उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ७
उपनिषदातील संकल्पना ~ मनन आणि निधिध्यासन
=================================
आपण मागील लेखात मन आणि त्याच्या अवस्था जाऊन घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. उपनिषद म्हणजेच सद्गुरूच्या जवळ बसून आत्मज्ञान विषयी जाणून घेणं होय या साठी मनाची एकाग्रता साधून श्रवण करावे लागते.त्या साठी नम्रता आणि आत्म जिज्ञासा धारण करून ज्ञानी व्यक्ती म्हणजे संत चा सहवास हवा. संत भेटणे कठीण त्यात त्यांचा सहवास वाट्याला येणे दुर्लभ मग काय करावे त्या महान संतांनी लोक कल्याण साठी लिहलेले ग्रंथ अभ्यासणे त्यांच्या विचारांचं सहवास करावा.
त्यासाठी आत्मज्ञान मिळविण्यासाठी नित्य वाचन करावे आणि वाचलेल्या गोष्टींचे मनन करावे. मनन म्हणजे धारणा होय म्हणजे एकच विचार मना समोर धरून ठेवणे म्हणजे धारणा होय.
सामान्यतः आपल्या मनात विचारांचं अखंड प्रवाह सुरू असतो त्यामुळे इतर विचार थांबून आपल्या ध्येय विषयावर लक्ष केंद्रित करणे होय त्यासाठी खूप मानसिक शक्ती लागते. ती शक्ती वाढावी म्हणून मनाला वैराग्य यावे लागते. वैराग्य म्हणजे दृष्यावस्तुंच्या बद्दल संपूर्ण अनासक्ती होय.
माणसाच्या मनाची अंतर्यामी विचार, कल्पना, भावना स्मृती, प्रवृत्ती,वासना अवधान अथवा लक्ष इत्यादी अशी अंगे आहेत. माणसाचे विचार ही सर्वात मोठी शक्ती आहे. माणसाचे संपूर्ण विचार फक्त आत्मकेंद्री झाले म्हणजे मनाची इतर सर्व अंगे त्याच विचार भोवती केंद्रित होतात त्याला म्हणतात निधिध्यासन. असे निधिध्यासन साध्य व्यावे म्हणून दररोज ध्यानाचा सराव आत्मा केंद्री विचारांवर करावा. ध्यान स्वतःचे असे विज्ञान आहे. दोन विचारततील अंतर वाढविणे आणि आपल्या आत्मविचार लक्ष केंद्रित करणे हे फक्त संत वाणी चे श्रवण आणि मनन, ध्यान, धारणा आणि निधिध्यासन करूनच शक्य होईल. त्यासाठी साधकाच संपूर्ण दृढ निश्चय आणि सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत.
!! श्रीराम जय राम जय जय राम!!
सुंदर अभंग
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया,
.....
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने !!
संत तुकाराम
https://youtu.be/j3Hz5DhP4jw
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment