उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प ५
उपनिषदातील संकल्पना ~ ईश्वरीय संकल्प
=============================
आपण उपनिषदांचा अभ्यास करताना मानवी मनात येणारे प्रश्न, त्याचे संकल्प आणि त्यातून दिसणारे दृश्य जग कसे होते ते पाहिले तसेच माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय हे थोडक्यात उपनिषदांत दिलेल्या संकल्पनेतून समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
ईश्वर हे सर्व ब्रह्मांड कसे तयार करतो का करतो हे थोडक्यात समजावून घेऊ. मी एक आहे मी अनेक व्हावे असा संकल्प ईश्वराच्या ठिकाणी होतो. या संकल्पामध्ये विश्वाचे बीज आहे. हा संकल्प अती सूक्ष्म असतो.या ईश्वराच्या दिव्य आणि सत्यसंकल्पास हिरण्यगर्भ असे नाव उपनिषदे देत आहेत. हिरण्य या शब्दशः अर्थ म्हणजे सोने किंवा सोनेरी ज्ञान प्रकाश असा आहे. हिरण्यगर्भ जेंव्हा दृश्य रूप होऊन साकार असे घटनारुप होतो तेव्हा त्यास कालचक्र असे म्हणतात. या हिरण्यगर्भ मध्ये सर्व दृश्य जगत हे अव्यक्त पणें वास करते. माणसाच्या देहाला जशी जाणीव असते की हा मी आहे तशीच विश्वाच्या आत बाहेर व्यापून राहणाऱ्या जाणिवेल हिरण्यगर्भ असे उपनिषद म्हणतात.
उपनिषदातील विराज म्हणजे ब्रह्मांड हे नाम रूपांनी भरलेले, कर्ममय असलेले दृश्य विश्व होय. अशी अनंत ब्रह्मांड अस्तित्वात असतात असे आपले आधुनिक विज्ञान ही सांगत आहे. याचे वर्णन उपनिषदे काव्यात्मक आणि मानवी भाषेत करितात म्हणजे "वारा त्याच्या भयाने वाहतो, सूर्य त्याच्या भयाने उगवितो, अग्नी त्याच्या भयाने जाळतो, सूर्य आणि चंद्र त्याच्या सत्तेने आपापल्या जागी राहतात"
या जड विश्व मध्ये तोच चैतन्य निर्माण करतो. जसे वृक्षाच्या बी मध्ये सर्व वृक्ष सामावलेले असते तसेच ईश्वरी संकल्प मध्ये सारे विश्व व्यापून असते.
त्या साठी आपण सुद्धा आपल्या मनाला जे शिकवीत असतो म्हणजे नेहमी चांगले (positive) होईल असे म्हणा असे सांगतात त्याचे कारण तेच आहे कि त्याच ईश्वरी जाणिवेचा आपण भाग असल्याने आपण जे विचार किंवा संकल्प करतो तेच सृष्टी आपल्याला देत असते.
ईश्वरीय आनंदच आपल्या विश्वाचे मूलद्रव्य आहे. सर्व जीवांच्या स्वेदज, उद्भिज, अंडज, जीवज अश्या चार योनी सांगितल्या आहेत. सर्व जीवांना जगण्यासाठी अचेतन असे कवच लागते त्यालाच जडदेह असे म्हणतात. देह हा पंचमहाभूत निर्माण झाला आहेतं त्यात सत्व रज आणि तमो गुण सामावलेले आहेत. जीवा मध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आणि आनंदमय असे पाच कोश असतात. त्याचे विवरण पुढे पाहूच. हे संपूर्ण दृश्य जग हे अपूर्ण आहे. ते सर्वस्वी सत्य नाही एवढेच उपनिषद सांगत आहेत. हे जग दुःख मय आहे असे मात्र उपनिषदे सांगत नाहीत. इथेच मुख्य फरक हा पश्चिमात्य आणि भारतीय तत्वज्ञानात आहे.
"तज्जलान इति शांत उपासीत" छांदोग्य उपनिषद या तून उपनिषद ब्रह्मा आणि जगत यांचा संबंध दर्शवितात. ज म्हणजे आरंभ, ल म्हणजे अंत, अन म्हणजे जिवंत रहाणे म्हणजेच हे संपूर्ण दृश्य जगत त्या ईश्वर तून आरंभ पावते, त्यातच ते जिवंत राहते आणि त्यातच ते अंत किंवा लय पावते.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
आषाढ कृष्ण ३/४ चतुर्थी शके १९४५
सुंदर कविता
सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना,
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥
कुसुमग्राज वि वा शिरवाडकर
https://youtu.be/G88vuYgXSo0
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment