उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ६ : Upanishad Part 6

 उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ६


उपनिषदातील संकल्पना ~ मन आणि त्याच्या अवस्था

=============================

 

आपण मागील आठवड्यात माणसाचे जीवन हे ईश्वरीय आनंदी जगण्यासाठी असते हे पहिले. उपनिषदांचे अर्थ, प्रकार आणि अभ्यास का करावा हे पहिले. माया आणि ब्रह्म आणि हिरण्या गर्भ, ईश्वरीय जगताची निर्मिती कशी होते ते पाहिलं. उपनिषदे ही मुळात माणूस, जगत आणि ईश्वर आणि त्यातील परस्पर संबंध या विषयी केलेले आत्मचिंतन आहे हे आपण पाहिले. आता आपण माणूस समजावून घेऊ. 


सर्व जीव हे प्राण, सूक्ष्म देह, आत्मा आणि ममनस म्हणजे मन पासून बनलेल असतो हे आपण पाहिले परंतु मन म्हणजे नक्की काय त्याच्या अवस्था कोणत्या आहेत हे पण सखोल समजावून घेणे गरजेचे आहे. आपण मनाचा अभ्यास थोडक्यात करू. मन कशाला म्हणावे? 


आतले संस्कार आणि बाह्य विश्वाचे संस्कार यांचे परीक्षण,वर्गीकरण आणि एकसूत्रीकरण करण्याचे साधन म्हणजे मन असे वर्णन भारतीय ज्ञान करीत आहे.


ज्या प्रमाणे हवा आपल्याला जाणवते पण ती आपण दाखवु शकत नाही त्या प्रमाणे मन हा आपल्या शरीराचा सूक्ष्म आणि चंचल असा घटक आहे. त्याचे नियमन सहजपणे करता येत नाही. मन हे चिंतनाचे साधन आहे म्हणून ते समजावून घेतले पाहिजे. 


मनाच्या पाच मुख्य अवस्था आहेत


१. क्षिप्त : या अवस्थेत मनाच्या शक्ती दुर्लक्षित व सुत्रहीन असतात याचे उदाहरण म्हणजे बाल्य अवस्था.


२. विक्षिप्त : या अवस्थेत मन क्षुब्ध आणि व्यग्र असते आणि आपल्या कर्माची फळे उपभोगीत असते. बऱ्याच वेळा आपण हा शब्द व्यवहारात वापरत असतो.


३. मूढ: या अवस्थेत मन मंद,मूर्ख निर्बुद्ध किंवा गोंधळले असते नक्की आपण काय करीत असतो याची आपल्याला जाणीव नसते.


४. एकाग्र: या अवस्थेत मनाची सर्व शक्ती एकाच वस्तु, बिंदू किंवा कार्यावर एकत्रित झालेली असते. एकाग्र व्यक्ती मध्ये श्रेष्ठ असे बौद्धिक सामर्थ्य असते. परंतु एकाग्र व्यक्ती मध्ये अहंमन्यता असते. या अहंकाराचे प्राबल्य कमी करण्यासाठी भक्ती ची गरज असते.


५. निरुद्ध : या अवस्थेत मन,बुद्धी आणि अहंकार यांचा निरोध करून मनशक्ती ईश्वर सेवेत अर्पण केल्या जातात तिथे मम् किंवा अहं भाव लोप पावतो.


बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो एकाग्रता कशी वाढवावी. आपले ज्ञान आपल्याला सांगते  एकाग्रता वाढविण्याचा उपाय किंवा साधन म्हणजे ओंकार साधना होय. 


सद्गुरु श्री समर्थ रामदास लिखित मनाचे श्लोक हे मनाचे नियमन करून त्याच्या पूर्ण शक्ती एकाग्र आणि नंतर निरुद्ध अवस्था प्राप्त करण्यास मदत करतात.


 आपले विश्व हे आपल्या मनाची संकल्पना असते हे आपण मागील लेखात पाहिलेच आहे. आपण पुढील लेखात थोडे अजून सखोल चिंतन या विषयी करूच. 


आज आठवले ते परमपूज्य आद्य शंकराचार्य लिखित निर्वाण षटक हे सर्वांनी नक्की श्रवण करावे आणि जमल्यास त्याचा अर्थ नक्की अभ्यासावा 


!! श्रीराम जय राम जय जय राम !!


सुंदर निर्वाण षटक


मनोबुद्धिरहंकारचित्तानी नाहं

न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।

न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः 

चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। 1 ।


https://youtu.be/yq9WPkuLdbc

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments