Shree krishnacha palna - मथुरेमध्ये अवतार धरिला : श्रीकृष्ण पाळणा




मधुरेमध्ये अवतार धरिला ।। कृष्ण देवकीच्या गर्भासी आला ।।

तोडून बेड्या बंद सोडिला ।। चरणांच्या प्रतापे माग दाविला ।। जो बाळा जो रे जो  ।।१।।

गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला ।। नंदाच्या घरी आनद झाला गुढ्या तोरणे शिखरी बांधिती ।।

कसमांचे हार देव वर्षती ।। जो बाळा जो. ।।२।।

तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री ।। तासे नौबती उत्सव करिता ! सर्वांचा

कृष्ण हा शब्द ।। त्याचे छंदाने नाचे गाव वछंदाने नाचे गोविंद ।। जो बाळा जो. ।।३।।

चवथ्या दिवशी चवथी चौकी।। बाळबाळंतिणींची न्हाणी होती ।।

निबे डाळिबना नारळ आणिती ।। सख्या मिळोनी दृष्ट काढिती।। जो बाळा जो. ।।४।।

दिवशी पाटापूजन ।। बांधिला फुलवरा वाक्या तोरण ।।

पाचव्या बिंदली आंगडे पैरण ।। खिरी जो बाळा जो. ।।५।।

सहाव्या दिवशी सटवी पूजन ।। हळदी-कुंकवाची देताती वाणं ।।

एकमेकीसी सखया होऊन ।। पानसुपाऱ्या खोबरें वाटून ।। जो बाळा जो. ।।६।।

सातव्या दिवशी सटवीचा फेरा ।। गोपा बाळंतीण आवरून धरा ।।

सांजच्या प्रहरी अंगारा करा ।। गाई-वासरां मुला लेकरां । जो बाळा जो. ।।७।।

आठव्या दिवशी आठवी चौकी ।। गोपां बाळंतीण नवतीस न्हाती ।।

सख्या मिळोनी जाग्रण करिती ।। कृष्णाच्या लीला आनंदे गाती ।। जो बाळा जो. ।।८।।

नवव्या दिवशी नवस केला ।। खेळणे पाळणे वाहीन तुजला ।।

रत्नजडित पालख सजला ।। वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला ।। जो बाळा जो. ।।९।।

दहाव्या दिवशी दहावी चौकी ।। न्हाणी बोळवून सारवल्या भिंती ।।

मूठभरल्या ओट्या दिधल्या लावूनी ।। देव स्वर्गाचे पुष्प वर्जूनी ।। जो बाळा जो. ॥१०॥

अकराव्या दिवशी अकरावी चौकी ।। येशोदा बसली मंचकावरती ।।

नयनाच्या कोरी काजळ भरी ।। वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी ।। जो बाळा जो. ।।११।।

बाराव्या दिवशी बारसें येती ।। परोपरी पक्वान्ने समय करिती ।।

लाडू मोदक पंखा वारिती।। खीर भरल्या वाट्या साखर मिळविती।। जो बाळा जो. ।।१२।।

तराव्या दिवशी तेरावी चौकी । बारीक जुनें नेसून येती ।।

मोर गर्जती चौखंडा वरती ।। गाई वासरे मोदे हंबरती ।। जो बाळा जो. ।।१३।।

चवदाव्या दिवशी चवदावी चौकी ।। नंदी महादेव परतुनी येती।

बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती ।। श्रीगोपांचे मीठ बळीराम घेती ।। जो बाळा जो रे जो ।।१४।।।

पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी ।। नगरीच्या नारी मिळून येती ।।

पाळण्यामध्ये देव मुरारी ।। नांव ठेविले श्रीकृष्ण हरी ।। जो बाळा जो. ।।१५।।

सोळाव्या दिवशी सोहळा केला ।। गोपी गवळणीनें कृष्ण आळवीला ।।

त्यांच्या हृदयी आनंद झाला ।। एका जनार्दनी पाळणां गाईला ।। जो बाळा जो. ।।१६।।

Comments