आरती श्रीगुरुदत्ताची, आरती गुरुमाउलीची

आरती श्रीगुरुदत्ताची, आरती गुरुमाउलीची
 अत्रिनंदना करू वंदना, ज्योत ही परब्रह्माची ॥ धृ ॥
आरती श्रीगुरुदत्ताची, आरती गुरुमाउलीची

दत्तरूप आहे निर्गुण, श्रीदत्तांचे चरण सगुण
अर्पूया हो तन मन धन | करा गुरुंचे भजन पूजन ॥
पंचप्राणाची अन् मोक्षाची आरती वल्लभाची ॥ १ ॥
आरती...

दत्तचरित या हो आळवू, मनमंदिरी तया साठवू
सदा चिन्तनी नाम घेळवू, भक्ती प्रीतीने अंग डोलवू ॥
त्रिगुणाची औदुंबराची | आरती अवधूताची ॥ २ ॥
आरती...

गर्व हरा हो पतितोद्धारा, तारावे या भवसंसारा
पापी आम्हां तुम्ही उद्धारा, द्यावा अंकी चरणी थारा ॥
वदंन करितो चरणी नमितो, ऐका हाक पतिताची ॥ ३ ॥
आरती...

दया करावी श्रीगुरुदत्ता, अवघ्या अवनी तुमची सत्ता
या संसारां तरण्या आता, मार्ग दाखवा आम्हास पुढता ॥
जन्म कृतार्थ करि गुरुनाथा, श्रद्धा अतंरी दीनाची ॥ ४ ॥
आरती...

Comments