उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ८ : Upanishad Part 8

 उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ८


उपनिषदातील संकल्पना ~ ॐ कार 

========================


उपनिषदात ऋषी ॐ ला अमूल्य असे महत्व देतात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आरंभी,  वेदांचा अभ्यास आरंभी, किंवा ग्रंथांच्या आरंभी सुद्धा ओंकार ल आपली संस्कृती स्थांन देते.वैखरीने आधी ओंकार उच्चार करण्याची उपनिषदात पद्धती आहे.


ओंकार हा अ,उ,म या तीन पूर्ण मात्रा आणि अर्ध मात्रा मिळून साडेतीन मात्रांचा बनलेला आहे. परंतु ही त्या मात्रां ची बेरीज नसून त्यांच्या संगमातून तो बनलेला आहे. ओंकाराला प्रणव म्हणतात. प्रणव शब्दात नु हा धातू असून प्र हा उपसर्ग आहे. नऊ म्हणजे स्तुती करणे. प्रणव म्हणजे उत्तम स्तुती होय. 


मन आणि वाणी यांच्या पलीकडे असणारे जे अमूर्त ब्रह्म आणि नामरूप यांनी भरलेले इंद्रियगोचर मूर्त विश्व यांना जोडणारे विलक्षण सूत्र म्हणजे ओंकार होय. म्हणून त्यास शब्दब्रह्म असे म्हणतात. अ,उ,म म्हणजे उत्पती स्थिती, लय किंवा जडद्रव्य, जीवन, जाणीव किंवा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, किंवा श्रवण मनन निधिध्यासन अशी जी अनेक त्रिपुटी त्यानेच हे सर्व दृश्य विश्व व्यापले आहे.


दोन वस्तूंच्या मधील संघर्ष घडून जो नाद तयार होतो त्यास आहत नाद असे म्हणतात. दृश्य जगतात सर्व नाद हे आहत नाद होत जसे पक्षांचा आवाज, मेघांचा गडगडाट, विणेची झंकार होय. परंतु जो विश्वातील अत्यंत शांत आणि संघर्ष शून्य असा जो नाद त्यास अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत नाद हे ओंकराचे खरे स्वरूप आहे. 


ओंकार उपासना ही नेहमी श्रवणाने सुरू होते. ओंकार उपासनेची दीक्षा नेहमी संत आणि सद्गुरु घेतली जाते.

ओंकार अनुसंधान ने  मनुष्य परमानंद मध्ये बुडून जातो. 


श्री राम जयराम जय जय राम !!!


जपजी साहिब 

ੴ सतिनामु करता पुरखु

निरभउ निरवैरु अकाल मूरति 

अजूनी सैभं गुरप्रसादि ॥

       सद्गुरु धन गुरु नानक साहिब जी !!!


https://youtu.be/JEgHB7dNX0U

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments