तुळशी लग्न आणि तुळशी ची आरती |
जय देवी जय देवी जय माय तुळशी |
निजपत्राहूनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी||धृ||
ब्रम्हा केवल मुळी मध्ये तो शौरी |
अग्नी शंकर तीर्थे शाखापरिवारी||
सेवा करिती भावे सकळहि नरनारी |
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी||
जय देवी जय देवी जय माय तुळशी ||१||
शीतळ छाया भुतळ व्यापक तू कैसी |
मंजिरीची आवड कमलारमणासी ||
तवं दलविरहित विष्णू राहे उपवासी|
विशेष महिमा तुझा शुभ कर्तिकमासी ||
जय देवी जय देवी जय माय तुळशी ||२||
अच्युत माधव केशव पितांबरधारी|
तुझे पूजन काळी जो हे उच्चारी||
त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी |
गोसाविसुत विनवी मजला तू तारी ||
जय देवी जय देवी जय माय तुळशी ||३||
Comments
Post a Comment