श्रीमत् प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना स्फुरलेला हा अत्यंत सुंदर जोगवा.
भुत्याचा जोगवा
आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यां मज केले।।धृ।।
पंचभूताचा देहपोत हा त्रिगुणगुणें वळीला।
चैतन्याची ज्योत लावूनी प्रज्वलीत केला।
चित्तस्नेह प्राणवायूने त्याला स्थिर केले।।१।।
उदर परडीही हाती देऊनी ब्रह्मांडी फिरवी।
लक्ष चौऱ्यांशी घरची भिक्षा मागविली बरवी।
ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले।।२।।
सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी।
कर्मफलांचा कुंकूम मळवट माझ्या लल्लाटी।
पीडा बाधा शकुन सांगून लोका भुलविले।।३।।
आदिशक्ती असा मी भुत्या नाम वासुदेव।
मागूनी जोगवा सद्गुरू चरणी धरला दृढभाव।
आदिशक्ती ही मजला वळवी भुतेपण नेले।।४।।
बोल भवानी की जय
Comments
Post a Comment