उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प १४ : Upanishad Part 14

 *उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १४*


*उपनिषद संकल्पना - वासना*

===================


विश्वव्यापी काम करणारी माया जेव्हा निरनिराळ्या व्यक्तींमध्ये प्रकट होते त्याला अविद्या असे म्हणतात. अविद्या म्हणजे ईश्वराचा विसर होय. जीवाला देह आणि जगत मायेच्या प्रभावाने  खरे वाटणे म्हणजे अविद्या होय.  हे आपण मागील लेखात पाहिले. तसेच सर्व सुख आणि दुःख यांचे कारण हे जन्म आणि मरण चक्र आणि वासना आहेत. कर्म बंधनानी आणि वासनांनी मनुष्य बांधला जातो परंतु वासना म्हणजे नक्की काय? साधकाच्या प्रवासातील ही गोष्ट मुळात समजणे गरजेचं आहे.


इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला म्हणजे चित्ता मध्ये ज्या अनुकल आणि प्रतिकूल संवेदना उमटल्या जातात त्या सुख दु:खात्मक वृत्ती होत.


वासना या शब्दाचा एक अर्थ म्हणजे इच्छा. आपल्या हे हवे ते हवे असे वाटून माणूस वासना पूर्ती साठी जीवन भर त्या मागे पळत असतो. वासना तीन प्रकारच्या आहेत सद् वासना आणि दुष्ट वासना आणि भोगवासना. सद् वासना म्हणजे मला ज्ञानेश्वरी अभ्यास करायचं आहे. मला नामस्मरण करायचे आहे. दुष्ट वासना म्हणजे दुसऱ्याचे वाईट करण्याची इच्छा म्हणजे त्याचे प्रगती होऊ नये. मनाने वाईट वासना नेहमी सोडून द्यावा. तसेच असतात भोगवसाना म्हणजे चांगले खावे चांगले ल्यावे विविध गोष्टींचं उपभोग घावा. वासंना कधीच तृप्त होत नाहीत. अग्निवर तूप घालावे तसे वासना वाढतच जातात.

समर्थ आपल्याला सांगत आहेत. 


मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना सर्वथा नीति सोडूं नको हो।

मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

            समर्थ रामदास  मनाचे श्लोक 


अनेक ठिकाणी आपल्या वासना हा शब्द फक्त कामवासना(lust) ह्या त्रोटक अर्थाने वापरतात जो अत्यंत चुकीचा आहे. काम हा व्यापक शब्द आहे. काम शब्दाचा अर्थ *'इदं मे स्यात् '* हे मला असावे असा सर्व सामान्य वाचक आहे. हे मला नसावे ही सुद्धा एक इच्छा असते.

        *कामान् यः कामयते मन्यमानः*

        *स कामभिर्जायते तत्र तत्र !!*

                               *मुण्डक उपनिषद ३'२'२*


अर्थ: जो ऐहिक किंवा परलोकिक सुखांचे चिंतन करीत ती ती सुखे मिळविण्याची इच्छा करतो तो तो त्या त्या कामनांनुसार जन्म घेतो.


वासना ह्या शब्दाचा दुसरा अर्थ ज्याला अध्यात्मिक अर्थ आहे तो असा की जन्म घावा लागे वासानांच्या संगे म्हणजे आपण जन्म मरण ह्या लेखात पाहिले जीव हा देहाला सोडून जातात आपल्या पूर्व जन्मीच्या वासना घेऊन जातो म्हणजे नक्की काय? इथे वासना म्हणजे आयुष्यात आलेल्या अनुभवांचे ठसे, मनावर झालेले संस्कार होतं. तेच संस्कार आपण पुढील जन्मी घेऊन जातो म्हणून कोणी उत्तम संगीतकार असतो, कुणाल चित्र आवडतात त्या पूर्व जन्मीचे संस्कार होतं. 

त्याशिवाय सुरवातीला जीव आत्मभवा मध्ये राहत असतो तो खूप आनंदी मधुर असतो परंतु जीवभासा प्राप्त झाल्यावर तो ही गोष्ट विसरतो त्याला विद्यारण्या स्वामी ब्रहआनंदाची वासना असे म्हणतात.


मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥

मना यातना थोर हे गर्भवासीं।

मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

              समर्थ रामदास  मनाचे श्लोक २१


वासना हा शब्द व्यापक अर्थाने आलेलं आहे त्यामुळे तो कोणत्या अर्थाने वापरला आहे तसा त्याचा अर्थ घेणे अपेक्षित आहे.


*संत निवृत्तीनाथांचे अभंग*


मनाची वासना मनेंचि नेमावी ।

सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥

आपेंआप निवेल आपेंआप होईल ।

विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥

साधितां मार्ग गुढ वासना अवघड ।

गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥

निवृत्ति वासना उपरति नयना ।

चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥


अर्थ:-


मनातील वाईट इच्छा मनातच संपवुन सर्वत्र भरुन असलेल्या विठ्ठलाला मनात धरले की मन वासनारहित होते. हे सर्व करायला सोपे आहे फक्त विठ्ठलाचे स्मरण केले की वासना आपोआप निमतील व विठ्ठल मनात आपोआप स्थापित होईल काही गुढ इच्छा परमार्थ करताना त्रास देतात पण गुरुमार्गी वैराग्य साधना केली की त्या निघुन जातात. निवृत्तिनाथ म्हणतात, माझ्या डोळ्यांना तर चराचरात व्यापक असलेला हरि पाहायची वासना लागली आहे.


श्रीराम जय राम जय जय राम !!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments