उपनिषद अभ्यास लेखमाला पुष्प १२
उपनिषद संकल्पना - अनुसंधांनाचे महत्त्व
==========================
आत्मज्ञान मिळविणे हे आपले जीवित कार्य आहे हे आपण मागील काही अभ्यास पुष्पा मधून पाहिले. आपण मुळात आनंदी असतो त्याचे स्वरूप जाणणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु हे ज्ञान नेहमी ज्याने आत्मज्ञानचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्याच्या कडून ते घ्यावे असे आपल्या ऋषि सांगत आहेत.
देहाला सुख देणारी वस्तू पैसा, सत्ता, मान, खाणे पिणे घरदार, बायकामुले या सर्वच गोष्टी अशाश्वत आहेत कारण त्या क्षणिक टिकणाऱ्या आहेत याचा आपल्या अनुभव असतो या सर्व गोष्टी स्वतचं अपूर्ण असल्याने त्या पासून पूर्ण आनंद मिळणे अवघडच असते.
सर्व सामान्य साधकांना आत्मा हा शाश्वत असला तरी त्याचा अनुभव आपल्याला आलेला नसतो आणि अशाश्वत गोष्टी आणि दृश्य जग ज्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो त्यामुळे तो द्दिधा मानसिकतेमध्ये असतो. आपल्याला या जीवनात शाश्वत असे आत्मज्ञान झाले नाही तर आपण जे प्रत्यक्ष अशाश्वत सुख उपभोग घेत आहोत त्या पासून सुद्धा आपण दूर जाऊ किंवा वंचित होऊ की काय अशी भीती साधकाच्या मनात येणे साहजिकच असते.
त्याचे अजून एक कारण म्हणजे जे विद्वान प्रवचनकार पंडित आपल्याला अनेक संत ग्रंथ वापर करून आपल्या श्रोत्यांना आत्मज्ञान चे मार्ग अनेक प्रकारे अनुभव नसताना जन्मभर सांगत असतात. त्यातून ते साधक स्वतः परमेश्वर भक्तीस लागतात परंतु पंडित स्वतः आचरण न केल्याने तसाच कोरडा राहण्याची शक्यता अधिक असते. कारण तो स्वतः एक ही पाऊल पुढे टाकत नाही आणि लोकिक अर्थाने त्याला परमार्थ सांगण्याचे फक्त व्यसनच जडते त्यातून विवेक रुपी सद्बुद्धीचां विकास होतच नाही.
असे करणे म्हणजे अंधकाराने भरलेल्या खोलीत चाचपडणे च होय त्याने कधीच अंधकार नाहीसा होत नाही. खोलीतील अंधकार नाहीसा कधी होतो जेव्हा आपण त्या मध्ये छोटासा दिवा लावला तरी थोडे फार दिसू लागते मग तो दिवा कोणता?
तर तो म्हणजे परमेश्वराच्या अनुसंधान मध्ये राहण्याचा अभ्यास होय. तो अभ्यास कसा होतो तर दररोज थोडे थोडे श्रवण,मनन आणि नामस्मरणानेच अनुसंधान साधते. अध्यात्म साधना ही नेहमी ऐकांतात करावी कारण तो प्रत्येक जीव आणि परमेश्वर या मधील परस्पर संबंध आहे. परमार्थ हा दुसऱ्यांना दाखविण्यासाठी किंवा जगाने आपल्या छान म्हणावे म्हणून करायचं नाही तर तो स्वतःला अधिक अधिक आनंदी आत्मानंदी होत जावे म्हणून आहे. सर्व साधकांनी मग तो विद्वान पंडित प्रवचनकार असो अथवा सामान्य साधक असो सर्वांनी नामस्मरण करणे आणि भगवंताशी अनुसंधान जपणे गरजेचे असते.
आत्मादर्शनाचा हाच खरा उपाय आहे जो आपल्याला
अशाश्वत वस्तू कडून शाश्वत आत्मज्ञान कडे घेऊन जाईल म्हणून नेहमी संत, सद्गुरु आणि परमेश्वरा शरण जावे विद्वान प्रवचनकार पंडितांना नव्हे आणि कायम भगवंताच्या अनुसंधानात म्हणजे नामस्मरण, श्रवण आणि मनन सर्वांनी करीत रहावे.
श्रीराम जय राम जय जय राम !!!
इवलेंसें रोप लाविलें द्वारीं ।
त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला ॥
फ़ुलें वेंचिता अतिभारुकळियांसि आला ॥२॥
मनाचिये गुंती गुंफ़ियेला शेला ॥
बापरखुमादेविवर विठ्ठलीं अर्पिला ॥३॥
संत ज्ञानेश्वर महाराज
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!!!!
https://youtu.be/97woxgWUHFI?feature=shared
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment