उपनिषद अभ्यास लेखमाला - पुष्प 3
उपनिषदांचा उगम, प्रकार आणि काळाची गरज
============================
मानवी जीवन आनंदमय आहे तसेच ज्ञान ही मानवाची मूलभूत गरज आहे तसेच उपनिषद् या शब्दाचा अर्थ आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न आपण मागील लेखात केला. उपनिषद या आधुनिक काळात का अभ्यसायची त्यांचा उगम काय ती किती प्रकारची आहेत हा मूळ प्रश्न आपण समजावून घेतला पाहिजे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ पेक्षा अधिक काळ लोटला आहे. आपला देश आधुनिक प्रगतिशील मानवी जीवनाच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो आहे. परंतु जे रामराज्य आपल्या देशात यावे म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले ते अजून दूरच आहे. समृध्दी शिवाय बरीचशी जनता ही योगक्षेमाच्याच चिंतेत आहे. फ्रान्स सारख्या अनेक प्रगत राष्ट्रांन मध्ये आजही ही अशांतता आहे. मानवी मूल्य पायदळी तुडविले जाताना दिसत आहेत. कारण समृध्द आणि सुखी जीवन कसे जगावे हे आदर्श अजून ही भारतीय ज्ञान आणि तत्वज्ञानतून जगाने स्वीकारले नाही आहे. हा आपला सर्वोत्तम वारसा प्रथम आपण आनंदी, समृध्द आणि सुखी जीवन जगण्यासाठी अभ्यासायला हवा म्हणून उपनिषदांचे व श्रीमद्भगवद्गीतेचे महत्व मानवी जीवनात आहे.
उपनिषदे एकूण १०८ आहेत. परंतु त्यापैकी
ईश केन कठ प्रश्न मुण्डमाण्डुक्य तैत्तिरि: !
ऐतरएयं च छान्दोग्य बृहदारण्यमेव च !!
या दशोपनिषद व श्वेताश्वतर उपनिषदां वर भवत्पूज्यपाद जगतगुरु आद्य शंकराचार्य यांनी भाष्य केले आहे. प्राचीन आणि अर्वाचीन अशा अनेक विद्वानांनी म्हणजे गौडपाद, श्री ज्ञानदेव, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, श्री अरविंद, डॉक्टर राधाकृष्णन , विनोबा यांनी यातून स्पूर्ती घेतली आहेच. त्याशिवाय इस्लाम धर्मीय विद्वान मन्सूर, सरमद, फैजी, बुल्लेशाह ते युरोपियन शोपन हॉवर, ह्युम कीथ, हर्टेल आदी अनेक विद्वानांनी सुद्धा यांचा खोल अभ्यास केला आहे.
वैदिक साहित्याचे चार विभाग आहेत संहिता, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषदे. पहिल्या तीन विभागात मुख्यत: विश्र्वरचनेचे चिंतन आहे. उपनिषदांना वेदांचे
अग्नायमस्तक म्हणजे उत्तमअंग असे म्हणतात. म्हणून उपनिषदांना वेदान्त हेच नाव चांगले शोभते.
श्रीमद् भगवतगीता, ब्रह्मसूत्रे, आणि दशोपनिषद यांना भारतीय तत्वज्ञानात प्रस्तानत्रयी म्हणून ओळखले जाते.
थोडक्यात माणूस, जगत आणि ईश्वर या तीन गोष्टींचे मुलस्वरुप आणि परस्पर संबंध समजावून घेताना निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उपनिषदे शक्य तितकी समाधान कारक उत्तरे देतात. म्हणून सर्व मानवाने श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे मुळापासून अभ्यासली पाहिजेत.
बहुतांशी दैनंदिन जीवनातील अनेक प्रार्थना किंवा वापरले जाणारे संस्कृत मंत्र, बोधवाक्य उपनिषदांत सापडतात जसे की
मातृदेवो भव ! पितृदेवो भव !!
तैत्तिरिय (१!११!३)
स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वाक्य
उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान निबोधित !!
कठ (१!३!१४)
अशी अनेक आहेत.
भारतीय जीवनातील सर्व अंगांना सर्व समावेश असा परीस स्पर्श उपनिषद करीत आहेत म्हणून सुद्धा ती अभ्यासायला हवीतच.
पुढील लेखात काही महत्वाच्या संकल्पना आधी समजावून घेऊ त्यामुळे उपनिषद अभ्यासणे सोपे जाते.
श्री राम जयराम जय जय राम !!!
आषाढ कृ १ शके १९४५
सुंदर अभंग
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम!
देह प्रपंचाचा दास, सुखे करो नाम !!
संत गोरा कुंभार
https://youtu.be/gPIFXqo3vxk
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment