उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प २ : Upanishad Part 2

 उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प २ 


भारतीय ज्ञान आणि उपनिषदे  - विश्वाचे आर्त 

============================


मानवी जीवनाची इति कर्तव्यता आनंदी जगणे आणि ईश्वर मय होणे ही आहे हे आपण पाहिलेच ही भूमिका एकदा तयार झाली म्हणजे उपनिषद म्हणजे नक्की काय? त्या आधी ज्ञान म्हणजे नक्की काय? हे समजावून घेणे गरजेचे आहे


चंदनाचा सुगंध, मधाचे माधुर्य, अनारकलीला असलेला सुंदर रंग आणि हिमालयाला बर्फ कधी सोडून जात नाही तसेच कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात माणसाच्या मनाला ज्ञानाची लालसा सोडून राहत नाही. ज्ञान (knowledge) म्हणजे जाणणे (to Know) आणि योग्यवेळी स्मरणे (recall) होय. ज्ञान आणि माहिती यात अंतर आहे. ज्ञान म्हणजे जे आपल्याला जीवन जगताना जिवंत राहायला (pratical understanding for survival) मदत करते किंवा गरजेच्या वेळी जे मेंदूत स्मरते ते ज्ञान होय. जीवाचा मेंदू माहिती विसरू शकतो पण ज्ञान कधी विसरत नाही. उदाहरण आपण पाण्यात पडलो असता आपल्याला पोहायचे कसे लगेच स्मरते आणि आचरणात आणता येते ते जीवन वाचवायला सहायक होते जे स्मरते ते म्हणजे ज्ञान होय. डॉल्फिन माश्याला ज्ञानाने हे स्मरते त्याला कुठे कोणत्या महासागरात कधी जायचे आहे. जसे वैज्ञानिकाना निसर्गाचे नियम शोधायचे आधुनिक प्रयोगशाळेत वेड लागते तसेच भारतीय ऋषींना आत्मज्ञानचे वेड लागले त्यासाठी त्यांनी आपले जीवन आत्मचिंतना घालविले. ते करताना त्यांचे देहभान हरविले त्यांच्या तोंडून जे शब्द रूपाने बाहेर पडले त्या ज्ञानास श्रुती असे म्हणतात. आत्म्यातून ते स्पुरले म्हणून त्यास अपौरूषेय वाणी म्हणतात.


      ज्ञानाचा व्यवहार हा नेहमी जाणत्या व्यक्ती कडून न जाणत्या व्यक्तीकडे म्हणजेच गुरु कडून शिष्या कडे होत असतो.  गुरु वक्ता आहे तर शिष्य हा श्रोता आहे. ईश्र्वराच्या किंवा ब्रह्म ज्ञानात गुरु शिष्य संबंध पवित्र आणि विशेष आहे. उपनिषद हा शब्द आपल्याला तेच शिकवितो.


उपनिषद् हा शब्द उप, नि, आणि सद या तीन पदांपासून आलेला आहे. जवळ खाली बसणे या अर्थाने तो आलेला आहे. म्हणजे गुरूच्या पायाशी बसून त्यांच्या कडून श्रवण केलेले ब्रह्म किंवा आत्म्या विषयी ज्ञान म्हणजे उपनिषद होय. 


 उपनिषद् ही अपौरूषेय असे श्रवण केलेलं ज्ञान असल्याने ते कोणत्याही एक विशिष्ट प्रार्थना पद्धती शी निगडित नाही. ते सर्व मनुष्य साठी आहे. धर्म या शब्दाचा मूळ अर्थ खूप वेगळा आहे तो मी पुढील लेखात समजावून देईन त्यामुळे मी इथे  सनातन वैदिक ,मुस्लिम किंवा ख्रिश्चन, यहुदी अथवा इतर असोत या पद्धतीना  मानवी प्रार्थना पद्धती असे मी म्हणतो. कारण ईश्वर हा एकच आहे त्याच्या  प्रार्थना पद्धती मानवीय भेदाने निरनिराळ्या आहेत. या सर्वांसाठी उपनिषद् हे वरदान आहे. भगवत गीता हे उपनिषदांचे सारच आहे म्हणून श्रीमद्भगवत गीता हा संपूर्ण मानव जातीचा ग्रंथ आहे. तो एक विशिष्ट समाज, देश आणि प्रार्थना पद्धती यांचा नसून सर्व मानव समाजा साठी आहे. 


उपनिषद का अभ्यासायची तर ती मानवी बुध्दीला आत्मानंद किंवा आत्मस्वरूप म्हणजेच परमेश्वराचे ज्ञान गुरु मुखातून करून देत आहेत. त्यात अनेक मनोरंजक कथा आहेत, साहित्य आहे ज्ञान, विज्ञान आहे.  भारतीय ज्ञान हे विशिष्ठ ज्ञान म्हणजेच विज्ञान हे वैश्र्विक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याण साठी असलेले सुंदर असे आत्मचिंतन आहे.  


!! श्रीराम जय राम जय जय राम !!


सुंदर भजन- 

 विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

   अवघेचि झाले देह ब्रह्म !!

         श्री संत ज्ञानेश्वर माऊली 


https://youtu.be/plU2u5hInlc


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments