Shree Pralhad Maharaj Sakharkherda - Bavanni- Vidarbh- Maharashtra |
जय जय सद्गुरू प्रल्हादा। भक्तजनांच्या आल्हादा ॥१॥
तव चरित्राची बावन्नी घ्यावी गाऊनी मजकडूनी ॥२॥
रामानंद तव गुरू। ब्रह्मचैतन्य आजेगुरू | ॥३॥
गंगामाई तव जननी। मांगल्याची ती खाणी ।।४।।
मुकुंदअण्णा तव पिता। अग्नीहोत्र घरी चाले सदा ॥५ ॥
आजोळी वेणी ग्रामी। माध्यान्ही गुरुवार दिनी ॥६॥
शके अठराशे चौदासी। माघवद्य अमावस्येसी ।।७।।
रामनामाचा करण्या प्रसार । श्री प्रल्हाद घेती अवतार ॥ ८ ॥
भक्तजनांना तारण्यासी अवतरला तू भूवरती ।।९ ।।
सवंगडी करूनी गोळा । बालपणी केल्या लीला ।।१०।।
किल्ल्यातील भुयारात । पुजेत बसले ध्यानस्थ ।।११ ।।
टोळधाडीचे निमित्ये। सोडीली तुम्ही शाळाते ।।१२।।
सखाजींकडे अध्ययनाला । धाडले तुम्हा रिसोडला ।।१३।।
साद ऐकुनी तव मनीची। रामानंद देती अनुग्रहासी।। १४।।
सुलतानपुरच्या मैने सोबत। विवाह झाला मेहकरात ।।१५।।
*विवाह करूनी ब्रह्मचारी राहीला तुम्ही जीवनभरी ।।१६।।
गुरू वाक्य ते मानून। सर्वस्वी केले गृहदान ।।१७।।
महाशिवरात्रीला भक्तासी । शिवरूपी दर्शन देसी।।१८।।
राममूर्ती ती तव गुरूंनी । प्रसाद रूपी देऊनी ।।१९।।
राममूर्ती हरविता क्षणी । त्यागीले त अन्नपाणी ।।२०।।
तू निःसीम सेवा जालन्यासी । मिळाली आज्ञा अनुग्रहाची ॥२१।।
भक्तांना करण्या बोध। आचरिला तू दासबोध।।२२।।
दिनकराचा कॉलरा । रामतिर्थे केला बरा ||२३||
अनाथांसी त्वा रक्षियले। अनेक संसार जोडविले ।।२४।।
भक्तांची इच्छा पुरविली। बद्रीनाथ यात्रा घडली ।।२५।।
शेवाळकर अन भोगलेंसी। हनुमंत रूपे दर्शन देसी ॥२६॥
अकोला ग्रामी रौप्यतुला। सहस्त्र चंद्र दर्शनाला ।।२७।।
गोविंदराव गुरूजींचा। नेम पुरविला गुरूपूजनाचा ||२८||
रामदासांचे गंडांतर। रामनामे त्वा केले दूर ।।२९ ।।
रामनाम तव नाडी मधुनी। चकीत होती वैद्य ऐकुनी ।।३०।।
भोकरदनच्या पांडेचे। दोन्ही तेत्र गेले साचे ।।३१।।
स्पर्शता जप माळेने। येती त्यांची दोन्ही नयेने ॥३२॥
विजया देवठणकर यांची । पळविली तुम्ही भानामती ॥ ३३।।
चिखली आणि जिंतूरासी । एकाच वेळी अवतंरसी ॥३४ ॥
खेटकपूर तव पदस्पर्शाने। तिर्थक्षेत्र ते बनविले । ।३५ ।।
खेरड्याच्या कोरड्या विहीरीला।रामतिर्थे आणिविला झरा ।।३६।।
शंकरराव देशपांडेचा झटका अर्धांग वायुचा ।।३७ ।।
तवतिर्थे तो झाला बरा ! रामावरती श्रद्धा धरा ।।३८ ॥
सर्व सुखाचा आगर। अन्नदानावर दिला भर ।।३९ ।।
दयाघन माझी माऊली | संकटी येते धावूनी । । ४० ।।
सांगता तेराकोटी जपाची। गावोगावी करविली साची।।४१।।
कार्तिक विनायक चतुर्थीला अवतार तुम्ही संपविला।।४२ ॥
तवपश्चात नाम महीमा जिजीमायने वाढविला ।।४३ ।।
श्रद्धा ठेवूनी करा भक्ती। प्रत्यक्ष प्रगटेल गुरूमुर्ती ॥ ॥४४॥
तूच आमुची माऊली तूच कृपेची साऊली। ॥ ४५ ॥
देह समाप्ती नंतरही। किती जणा अनुभव येई।।४६ ।।
तूच ज्ञानी अंतर्यामी । पतीतांसी लावी रामनामी । । ४७ । ।
अनंतकोटी ब्रम्हांडाचा । नायक तू या विश्वाचा ।।४८।।
आम्हा तुमचे चरणापासी असू द्यावे अहर्निशी ।। ४९।।
राम स्मरावा ध्यानी मनी । नित्य घेवूनी स्मरणी।।५०।।
पठण करता बावन्नीचे । पुण्य मिळेल पारायणाचे ।।५१।।
श्वासोश्वासी रामनाम। श्रीराम जयराम जय जय राम ।।५२।।
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
॥ अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय ॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ श्री सद्गुरू प्रल्हाद महाराज बावन्नी
✍🏻रचनाकार: चंद्रकांत वा.कुळकर्णी अमरावती
!!श्रीराम जय राम जय जय राम !!
Comments
Post a Comment