Tuzya krupene bhavsagar haa aamhi taru ho raghupati: तुझ्या कृपेने भवसागर हा आम्हीं तरु हो रघुपती - Pralhad Maharaj Geet
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्हीं तरु हो रघुपती |
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती |
भक्त जनाना तारयास्तव अवतरला तू भूवरती ||धृ||
नारायण तू प्रल्हादा रे | स्वामी जगाचा तू श्रीपती |
अज्ञानाने जन हे तुजला पहा किती हे नर म्हणती ||०१||
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती |
भक्त जनाना तारयास्तव अवतरला तू भूवरती ||धृ||
निराकार निर्गुण ब्रम्ह हे | मज नकळे मी मंदमती |
सगुण ब्रम्ह स्वरूप आपुले | सदैव राहो मम चित्ती ||०२||
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती |
भक्त जनाना तारयास्तव अवतरला तू भूवरती ||धृ||
कृपा दृष्टीने पहा गुरुवार | किंकर आम्ही मूढमती |
वेदशास्त्र श्रुती ग्रंथ बोलती | गुरुविण नाही पहा गती ||०३||
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती |
भक्त जनाना तारयास्तव अवतरला तू भूवरती ||धृ||
सदगुरू नाथा श्री प्रल्हादा | दया करा हो मज वरती |
राम नाम नित राहो कंठी | हेच मागणे तुम्हा प्रती ||०४||
तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती |
भक्त जनाना तारयास्तव अवतरला तू भूवरती ||धृ||
Comments
Post a Comment