*उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १३*
*उपनिषद संकल्पना - धर्म आणि सत्य*
========================
आत्मज्ञान मिळविणे हे आपले जीवित कार्य आहे हे आ आपण मुळात आनंदी असतो त्याचे स्वरूप जाणणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु या दोन्ही साठी आपण आपला स्वभाव आणि आचरण शुद्ध असणे खूप गरजेचे असते. त्या साठी नियमांची आवश्यकता असते. नियम हे धर्म आणि सत्यावर आधारित हवेत. मग धर्म म्हणजे नक्की काय ? सत्य कोणाला म्हणावं त्याचा आधार काय? त्याची लक्षणे कोणती ?
धर्म हा शब्द "धर" या धातू पासून आला. धर म्हणजे स्थिरता किंवा स्थायीभाव. धर्म या शब्दाचा अर्थ जे आचरणात असलेले सत्य जे स्थिर किंवा न बदलणारे आहे ते.
धर्म हा शब्द आपल्या तत्वज्ञानात कर्तव्य, तत्व, किंवा सत्यावर आधारित जगणे या अर्थी वापरला गेला आहे.
आपल्याकडे धर्म हा शब्द सनातन वैदिक, मुस्लिम, ख्रिश्चन अथवा यहुदी इत्यादी मानवीय प्रार्थना पद्धती किंवा पंथ या साठी वापरण्याची चुकीची पद्धत आहे. धर्म म्हणजे स्वतःचे आचरण किंवा स्वधर्म होय. धर्म हा शब्द एखाद्याच स्वभाव या अर्थी सुद्धा वापरला जातो म्हणजे दाहकता हा अग्निचा धर्म आहे. इथे तो अर्थ गुणधर्म या अर्थाने येत आहे.
धर्माची एक व्याख्या अशी केली गेली आहे
यं त्वअर्या: क्रियामाणं प्रशसंति स
धर्मो यं गहर्णते सोधर्म: !!
जे क्रियाकर्म केल्याने बुद्धीमान व सुसंस्कृत लोकांच्या प्रशंसेस पात्र झाले आहे ते आचरण म्हणजे धर्म आणि जे निंद्य ते अधर्म होय.
धर्माचा आधार शास्त्र होत. भारतीय तत्वज्ञानामध्ये मध्ये सहा प्रकाराची शास्त्रे आहेत. वैशेषिक, न्याय,मीमांसा(उत्तर आणि पुर्व मीमांसा), सांख्य,योग दर्शन,वेदांत दर्शन ही होत.
धर्माचे मूल हे वेद, स्मृती , सज्जनांचा आचार, आणि स्वहित साधन होय.
श्रीमद भगवत गीता आपणास स्वधर्म आचरणाचा म्हणजेच सर्वांनी आपापल्या कर्तव्यांचा निर्वाह कोणताही आपपर भाव न करता करावा असे सांगते.
धर्म हे आचारणाची जीवन तत्वे होत जी आपण प्रत्येक कर्म करताना विचारात घ्यावयास हवीत. कोणतेही कर्म किंवा विचार करण्या आधी आपण हा प्रश्न स्वतःस जरूर विचारावा की हे कर्म माझ्या कर्तव्यस अनुरूप आणि सत्यावर आधारित आहे का?
उपनिषदांनी धर्माचं अर्थ सत्य असाही दिला आहे. सत्यम वद! धर्मम चर !! असे आपण म्हणतो.
सत्य हे कधी भिन्न असू शकत नाही. ते व्यक्ती सापेक्ष बदलत नाही. सूर्य हा उगवतो हे सत्य सर्वांन साठी समान असतें. आपण अंधार करून बसलो म्हणजे सूर्य उगवत नाही असे कधी होत नाही.
या विश्वातील एकमेव सत्य म्हणजे ईश्वर होय. ज्याला कोणी भगवान कृष्ण म्हणतात किंवा इतर नावाने आपण ईश्वरा स जाणतो. इतर सर्व ही माया किंवा अविद्या होय. धर्म आणि त्याची तत्वे आपले विचार आणि प्रत्येक क्रिया किंवा कर्मे ठरवीत असतात. महाभारता मध्ये अहिंसा परमोधर्मा: (अनुशासन पर्व) असे म्हणजे आपण कायिक वाचिक आणि मानसिक हिंसा न करणे हाच परम धर्म आहे असे सांगितले आहे.
लोकांना कर्मकांड, रीतिरिवाज, अर्थ किंवा पैसे हाच धर्म आहे असे वाटते. परंतु पैसे हे उत्तम जीवन जगण्याचे साधन असून साध्य नाही हेच आपण विसरतो.पैसे वाचवणं किंवा अधिक आर्थिक लाभासाठी आपण स्वतःशी व इतरांशी खोटे बोलतो किंवा समाजात चुकीची माहिती पसरवितो आणि आपण अधर्माच्या वाटे वर जातो.अधर्म म्हणजे समाजास त्रास देणे फसवणूक करणे, आणि फूट पाडणे होय.
भारतीय तत्वज्ञान पाच प्रकारचे अधर्म सांगतो
१. उपमा
२. विधर्म
३. परधर्म
४. आभास
५. छल किंवा कपट
असे म्हणतात जिथे सत्य आहे तिथे धर्म वास करतो जिथे धर्म आहे तिथे कृष्ण आहे जिथे कृष्ण आहे तिथे विजय आहे.
सत्य परता नाही धर्म ! सत्य तेचि परब्रह्म !!
सत्यपाशी पुरुषोत्तम ! सदाकाली तिष्ठत !! ..
...... विनोबा भावे
सारांश जो धर्म आहे तो देश, वर्ण, कुल रीतिरिवाज यांनी बांधला गेले ला नाही तर तो सत्य स्व आचारणाचा मार्ग आहे. समाजात सलोख्याने वागावे जीवन शिस्तबध्द आणि आनंदी असावे हाच नियम रुपी धर्माचा खरा अर्थ होय.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
सुंदर अभंग
धर्म रक्षावया साठीं ।
करणें आटी आम्हांसि ॥१॥
वाचा बोलों वेदनीती ।
करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां स्थिति अंगीं ।
कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी ।
भक्ति दूषी हरीची ॥३॥
संत तुकाराम महाराज !!
🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment