उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प २२ : Upanishad Part 22

 *उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प २२*


*उपनिषद संकल्पना - मानवी उन्नतीचा दृष्टिकोन*

======================


उपनिषदे मानवी जीवन उत्क्रांत करणारी सखोल असे चिंतने आहेत. मागील लेखात आपण वासनेची अदृश्य सृष्टी आणि विविध लोक याविषयी थोडा अभ्यास केला. मानवाची उन्नती कशात आहे या विषयी दोन प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला आढळून येतात. 


त्यातील पहिला दृष्टिकोन असा की या दृश्य जगातील सर्व उपभोग भोगत आपण संपत्ती, ऐश्वर्य आणि अधिकाराचा अमर्याद साठा करीत आपण आपले आयुष्य अधिक सुखी आणि समाधानी करू शकतो. 

त्या साठीच अतिशय धडपड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत किंवा येनकेन प्रकाराने ते हस्तगत करणे होय. परंतु असे केल्याने आपल्या हवे असणारे खरे समाधान आणि आनंद कधीच मिळणार नाही. 


या उलट आपली उपनिषदे आणि साधुसंत सांगतात त्या प्रमाणे आपल्या मिळालेल्या परिस्थिती मध्ये आपले सगळे लक्ष अंतरंगात वळवून त्या मध्ये अधिक अधिक उन्नत होत सद्गुण म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम आणि समाधान मिळविणे हा दुसरा उन्नतीचा दृष्टिकोन आहे.

या दोन्ही दृष्टिकोन मध्ये दृश्य कडून अशाश्वत सुखाकडे आणि अंतरंगातील साधनेने शास्वत समाधान मिळविणे असा मूलभूत फरक आहे.


प्रश्र्नोपनिषदातील पिप्पलादि मुनी आणि शिष्यातील संवाद यावर फार सुंदर असे चिंतन श्लोक ५.२ ते ५.५ मध्ये केले आहे. त्याचा थोडक्यात अर्थ असा की ॐ रुपी साधने सांगताना ऋषि आपल्याला सांगतात की ॐ तीन मात्र मध्ये अ चे ध्यान केल्याने ऋग्वेद तील मंत्र साह्याने इहलोकात सर्व सुख आणि संपत्ती मिळेल, दुसऱ्या मात्र म्हणजे उ चे ध्यान करून यजुर्वेदी मंत्र सामर्थ्याने परलोकीची सुख मिळेल तर तिसऱ्या मात्रेच्या म्हणजे म चे ध्यान करून सांमवेदातील मंत्र सहायाने सूर्यलोकीचे ऐश्वर्य उपभोग मिळून मनुष्य मृत्यू लोकी परत येतो.


परंतु या सर्व मात्रांचे एकत्रित ध्यान केल्याने मनुष्य ब्रह्म लोक प्राप्त करून अंतरंगातील सर्व मानवीय सद्गुण विकसित करून उच्च कोटींचे परमात्म सानिध्य आणि आनंद प्राप्त करेल ज्याची तुला सर्व पृथ्वी चे राज्य आणि सर्व संपत्ती मिळाली तरी त्या हून अलोकिक आणि उत्तम असे आत्मज्ञान प्राप्त होऊन ब्रह्म लोक मिळेल.


याचे साध्या आणि सोप्या भाषेतील वर्णन म्हणजे नामस्मरण म्हणजेच ॐ चे ध्यान केल्यानेच आपल्यातील सद्गुण विकसित होतील त्यातूनच आपल्याला आत्मज्ञान रुपी उत्तम असा आनंद आणि ईश्वर सानिध्य प्राप्त करता येणे शक्य आहे. माणसाच्या जीवन विषयक दृष्टिकोन च त्याच्या उन्नती स कारणीभूत होत असतो.


उपनिषदे हे मानवी उत्क्रांती आणि उन्नतीचा उत्तम असा दृष्टिकोन आपल्याला शिकवीत संपूर्ण ॐ राचे ध्यान म्हणजेच नामस्मरण आपल्याला करायला शिकवीत आहेत.


श्रीराम जय राम जय जय राम !!


*सुंदर अभंग* 

सहस्त्रदळ साजिरें नयनाचे शेजारी ।

अर्ध मातृका अंतरी चिन्मय वस्तू ॥१॥

ॐकार नादीं कीं नाद ॐकारीं ।

दैवीं निरंतर प्रणवीं पहा ॥२॥

मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय ।

आत्मा एक असे स्वयें रया ॥३॥

ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता ।

कोण पत्री हे कविता नाहीं ऐसी ॥४॥

                    संत ज्ञानेश्वर माऊली


*अर्थ*

प्रत्येक जीवाच्या डोळ्याच्या वरच्या बाजूत म्हणजे मस्ताकांत सुंदर असे सहस्रदळ कमळ आहे. त्यातील अर्धमात्रिकेच्या आंत ती तेजोमय ब्रह्मवस्तु आहे. शमदमादि दैवी संपत्तीचा आश्रय करुन नेहेमी प्रणवाचे ध्यान करा. म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी नाद धर्म आहे. की नादाच्या ठिकाणी ओंकार आहे हे कळेल. ओंकारातील अकार, उकार, मकार, अर्धमात्रा व अनुस्वार ही सर्वच आत्मरुप आहेत. हा नाद बिंदु मोक्ष देणारा आहे असे कोणत्या वेदांत ग्रंथात नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


https://youtu.be/8pCo6xb1C64?si=VW9xufJI2lOGZpuC


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments