Devachi drusht Drishtavala maza kanha: दृष्टावला माझा कान्हा - दृष्ट

कृष्णाची दृष्ट 


दृष्टावला माझा कान्हा उघडीन डोळा || ध्रु||

चिमणे अंगी भूषण सगळे माथा जाऊळ कुरुळे 

वाघ नखे कौस्तुभ रुळे कंठी वणमाळा 

दृष्टावला माझा कान्हा उघडीन डोळा ||१||


काल सखे घेऊनी छंद सळवी मला श्रीगोविंद 

आकशीचा मागे चांद, धरुनी माझे घोळा

दृष्टावला माझा कान्हा उघडीन डोळा ||२||


वैंकटात्मजा म्हणे राधा पहाता गेली सर्व ही बाधा 

दृष्ट उतरोनी ग्रही नेले घन निळा 

दृष्टावला माझा कान्हा उघडीन डोळा ||३||








Comments