काजळ कुंकू मंगळसूत्र अहेवच लेण |
"काजळ कुंकू" हे एक बोली भाषेतील सर्वांनी लहानपणापासून ऐकलेले एक जिव्हाळ्याचे गाणे जतंन करून ठेवताना आज सर्वांसाठीच इथे देत आहे.
सौभाग्यवती महिला आपल्या घरात देवीला हात जोडून हे मागणे अगदी आवर्जून मागतात की काजळ कुंकू, हातातला चुडा, पायातले जोडवे हे सगळे सौभाग्याचे वान आहेत, जसे हे घातल्याने स्त्री छान दिसते , तिचे हे सौंदर्य मंगळसूत्राने अधिक छान दिसते. म्हणून प्रत्येक स्त्री देवी जवळ आपल्या सौभाग्याचेच मागणे मागते. ते सर्व वर्णन ह्या गीतातून केले आहे.
काजळ कुंकू मंगळ सूत्र अहेवाच लेण|
आई माझ्या अंबिकेन दिलं धाडून||ध्रु||
लाल लाल तो मळवट मजला शोभतसे भाळी|
कुंका खाली शोभून दिसते हळदी ची टिकली |
गुलाल माझ्या भाँगी भरला दिसतो शोभून |
आई माझ्या अंबिकेने दिले धाडून ||१||
हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती किणकिणतो |
पायामध्ये जोडव्याचा आवाज होतो ||
नाकामध्ये नथ माझ्या दिसते शोभून |
आई माझ्या अंबिकेने दिले धाडून ||२ ||
कुरुळ्या कूरुळ्या केसांची ती वेणी पाठीवरी |
जाई जुई चा गजरा शोभून दिसतो त्यावरी ||
वेणी मध्ये केवडा हा दिसतो शोभून| |
आई माझ्या अंबिकेने दिले धाडून || ३||
जडीताचे मंगल सूत्र कोणी घडविले |
घडविण्यासाठी सोनार तिने आणलाय शोधून ||
आई अंबिके अजुनी तुजला काय मागावे |
सौभाग्याचे लेणे माझ्या जन्माला द्यावे
सौभाग्याचे लेणे माझ्या जन्माला द्यावे ||४||
Comments
Post a Comment