*उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १५*
*उपनिषद संकल्पना - आदीशक्ती*
===================
वेदान्त नुसार परमेश्वर अद्वैत आहे म्हणजे द्वैत नाही, एकच परब्रह्म अस्तित्वात आहे.परंतु हे जे जग दृश्य स्वरूपात दिसते आहे ही त्याने काही काळ उपाधी घेऊन तयार केलेला भास आहे. मुळात ती उपाधी सुद्धा नव्हती मग ती आली कुठून? त्या परब्रह्म मध्ये सर्व शक्तींचा स्त्रोत आहे . आपण एकटे असल्याची जाणीव होऊन आपण 'बहु स्याम' असा विचार संकल्प आला त्यातून सृजनशक्ती जागृत झाली.
त्याची अनेक होण्याची इच्छा होऊन निर्मिती क्षमता चाळविली त्यातून जी शक्ती आली आणि त्रिगुण निर्माण झाले त्यास श्वेताश्वेत उपनिषद सुंदर अजा आणि अज याचे रूपक देतात. त्यालाच आपण गुणक्षोभिणी माया किंवा माया म्हंटले गेले. त्या शक्ती द्वारे सर्व विश्वाची उभारणी झाली. ती शक्ती अनादी आहे. ती शक्ति दिसत नसली तरी ती सत म्हणजे अस्तितवात असते, चित म्हणजे संकल्प रूप, स्पष्ट किंवा ऐक पेक्षा अधिक रुपात प्रकटते, आणि आनंद म्हणजे क्रियाशक्ती चे मूळ या रूपांनी युक्त होते.
त्या शक्ती लाच माया, अविद्या, प्रकृती या शब्दांनी वर्णिले जाते.
मायां तु प्रकृतिं विद्यन्मयिन् तु महेश्वरम् !
श्वेताश्वतर उपनिषद ४.१०
अर्थ सर्व विश्वाची प्रकृती, मुलकारण माया आहे त्या मायेचं स्वामी मायेला आपल्या आधीन ठेवणारा मायावी परमात्मा जाणं!
शक्ती रुपी माया ही सर्व विश्वाचे आदीकारण आहे त्यामुळे हे सर्व विश्व दृश्य मान भासते. संत ज्ञानेश्र्वर आपल्या अमृतानुभव या ग्रंथात याचे फार सुंदर विवेचन करतात. जसे शिव आणि शक्ती एकरूप होऊन अर्धनारी नटेश्वर उभे आहेत. शिव कुठे संपतो आणि शक्ती कुठे सुरू होते हे कळत नाही. ही ज्ञानशक्ती आणि क्रिया शक्ती एकत्र शिवतत्त्व भासते. असा हा आलोकिक जोडप्याचा संसार आहे. जिथे प्रश्न उपनिषदात त्याला प्राण आणि रयी असे दोन रूपे दिली आहेत प्राण म्हणजे ब्रह्म आणि रयी ही ती पोषण करणारी शक्ती आहे.
त्याचे व्यवहारातील उदाहरण म्हणजे सोन्याचे अनेक दागिने असले तरी त्यात सर्वं मध्ये एकच सोने जसे भासते. तसेच या अनेक रुपी दृश्य शक्ती मय जगात ब्रह्म हे एक सोने आहे. पाण्याचा लाटा आणि फेस जरी वेगवेगळे दिसले तरी जलतत्व एकच असते. त्याप्रमाणे हे शिवतत्त्व म्हणजे शिव आणि शक्ती, परब्रह्म आणि त्याची माया ही मुळात सत चित आनंद असे एकच अद्वैत आहे.
त्या आदिशक्तीचा उत्सव म्हणजे त्या परब्रह्मच्य उपाधी रूप शक्तीचाच तर अद्वैत उत्सव नाही काय..
सुंदर अभंग
शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष ।
याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥
जागृति स्थूळ तुर्या महाकारण ।
हेचि कीर खुण तेझे ठायीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे कैसे हें जाणिजे ।
देही नाद गाजे परेवरी ॥३॥
अर्थ:-
ब्रह्म व माया यांचा भेद अर्धनारीनटेश्वरा प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एका शंकराच्या काही भागात पार्वतीचे रूप दिसते, वास्तविक पार्वतीला वेगळे रूप नाही. खरे रुप शंकराचेच असते. त्या प्रमाणे मायेचे वेगळे स्वरुप नाही. ती ब्रह्माच्या काही भागावर भासते.
श्रीराम जय राम जय जय राम !!!
https://youtu.be/_FH6t6LEdqE?si=2joteh3MSnPOq6Yd
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment