाचार्यांवर युद्धात बाणांनी उलट प्रहार कसा करू ॽ हे शत्रुनाशना मला हे शक्य होणार नाही. माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयसकर आहे. इथे भिक्षाचा अर्थ उदर भरण साठी भीक मागणे असा नाही, परंतु, सज्जनांची सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय सुखाची कल्याणाची याचना करणे असा अर्थ आहे. अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, आमच्या या गुरुजनानां मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जे बघायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील अर्जुनाला कदाचित असे वाटत असावे की हे महापाप करण्यापेक्षा भजन पुजन आणि भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थ योग आणि कामभोगच ना? म्हणून तो पुन्हा म्हणतो आम्हाला विजय मिळेल हे देखील कुठे निश्चित आहे? आणि आम्ही हे समजत होतो ते सर्व अज्ञान होते, हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करणे श्रेयसकर आहे हेही आम्हाला समजेना असे झाले आहे, शिवाय आम्ही त्यानां जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही, हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्यापुढे उभे आहेत पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार. नंतर अर्जुनाला वाटले आपण जे म्हणत आहोत सांगत आहोत ते ही अज्ञान असेल तर म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे. माझ्या भेकड दुर्बल स्वभावामुळे कर्तव्याच्या बाबतीत धर्माधर्म जगण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे. व म्हणून मी आपल्याला विचारीत आहे की माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक सर्वात कल्याणकारक काय आहे ते सांगा. तुम्ही म्हणाल मी काय सांगावे. भगवान मी आपला शिष्य आहे आपल्याला शरण आलेलो आहे. म्हणून मला श्रेयसकर असलेली गोष्ट सांगा. अर्थात केवळ मला सांगू नका केवळ शिकू नका, तर जेथे मी अडखळेल तेथे मला तुम्ही सांभाळून घ्या. येथे अर्जुनाने स्वतःला संपूर्ण समर्पण केलेले आहे. आतापर्यंत तो श्रीकृष्णाची व स्वतःची योग्यता एकसारखी आहे असे समजत होता किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता, येथे मात्र आपला स्वतःलाच सांभाळण्याचे स्वतःचे रक्षण करण्याचे कार्य अर्जुनाने श्रीकृष्णावर सोपवले आहे. येथे अर्जुन धर्माधर्म जाणण्यास असमर्थ झालेला आहे, म्हणून तो कृष्णाला म्हणत आहे भगवान, आम्हाला आणखीन एक गोष्ट समजावून सांगा, पृथ्वीवरील निष्कपट व धान्याने संपन्न असे राज्य, किंवा स्वर्गातील सर्व देवतांवर अधिपथ्य गाजवणारे, असे इंद्रपद जरी मला मिळाले तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण माझ्या इंद्रियाना शोषून टाकणारा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही. माझ्या जीविताचे शोषण करणाऱ्या या शोकाने मला इतके ग्रासले असल्यामुळे मी हे सर्व घेऊन करू तरी ❓ जर माझ्या वाट्याला असा हा शोकच येणार असेल तर भगवान मला क्षमा करा. अर्जुनाला वाटले आपण असे म्हटल्यावर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाही.
Ans. 24. सुनीता ढोले....
उत्तर: हे श्रीकृष्णा, आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हांला जिंकतील व ह्या दोहोंपैकी कोणती गोष्ट चांगली हेंही आम्हांस कळत नाहीं. ज्यांना मारून जगण्याची आमची (अर्जुनाची) इच्छा नाही ते हे कौरव आमच्यासमोर उभे आहेत. मानसिक दैन्यदोषामुळे माझी नैसर्गिक वृत्ती नष्ट होऊन धर्माधर्म जाणण्यास माझें मन असमर्थ झालें आहे, म्हणून मी तुला विचारतो, की जें खरोखर श्रेयस्कर असेल तें मला सांग. मी तुझा शिष्य आहे; मला शरणागताला उपदेश कर.
Ans. 25. पद्मा मदनकर.....
उत्तर: भगवान श्रीकृष्ण म्हणतात , हे अर्जुना तुझा मोह तुला स्वर्गापासून आणि किर्तीपासून दूर करणारा आहे तु दुबळेपणा सोडून दे
तेव्हा अर्जुन म्हणतो की, हे मधुसूदन युद्धात मी भीष्मपिताम् ह आणि गुरू द्रोणाचार्य विरुद्ध कसा लढू ? कारण हे दोन्ही मला खूप पुज्ज आहेत यांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खानेही कल्याणकारक समजतो त्यांना मारून जगण्याची आला इच्छा नाही . धर्म अधर्माचा निर्णय करण्याची माझी बुद्धी असमर्थ झाली आहे .तेंव्हा जे साधन खात्रीपूर्वक कल्याणकारक आहे ते मला सांगा . मी एक शिष्य म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे मला योग्य मार्गदर्शन करावे.🙏
जय श्रीकृष्ण 🙏
अर्जुन म्हणाला, "हे भगवंता, मी माझे आप्त, गुरुजनांना मारून काय मिळवणार? ज्यांनी मला लहानाचे मोठे केले, ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळून मोठा झालो त्यांना मारून जिंकलो तरी काय होणार? मी जिंकलो काय किंवा ते जिंकले काय? काहीच फरक पडणार नाही. कृपणतेचा, स्वार्थाचा दोष मलाच लागणार. मला काय करावे हेच कळत नाही. या विचारांनी माझे मन उद्विग्न झाले आहे. मी विमनस्क झालो आहे!
ReplyDeleteगीताप्रशनोतरी हा उपक्रम खुपच आवडला
ReplyDeleteअर्जुन म्हणाला, "माझ्या सग्यासोयऱ्यांना मारून मला राज्य मिळवायचे नाही. ज्यांनी मला अंगाखांद्यावर खेळवले त्याना मारायचे? माझे गुरुजनांना मारून मला राज्य करायचे नाही. कदाचित मी जिंकेन किंवा ते जिंकतीलही पण आप्तांशी लढणे व मारणे योग्य की अयोग्य हे मला कळेनासे झाले आहे. अशा आपल्याच आप्तांच्या रक्ताने माखलेल्या राज्याचा उपभोग घेणे मनाला पटत नाही. त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे मी स्वीकारीन. पण मी युद्धास तयार नाही! " असे अर्जुन भगवंताश म्हणाला.
ReplyDeleteसौ.निलिमा चौधरि
ReplyDeleteअध्याय 2
Deleteप्रश्न .2 ) भगवंतांनी निर्भसना केल्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली ?
पहिल्या अध्यायात अर्जुनाने युध्द नकरण्याचा निर्णय घेतला . हे ऐकून भगवान श्रीकृष्णाने दुसर्या अध्यायात श्लोक 2 व 3 मध्ये अर्जुनाची निर्भत्सना केली तेव्हा अर्जुन म्हणतो ,हे मधुसूदना! युध्दात समोर भिष्मपितामहांच्या आणि गुरु द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू ? कारण हे दोघेही पूज्य आहेत . या महानुभाव गुरुजनांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे कल्याणकारक. समजतो . गुरुजनांना मारुन या लोकांत रक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच भोगायचे ना !
अर्जुनाला युध्द करावे की न करावे या बद्दल कळत नाही .विरुध्द बाजूला धृतराष्ट्र पुत्र उभे आहेत .तेच आमचे बांधव आहे यांना मारुन जगण्याची ही इच्छा नाही .
करुणाव्याप्त दैन्यामुळे अर्जुनाचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी बुध्दी असमर्थ झाली आहे. या परिस्थितीत अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जातो .मी तुमचा शिष्य आहे .मला कल्याणकारक उपदेश करा अशी विनंती करतो .
अर्जुनाने त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य हे सुध्दा शोकनिवारणाचे कारण न मानता वैराग्याचा भाव असा उपाय प्रदर्शित केला. अर्जुन म्हणतो माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल ,असा उपाय मला दिसत नाही. शोकाकुल अर्जुनाने 'मी युध्द करणार नाही ' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला .
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
अध्याय 2
Deleteप्रश्न .2 ) भगवंतांनी निर्भसना केल्यावर अर्जुनाने आपली मनःस्थिती कोणत्या शब्दात व्यक्त केली ?
पहिल्या अध्यायात अर्जुनाने युध्द नकरण्याचा निर्णय घेतला . हे ऐकून भगवान श्रीकृष्णाने दुसर्या अध्यायात श्लोक 2 व 3 मध्ये अर्जुनाची निर्भत्सना केली तेव्हा अर्जुन म्हणतो ,हे मधुसूदना! युध्दात समोर भिष्मपितामहांच्या आणि गुरु द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू ? कारण हे दोघेही पूज्य आहेत . या महानुभाव गुरुजनांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे कल्याणकारक. समजतो . गुरुजनांना मारुन या लोकांत रक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच भोगायचे ना !
अर्जुनाला युध्द करावे की न करावे या बद्दल कळत नाही .विरुध्द बाजूला धृतराष्ट्र पुत्र उभे आहेत .तेच आमचे बांधव आहे यांना मारुन जगण्याची ही इच्छा नाही .
करुणाव्याप्त दैन्यामुळे अर्जुनाचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी बुध्दी असमर्थ झाली आहे. या परिस्थितीत अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जातो .मी तुमचा शिष्य आहे .मला कल्याणकारक उपदेश करा अशी विनंती करतो .
अर्जुनाने त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य हे सुध्दा शोकनिवारणाचे कारण न मानता वैराग्याचा भाव असा उपाय प्रदर्शित केला. अर्जुन म्हणतो माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल ,असा उपाय मला दिसत नाही. शोकाकुल अर्जुनाने 'मी युध्द करणार नाही ' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला .
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
खुप आनंद आणि मनाला भक्ती मत करून टाकणारा उपक्रम आहे आणि आणखी उत्कंठा वाढली आहे पुनः शच गीता परीवाराचे खुप खुप धन्यवाद ,#
ReplyDeleteखुप छान आहे हा उपक्रम ताई आमुची वृत्ती परमार्थात दृढ व्हावी असाच गीता परीवाराचा अटोकाट प्रयत्न आहे या ना त्या कारणाने आमचेच भले होण्यासाठी तूम्ही हे करतात या साठी शब्दात सांगायचे झाले तर शब्द तोकडे पडतात खुप खुप धन्यवाद
ReplyDelete.