या अधिक मासी पुरुषोत्तम पाही|
करू मंगल आरती सर मिळूनिया ठाई||धृ||
देह बुद्धी कापूस पिंजून घेऊ सारा |
तीस-तीन सुतांचा एकेक वातीस फेरा|
स्नेह तुपात भिजवून सप्रेमे करी घेई|
करू मंगल आरती सर मिळूनिया ठाई||१||
मन शुद्ध निरांजन निर्गुण तबकी ठेवा|
षडविकार जाळून कपूर वडी मग लावा |
मन भक्ती गुंफुनी हार फुलाचा वाही|
करू मंगल आरती सर मिळूनिया ठाई||२||
गुरू ब्रम्ह सनातन पाहुनी ब्राम्हण ऐसे
करू अपूवायन दान तयाला खासे|
अहंभाव दक्षिणा देवूनी कृतार्थ होई
करू मंगल आरती सर मिळूनिया ठाई||३||
त्रयवर्षा त्रिपुटी साधूंनी संधी आला|
मलमास अधिक मग म्हणती कोणी याला |
मनु साधूंनी संधी, गुरू पदी तरूनी जाई |
करू मंगल आरती सर मिळूनिया ठाई||४||
Comments
Post a Comment