उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प १०
उपनिषदातील संकल्पना ~ स्थूल प्राण
========================
उपनिषदातील प्राण आणि "अतति इती आत्मा" म्हणजे जो व्यापून राहतो तो आत्मा ह्या महत्वाच्या संकल्पना आपण मागील लेखात अभ्यासल्या आहेत. आता स्थूल प्राण म्हणजेच श्वास आणि पंचमहाभूतातील वायू जो मुख्यतः पाच आणि गौणत: आणखीन पाच उपप्रकार मोडतो त्याचा विचार करूयात. त्यासाठी अन शब्द वापरला जातो.
१. प्राण - प्र + अन = प्राण - प्र म्हणजे प्रमुख हा मुख्य प्राण- श्वास आपल्या बरोबर जन्मापासून असतो. सामान्य मनुष्य शरीर दिवस व रात्र मिळून २१६०० वेळा श्वास घेतो व सोडतो. नाक, हृद्य ते मस्तक या पर्यंत याचे कार्य चालते.
२.अपान - अप + अन = अपान - हा गुदस्थानात म्हणजे मल मूत्र वायू नि: सारण याचे कार्य शरीरात हा वायू करतो. विषारी द्रव्यांपासून आपल्या शरीराचे हा रक्षण करतो. श्वास बाहेर सोडणे म्हणजे निःश्वास या वाटे सुद्धा आपण नको असलेले वायू बाहेर सोडतो.
३.व्यान - वि + अन= व्यान - रक्ताभिसरण, संवेदना, सांधे हालचाल, या वायू मुळे आपले शरीर हालचाल करीत असते.
४.समान - सम + अन = समान - आपले खाललेले अन्न घुसळून त्याचे पोषक रसात रूपांतर करून सर्व शरीरभर पसविण्याचे कार्य हा नाभीस्थानातील वायू मुळे घडून येते.
५.उदान - उत्+ अन = उदान - हा वायू कंठ स्थानी राहतो. त्यामुळे आपण बोलू शकतो, ढेकर देतो, झोप लागते. आपल्या शरीरातील हिता नावाची नाडी आपल्या स्वप्न पडण्यास कारणीभूत होते ती याच वायूच्या कार्य मुळे होते.
हे सर्व प्राण ब्रह्मांड मध्ये सुद्धा असतात. आदित्य म्हणजे सूर्यास जगाचे प्राण असे म्हणतात. हा ऊर्जा पुरवितो हा डोळ्यांना शरीरातील शक्ती पुरवितो. आपल्या उजव्या डोळ्यात प्राण राहतो म्हणून डॉ सुद्धा मनुष्य जिवंत आहे किंवा नाही हे उजव्या डोळ्यात उजेड टाकून तपासतात.
पृथ्वीच्या गुुरूत्वाकर्षणाचे काम हा अपान वायू करतो त्यामुळे स्थिरता लाभते. ब्रह्मांड मधील सर्व हालचाली व्यान (ज्याचा पुत्र हनुमान) म्हणून तो सर्वत्र संचार करू शकतो. समान म्हणजे आकाश किंवा भुव: तसेच उदान म्हणजे हवेतील उष्णता होय.
त्यामुळे आपल्याकडे जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हणतात.
उपप्रकार
नाग - उदगार (ढेकर)
कूर्म - डोळ्यांची उघडझाप
कृकल - शिंक येते
देवदत्त - जांभई येते
धनंजय - शरीर पुष्ट करतो व मृत्यू समयी शरीर फुगवतो.
प्राणस्य इदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् !
मातेव पुत्रान रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश्च विधेहि न:!!
प्रश्नोपनिषद (२/१३)
अर्थ - ह्या तीन ही लोकात जे जे आहे ते प्राणाचा अधीन आहे. त्यामुळे हे प्राण तू आमचे आई प्रमाणे रक्षण कर आम्हाला वैभव व बुध्दी दे !!
श्रीराम जय राम जय जय राम!!!
सुंदर अभंग
यम नियम प्राणायाम ।
साधे जपतां रामनाम ॥१॥
रामनाम जपतां आधीं ।
नाशताती आधिव्याधी ॥२॥
रामनामी जडली वाचा ।
हरिरुप होय साचा ॥३॥
निळा म्हणे रामनाम ।
पावलासे मोक्षधाम ॥४॥
संत निळोबाराय
सौजन्य -
https://www.santsahitya.in/sants/
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment